चालू घडामोडी : 20 फेब्रुवारी 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
[irp]
Current Affairs : 20 FEBRUARI 2020 | चालू घडामोडी : 20 फेब्रुवारी 2020
चालू घडामोडी – “स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)” याचा द्वितीय टप्पा: वर्ष 2020-21 ते वर्ष 2024-25
- 19 फेब्रुवारी 2020 रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वर्ष 2024-25 पर्यंत चालणाऱ्या “स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)” याच्या द्वितीय टप्प्याला मंजुरी देण्यात आली.
- हागणदारी मुक्त प्लस (ODF प्लस) यावर योजनेच्या द्वितीय टप्प्यात लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. हागणदारी मुक्त वातावरण शाश्वत ठेवणे तसेच घन व द्रव कचरा व्यवस्थापनाचा यात समावेश आहे.
- प्रत्येकजण स्वच्छता गृहाचा वापर करणार याची खातरजमा करण्यावरही या कार्यक्रमाच्या अंतर्गत लक्ष ठेवण्यात येणार आहे.
अभियानाच्या द्वितीय टप्प्याची अंमलबजावणी करण्यासाठी वर्ष 2020-21 ते वर्ष 2024-25 या काळासाठी 1,40,881 कोटी रुपये एवढा एकूण खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 52,497 कोटी रुपये एवढा निधी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून पुरवला जाणार तर उर्वरित निधी घन व द्रव कचरा व्यवस्थापनासाठी 15वे वित्त आयोग, मनरेगा योजना आणि महसूल निर्मितीच्या अंतर्गत पुरवला जाणार आहे. - सध्याच्या निकषानुसार, वैयक्तिक घरगुती स्वच्छता गृहासाठी असलेली 12,000 रुपयांची प्रोत्साहन पर रक्कम या कार्यक्रमासाठी ठेवण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य यांच्या निधीचा वाटा ईशान्य आणि हिमालयीन राज्यांसाठी आणि जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी 90:10 तर इतर राज्यांसाठी 60:40 आणि इतर केंद्रशासित प्रदेशांसाठी 100:00 अश्या प्रमाणात राहणार.
- या व्यतिरिक्त, ग्राम पातळीवरील सामुदायिक स्वच्छता गृह बांधण्यासाठी ग्रामपंचायतींना दिली जाणारी आर्थिक मदत 2 लक्ष रुपयांवरून 3 लक्ष रुपये करण्यात आली आहे.
योजनेविषयी
- स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) याची सुरुवात 2 ऑक्टोबर 2014 रोजी झाली. त्या काळी देशात ग्रामीण पातळीवर स्वच्छतेचे प्रमाण केवळ 38.7 टक्के होते. तेव्हापासून आतापर्यंत योजनेच्या अंतर्गत 10 कोटीहून अधिक वैयक्तिक स्वच्छता गृहे बांधण्यात आली आहे. परिणामी, सर्व राज्यांमधल्या ग्रामीण भागांनी 2 ऑक्टोबर 2019 रोजी स्वत:ला हागणदारी मुक्त घोषित केले.
चालू घडामोडी – भारताच्या 22 व्या विधी आयोगाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारताच्या 22 व्या विधी आयोगाच्या स्थापनेला आज मंजुरी देण्यात आली. सरकारी राजपत्रात यासंबंधीचा आदेश प्रकाशित झाल्यापासून तीन वर्षे या आयोगाचा कालावधी राहील.
- आयोगाकडे अभ्यासासाठी आणि शिफारसीसाठी सोपवण्यात आलेल्या कायद्याच्या विविध पैलूबाबत, सरकारला योग्य, वैशिष्टपुर्ण शिफारसींचा लाभ होईल.
- विधी आयोग, स्वतः केंद्र सरकारने सोपवलेल्या कायद्यामधे सुधारणा करण्यासाठी संशोधन आणि आढावा घेईल. न्याय जलदगतीने देता यावा, खटले लवकर निकाली काढता यावेत, खटल्यासाठी खर्च कमी राहावा या दृष्टीने, न्याय प्रदान करण्याच्या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठीही हा आयोग, अभ्यास आणि संशोधन हाती घेऊ शकेल.
- कालबाह्य झालेले कायदे, जे तातडीने रद्दबातल करता येतील असे कायदे हा आयोग निश्चित करेल. सरकारने आयोगाकडे सोपवलेल्या कायद्याबाबत आपले मत सरकारला कळवेल. सरकारने सांगितल्यास, दुसऱ्या देशानी संशोधनासाठी केलेल्या विनंती बाबत विचार करेल.
- शिफारसींना अंतिम स्वरूप देण्यापूर्वी, आयोग, मुख्य संबंधित मंत्रालय आणि संबंधिताशी चर्चा करेल.
पर्वपिठीका
- विधी आयोग प्रथम 1955 मधे स्थापन झाला आणि दर तीन वर्षांनी त्याची पुनर्स्थापना करण्यात येते. 21 व्या विधी आयोगाची मुदत 31 ऑगस्ट 2018 पर्यंत होती.
[irp]
चालू घडामोडी – ‘बीआयएसएजी’ संस्थेला राष्ट्रीय संस्थेचा दर्जा, आता इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणार
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गुजरातमधल्या भास्कराचार्य इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस अॅल्पिकेशन्स अँड जिओइंर्फमेटिक्स ( बीआयएसएजी ) या संस्थेला राष्ट्रीय दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या संस्थेचे कामकाज आता इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (एमईआटीवाय) मंत्रालयाअंतर्गत होणार आहे.
लाभ
- सेवा देणे आणि नवसंकल्पना प्रत्यक्षात आणताना संस्थेत कार्यरत असलेल्या विद्यमान मनुष्य बळाचा उपयोग राष्ट्रीय पातळीवरील संस्थांमध्ये गरजेप्रमाणे करता येईल.
- संस्थेच्या कार्याचा विस्तार करणे शक्य होईल.
- जीआयएस प्रकल्प वेगाने पूर्ण करणे शक्य होईल.
- संशोधन, विकास आणि तंत्रज्ञान विकास यांच्यासाठी निधी उपलब्ध होवून त्याचा व्यापक उपयोग करणे शक्य होईल.
- निर्णय घेण्यासाठी चांगली कार्यप्रणाली तयार करून नियोजन आणि सुप्रशासन शक्य होईल.
- सध्या बीआयएसएजी ही संस्था गुजरात सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत कार्यरत आहे. गुजरातमध्ये गांधीनगरमध्ये ही संस्था आहे. तसेच या संस्थेची नोंदणी अहमदाबाद चॅरिटी कमिशनर यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच संस्थेचे अध्यक्ष म्हणून गुजरात सरकारचे मुख्य सचिव काम पाहतात.
- अंतराळ आणि तंत्रज्ञानविषयक कार्य करणा-या संस्थेला राष्ट्रीय दर्जा मिळाल्यानंतर तिथे उच्च दर्जाचे संशोधन शक्य होणार आहे.
चालू घडामोडी – इंडिया/भारत 2020 संदर्भ ग्रंथाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रकाशन
- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत इंडिया/भारत 2020 या वार्षिक संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन झाले. ‘हे पुस्तक म्हणजे सर्व लोकांसाठी संपूर्ण संदर्भ ग्रंथ आहे, विशेषत: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त आहे’, असे मत जावडेकर यांनी व्यक्त केले.
- माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने हे पुस्तक तयार केल्याबद्दल त्यांनी या विभागाचे अभिनंदन केले. गेल्या काही वर्षात हे पुस्तक अतिशय लोकप्रिय झाले आहे, असेही ते म्हणाले.
- जावडेकरांच्या हस्ते यावेळी या पुस्तकाच्या ई आवृत्तीचेही प्रकाशन झाले. ही ई आवृत्ती टॅबलेट, कॉम्प्युटर आणि स्मार्ट फोनवर वाचता येईल.
- या पुस्तकाची किंमत 300 रुपये इतकी असून ही आवृत्ती 225 रुपयांत उपलब्ध आहे. येत्या 20 फेब्रुवारी 2020 पासून प्रकाशन विभागाच्या संकेतस्थळावरून पुस्तक खरेदी करता येईल. संकेतस्थळाची लिंक हे पुस्तक ॲमेझॉन आणि गुगल प्ले स्टोअरवर देखील उपलब्ध आहे.
# Current Affairs
[irp]
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents