दिनविशेष : २० डिसेंबर [आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस]

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
372

२० डिसेंबर  : जन्म

१८६८: फायरस्टोन टायर आणि रबर कंपनीचे संस्थापक हार्वे फायरस्टोन यांचा जन्म. (मृत्यू: ७ फेब्रुवारी १९३८)

१८९०: नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९६७)

१९०१: अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९६७)

१९०९: भारतीय पत्रकार आणि राजकारणी वक्कम मजीद यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै २०००)

१९४०: पद्मश्री भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका यामिनी कृष्णमूर्ती यांचा जन्म.

१९४२: पाकिस्तानातील पहिले हिंदू मुख्य न्यायाधीश राणा भगवानदास यांचा जन्म.

१९४५: भारतीय वकील शिवकांत तिवारी यांचा जन्म. (मृत्यू: २६ जुलै २०१०)

२० डिसेंबर : मृत्यू

१७३१: बुंदेलखंडचे महाराजा छत्रसाल बुंदेला यांचे निधन. (जन्म: ४ मे १६४९)

१९१५: भारतीय चित्रकार आणि संगीतकार उपेंद्रकिशोर रे यांचे निधन. (जन्म: १२ मे १८६३)

१९३३: संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट यांचे निधन. (जन्म: २२ मे १८७१)

१९५६: देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १८७६)

१९७१: द वॉल्ट डिस्ने कंपनीचे सहसंस्थापक रॉय ओ. डिस्ने यांचे निधन. (जन्म: २४ जून १८९३)

१९९३: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट यांचे निधन.

१९९६: अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक कार्ल सगन यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १९३४ – ब्रुकलिन, न्यूयॉर्क, यु. एस. ए.)

१९९६: बलुतं कार दलित लेखक दगडू मारुती तथा दया पवार यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९३५)

१९९८: जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९१२)

२००१: सेनेगलचे पहिले राष्ट्रपती लेओपोल्ड सेडर सेन्घोर यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १९०६)

२०१०: अभिनेत्री नलिनी जयवंत यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १९२६)

२०१०: लेखक सुभाष भेंडे यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १९३६)

२० डिसेंबर : महत्वाच्या घटना

१९२४: अडोल्फ हिटलर यांची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका.

१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कलकत्ता शहरावर बॉम्बवर्षाव केला.

१९४५: मुंबई – बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू.

१९७१: झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.

१९९४: राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा जवाहरलाल नेहरू पुरस्कार प्रदान.

१९९९: पोर्तुगालने मकाऊ हे बेट चीनला परत दिले.

२०१०: भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर.


 

 

आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम