चालू घडामोडी : 20 जानेवारी 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 20 january 2020 | चालू घडामोडी : 20 जानेवारी 2020
चालू घडामोडी – जे.पी. नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष
- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून भाजपच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंग यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.
- भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाचे निवडणूक प्रभारी राधामोहन सिंह यांना नड्डांचे नाव सुचवले होते. यामुळे नड्डा यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड होईल, असं सांगण्यात येत होतं.
- अमित शहा यांनी गृहमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नड्डा हे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष झाले होते.
- वादग्रस्त ववक्त्यांपासून दूरच राहणारे अतिशय प्रभावी नेते, अशी नड्डांची ओळख आहे.
चालू घडामोडी – देशात आंतरजाल अधिक गतीमान
- बंगळुरू : ‘इस्रो’ या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने जीसॅट-३० या दूरसंचार उपग्रहाचे दक्षिण अमेरिकेच्या कैरो बेटावरून शुक्रवारी पहाटे दोन वाजून ३५ मिनिटांनी यशस्वी प्रक्षेपण केले आहे. जीसॅट-३० या उपग्रहामुळे इंटरनेट क्षेत्रात क्रांती होणार असून त्यामुळे इंटरनेट अधिक गतीने चालणार आहे.
- यापूर्वी २०१५ मध्ये इनसॅट-४ ए या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. त्याची मर्यादा आता संपुष्टात आली असल्याने जीसॅट-३० हा दूरसंचार उपग्रह इस्रोने प्रक्षेपित केला आहे. इनसॅट-४ ए ऐवजी आता जीसॅट-३० हा उपग्रह काम करणार आहे.
- जीसॅट-३० या दूरसंचार उपग्रहामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती होणार आहे, व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच सेवा यासाठी या उपग्रहाचा वापर होणार आहे. जलवायुमध्ये होणारे बदल आणि हवामानाचा अंदाजही वर्तविण्यासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे.
- या दूरसंचार उपग्रहाचे फ्रेंच गयाना येथून एरियन ५ प्रक्षेपकाच्या मदतीने शुक्रवारी पहाटे यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले.
चालू घडामोडी –
- बरु-रियांग शरणार्थ्याना त्रिपूरामध्ये कायम स्वरुपी वास्तव्यास परवानगी देणार्या करारावर केंद्र सरकार, ही राज्ये आणि ब्रु शरणार्थ्याच्या प्रतिनिधीने स्वाक्षर्या केल्या – त्रिपुरा, मिझोरम.
- सेंटर ऑफ एक्सलन्स इन ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी याची स्थापना या शहरात झाली – बेंगळुरू.
- 6.5 किमी लांबीचा झेड-मोरह बोगदा या ठिकाणी बांधण्यात येणार – जम्मू-कश्मीर.
- ‘विज्ञान समागम’ ही विज्ञान प्रदर्शनी 21 जानेवारीपासून या शहरात भरणार – नवी दिल्ली.
- 17 जानेवारी रोजी या ठिकाणी “ग्लोबलाइजिंग इंडियन थॉट” या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद झाली – IIM, कोझिकोड
चालू घडामोडी – खलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : जलतरणात महाराष्ट्राला चार सुवर्ण
- कुस्तीत विजय पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांनी सुवर्णपदक मिळवून दिले.
- ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची सुवर्णपदकांची लयलूट सुरूच आहे. महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी रविवारी चार सुवर्णपदके पटकावली. तसेच कुस्तीत विजय पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांनी सुवर्णपदक मिळवून दिले.
- जलतरण प्रकारात मिहीर आंब्रे याने मुलांच्या २१ वर्षांखालील गटात १०० मीटर बटरफ्लाय आणि ४ बाय १०० मीटर मिडले रिले प्रकारात सुवर्णपदक पटकावले. अपेक्षा फर्नाडिस हिने १७ वर्षांखालील गटात ४०० मीटर वैयक्तिक मिडले शर्यत विक्रमी वेळेत पार करत सुवर्णपदक मिळवले. तसेच केनिशा गुप्ताने १०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.
- वेटलिफ्टिंगमध्ये प्राजक्ता खालकरने ६४ किलो गटात, अभिषेक निपणेने ७३ किलो गटात तर किरण मराठे याने युवा गटात सुवर्णपदक पटकावले.
# Current Affairs
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents