चालू घडामोडी : 21 फेब्रुवारी 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 21 FEBRUARI 2020 | चालू घडामोडी : 21 फेब्रुवारी 2020
चालू घडामोडी – देशातील सक्षम महिलांची यादी जाहीर : महाराष्ट्रातून नवनीत राणा यांना स्थान
- फेम इंडिया मासिक आणि आशिय पोस्ट सर्व्हे यांनी नुकतंच देशातील 25 सक्षम महिलांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना पहिल्या पाचमध्ये स्थान मिळाले आहे. तर बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिचाही या यादीत समावेश आहे.
- नवनीत राणा बडनेरा मतदारसंघाचे युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी व अमरावतीच्या खासदार आहेत. नवनीत राणा सुरुवातीच्या काळात चित्रपटसृष्टीत सक्रिय होत्या. तेथे त्यांनी आपल्या कामाने प्रसिद्धी मिळवली. आता त्या राजकारणात सक्रिय असून संसदेत अमरावती लोकसभा मतदारसंघाते प्रतिनिधित्व करतात.
- नवनीत राणा म्हणाल्या, आता जबाबदारी आणखी वाढली आहे. यापुढे मी महिलांसाठी खूप काम करेन. गेल्या नऊ वर्षांपासून मी समाजसेवेत आहे. मला खासदार होऊन फक्त 10 महिने झाले आहेत. त्याची दखल घेतली गेल्याने पुढील काळात मी निश्चितच संसदेत महिलांचे प्रश्न जोमाने उचलेन. त्यांना न्याय देईन.
चालू घडामोडी – सैन्याला मिळणार नवे मुख्यालय
- भारतीय सैन्याचे मुख्यालय साउथ ब्लॉकमधून दिल्ली कँटमध्ये हलविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे भारतीय सैन्याला स्वतःचे नवे मुख्यालय प्राप्त होणार आहे. या नव्या इमारतीचे भूमिपूजन संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. या इमारतीला सैन्य भवन नाव दिले जाणार आहे. सैन्य भवन 39 एकर भूखंडावर उभारले जाणार आहे.
- ऐतिहासिक रायसीना हिल्समधून भारतीय सैन्याचे मुख्यालय स्थलांतरित करण्यात येणार आहे. पुढील 5 वर्षांमध्ये हे मुख्यालय निर्माण होणार आहे. साउथ ब्लीक ऐतिहासिक रायसीना हिल्स कॉम्प्लेक्सचा हिस्सा आहे. सरकारच्या सेंट्रल विस्टा पुनर्विकास योजनेच्या अंतर्गत सैन्य मुख्यालय बदलण्यात आल्यावर ल्युटियन्स झोनमधील नॉर्थ आणि साउथ ब्लॉकला संग्रहालयात रुपांतरित केले जाणार आहे.
- सद्यकाळात साउथ ब्लॉकमध्ये पंतप्रधानांचे कार्यालय आहे. याचबरोबर संरक्षण आणि विदेश मंत्रालयाचे कार्यालयही तेथेच आहे. तर नॉर्थ ब्लॉकमध्ये गृह आणि अर्थ मंत्रालयाचे कार्यालय आहे. या दोन्ही ब्लॉकमध्ये भारत सरकारची महत्त्वपूर्ण कार्यालये असल्याने तेथे सदैव कडेकोट बंदोबस्त असतो.
जॉईन करा . @chaluGhadamodi
चालू घडामोडी – हवाई दलाचे ‘चिनूक’ हेलिकॉप्टर उंचीवरच्या ठिकाणी कार्यरत
- भारतीय हवाई दलाचे ‘चिनूक’ हेलिकॉप्टर पर्वतीय प्रदेशात उंचीच्या ठिकाणी वापरण्यास सुरवात करण्यात आली आहे.
- आता हे हेलिकॉप्टर लडाखमधील सियाचीन प्रदेशात सेवा पुरविणार आहे आणि त्याद्वारे लष्करी उपकरणे अधिक उंचीवर पोहचविण्यात सुलभता येणार.
- अमेरिकेच्या बनावटीचे ‘चिनूक’ हेलिकॉप्टर गेल्या वर्षीच मार्च महिन्यात हवाई दलात समाविष्ट करण्यात आले होते. हे मालवाहू हेलिकॉप्टर सामान, सैनिक वाहून नेण्यास सक्षम आहे. हे एक अवजड भार वाहून नेणारे, दुहेरी पंखे असलेले हेलिकॉप्टर आहे. हे हेलिकॉप्टर 19 देशांमध्ये वाहतुकीसाठी वापरले जाते.
भारतीय हवाई दल (IAF)
- दिनांक 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली. दिनांक 12 मार्च 1945 रोजी दलाचे नाव ‘रॉयल इंडियन एअरफोर्स’ असे झाले. 1950 साली भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर या नावातला ‘रॉयल’ हा शब्द वगळण्यात आला.
- ‘नभ:स्पृशं दीप्तम्।‘ हे भारतीय हवाई दलाचे ध्येयवाक्य आहे.
- भारतीय हवाई दल हे जगातल्या सर्वात शक्तीशाली हवाई दलांच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे भारतापेक्षा अधिक मोठे हवाई दल आहे.
- तझाकिस्तान देशात फर्कहोर येथे भारतीय हवाई दलाचा तळ आहे. हा कोणत्याही भारतीय सुरक्षा दलाचा देशाबाहेरचा पहिला आणि एकमेव तळ आहे.
- सुब्रोतो मुखर्जी हे एका स्क्वाड्रनचे हवाई दलातले पहिले भारतीय प्रमुख होते.
- पद्मावती बंडोपाध्याय या भारतीय हवाई दलातल्या पहिल्या महिला एअर मार्शल ठरल्या
चालू घडामोडी – आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन: 21 फेब्रुवारी
- दरवर्षी 21 फेब्रुवारी या दिवशी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ पाळला जातो. 1999 साली संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेनी (UNESCO) सर्वप्रथम या दिनाची घोषणा केली होती.
- 2020 या वर्षाची संकल्पना: ‘लॅंगवेजेस विदाउट बॉर्डर्स’.
- 21 फेब्रुवारी 2020 रोजी भारत देशभरात हा दिवस ‘मातृभाषा दिवस’ म्हणून पाळत आहे. त्यानिमित्त मनुष्यबळ व विकास मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्लीत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम ‘आपला बहुभाषिक वारसा साजरा करणे (Celebrating our Multilingual Heritage)’ या संकल्पनेखाली आयोजित करण्यात आला. ही संकल्पना भारताच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेला प्रतिबिंबित करणारी आहे.
- भाषिक आणि सांस्कृतिक विविधता तसेच बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने फेब्रुवारी 2000 पासून दरवर्षी हा दिन पाळला जात आहे. आजच्या परिस्थितीत, जगात बोलल्या जाणार्या अंदाजे 6000 भाषांपैकी किमान 43% भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
इतिहास
- 1952 साली याच दिवशी पूर्व पाकिस्तानमध्ये (आत्ताचे बांग्लादेश) उर्दू भाषेला राष्ट्रीय भाषा म्हणून निवडल्यानंतर त्याविरोधात केलेल्या आंदोलनादरम्यान पोलीसांच्या गोळीबारात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या स्मृतीत बांग्लादेश आणि भारताच्या बंगालमध्ये हा दिन ‘भाषा दिबस’ किंवा ‘शहीद दिबस’ म्हणून ओळखला जातो.
- पूर्वीच्या पूर्व पाकिस्तानने त्यांच्या भाषेसाठी लढा दिल्यानंतर अखेरीस भारताच्या मदतीने 1971 साली बांग्लादेश पश्चिम पाकिस्तानपासून (आत्ताचे पाकिस्तान) स्वतंत्र झाले.
# Current Affairs
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents