दिनविशेष : २० जानेवारी
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
२० जानेवारी : जन्म
१७७५: फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आंद्रे-मरी अॅम्पियर यांचा जन्म. (मृत्यू: १० जून १८३६)
१८६१: मराठीमधील पहिल्या स्त्री कथा-कादंबतीकार, निबंधकार आणि सुधारक काशीबाई गोविंदराव कानिटकर यांचा जन्म.
१८७१: टाटा घराण्यातील उद्योगपती सर रतनजी जमसेटजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९१८)
१८८९: महान देशभक्त आणि तपस्वी मसुरकर महाराज यांचा जन्म.
१८९८: नात मास्टर आणि गायक कृष्णराव (फुलंब्रीकर) यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर १९७४)
१९३०: चंद्रावर उतरणारे दुसरे अमेरिकन अंतराळवीर बझ आल्ड्रिन यांचा जन्म.
१९६०: १९ वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक आपा शेर्पा यांचा जन्म.
२० जानेवारी : मृत्यू
१८९१: हवाईचा राजा डेविड कालाकौआ यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १८३६)
१९३६: युनायटेड किंगडमचा राजा जॉर्ज पाचवा यांचे निधन. (जन्म: ३ जून १८६५)
१९५१: समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १८६९)
१९८०: दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण कस्तुरभाई लालभाई यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १८९४)
१९८८: स्वातंत्र्यसैनिक आणि पश्तून नेते खान अब्दुल गफार खान उर्फ सरहद्द गांधी यांचे निधन. (जन्म: ३ जून १८९०)
१९९३: अँग्लो-डच अभिनेत्री आँड्रे हेपबर्न यांचे निधन. (जन्म: ४ मे १९२९)
२००२: रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांचे निधन. (जन्म: १० मे १९१८)
२० जानेवारी : महत्वाच्या घटना
१७८८: इंग्लडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनार्यावर उतरले. इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती.
१८४१: युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.
१९३७: फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर २० जानेवारीलाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी करण्याची प्रथा पडली.
१९४४: दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सने बर्लिन शहरावर २,३०० टन बॉम्ब टाकले.
१९४८: महात्मा गांधींची हत्या करण्याचा चौथा प्रयत्न झाला.
१९५७: आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलालनेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करुन अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली.
१९६३: चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला.
१९६९: क्रॅब नेब्युलात प्रथमत: पल्सार दिसून आला.
१९९८: संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा पोलार संगीत पुरस्कार विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर.
१९९९: गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
२००९: अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents