दिनविशेष : २१ फेब्रुवारी [आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन]

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
320

२१ फेब्रुवारी  : जन्म

१८७५: १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला जीन काल्मेंट यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑगस्ट १९९७)
१८९४: वैज्ञानिक डॉ. शांतिस्वरुप भटनागर यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १९५५)
१८९६: हिन्दी साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर १९६१)
१९११: अर्थतज्ञ भबतोष दत्ता यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९९७)
१९४२: अभिनेत्री जयश्री गडकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट २००८)
१९४३: ड्रीमवर्क्स चे सहसंस्थापक डेव्हिड गेफ्फेन यांचा जन्म.
१९७०: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल स्लॅटर यांचा जन्म.

२१ फेब्रुवारी : मृत्यू

१८२९: कित्तूरची राणी चन्नम्मा यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १७७८)
१९६५: कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते माल्कम एक्स यांचे निधन. (जन्म: १९ मे १९२५)
१९७५: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक गजानन हरी तथा राजा नेने यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९१२)
१९७७: साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत रा. श्री. जोग यांचे निधन. (जन्म: १५ मे १९०३)
१९९१: चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचे निधन. (जन्म: ४ जून १९३६)
१९९८: चरित्र अभिनेते ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ओमप्रकाश यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १९१९)
२०११: अमेरिकन लेखक आणि पटकथालेखक व माईलस्टोन मीडिया चे सहसंस्थापक ड्वेन मॅकडफी यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १९६२)

२१ फेब्रुवारी  : महत्वाच्या घटना

१८४२: जॉर्ज ग्रीनॉ यांना शिवणाच्या मशिनचे पेटंट मिळाले.
१८४८: कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी साम्यवादाचा जाहीरनामा द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो प्रकाशित केला.
१८७८: न्यू हेवन, कनेक्टिकट येथे पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रकाशित करण्यात आली.
१९१५: लाहोर कट – लाहोर, बनारस व मीरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला.
१९२५: द न्यूयॉर्कर या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९७२: सोव्हिएत संघाचे मानवरहित अंतराळयान लुना २० हे चंद्रावर उतरले.
१९७५: जयश्री गडकर व बाळ धुरी यांचा विवाह झाला.
२०१३: हैदराबाद मध्ये अनेक बॉम्बस्फोटांमध्ये किमान १७ जण ठार आणि ११९ जण जखमी झाले.


आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिननिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम