दिनविशेष : २१ डिसेंबर

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
365

२१ डिसेंबर : जन्म

१८०४: इंग्लंडचे पंतप्रधान बेंजामिन डिझरेली यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १८८१)

१९०३: प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे यांचा जन्म. (मृत्यू: २ नोव्हेंबर १९९०)

१९१८: संयुक्त राष्ट्रांचे ४थे सरचिटणीस कुर्त वाल्ढहाईम यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून २००७)

१९२१: भारताचे १७ वे सरन्यायाधीश पी. एन. भगवती यांचा जन्म.

१९३२: भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक यू.एन. अनंतमूर्ती यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट २०१४)

१९४२: चीनचे राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांचा जन्म.

१९५०: ड्रीमवर्क्स अॅनिमेशनचे सहसंस्थापक जेफरी कॅझनबर्ग यांचा जन्म.

१९५४: अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू ख्रिस एव्हर्ट लॉइड यांचा जन्म.

१९५९: फलंदाज, क्रिकेट कप्तान व निवड समितीचे अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत यांचा जन्म.

१९५९: अमेरिकेची धावपटू फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर १९९८)

१९६३: हिंदी चित्रपट अभिनेते गोविंदा यांचा जन्म.

१९७२: भारतीय पत्रकार आणि राजकारणी वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांचा जन्म.

२१ डिसेंबर : मृत्यू

१८२४: कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे, हे सिद्ध  करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १७५५)

१९६३: इंग्लिश क्रिकेट खेळाडू जॅक हॉब्ज यांचे निधन. (जन्म: १६ डिसेंबर १८८२)

१९७९: चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १८९३)

१९९३: स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी यांचे निधन.

१९९७: भावगीतलेखक निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ पी. सावळाराम यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १९१४)

१९९७: सनईवादक पं. प्रभाशंकर गायकवाड यांचे निधन.

२००४: भारतीय न्यूरोलॉजिस्ट औतार सिंग पेंटल यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२५)

२००६: तुर्कमेनिस्तानचे पहिले राष्ट्रपती रूपमूर्त निझाव यांचे निधन.

२१ डिसेंबर : महत्वाच्या घटना

१९०९: अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांचा गोळ्या घालून वध केला.

१९१३: ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे (Crossword Puzzle) न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.

१९६५: विच्छा माझी पुरी करा या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला.

१९८६: रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

 

 

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम