चालू घडामोडी : 20 डिसेंबर 2019

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
139

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 21 December 2019 | चालू घडामोडी : 21 डिसेंबर 2019

चालू घडामोडी – राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धा : राहीला सुवर्णपदक

  • आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या राही सरनोबतने ६३व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात बुधवारी सुवर्णपदक पटकावले.
  • कनिष्ठ गटातील सुवर्णपदक विजेत्या मनू भाकरला वरिष्ठ गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • महिलांच्या वरिष्ठ गटात राहीने ५८९ गुण मिळवले, तर अंतिम फेरीत ४१ गुण मिळवले. मनूला प्राथमिक फेरीत ५८२ आणि अंतिम फेरीत ३२ गुण मिळाले.
  • राहीने अंतिम फेरीत नऊ गुणांच्या फरकाने सुवर्णपदकावर वर्चस्व गाजवले. या गटातील कांस्यपदक महाराष्ट्राच्या अभिज्ञा पाटीलला मिळाले. प्राथमिक फेरीत तिला ५७५ आणि अंतिम फेरीत २७ गुण मिळाले.
  • महाराष्ट्राला १७३८ गुणांसह सांघिक सुवर्णपदक मिळाले, तर हरियाणाला (१७०९ गुण) दुसरे स्थान मिळाले.
  • म्युनिच (जर्मनी) येथे मे महिन्यात झालेल्या ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकताना राहीने टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारातील एक स्थान निश्चित केले होते.

# Current Affairs


चालू घडामोडी – सर्वाधिक वेतन देण्यात बेंगळुरू अव्वल

  • नोकरदारांमध्ये सर्वाधिक वेतन घेणाऱ्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी अव्वल स्थान पटकावले असून, सर्वाधिक वेतन देणाऱ्या शहरांमध्ये आयटी नगरी बेंगळुरूने यंदा बाजी मारून ‘हॅट्‌ट्रिक’ लाधली आहे.
  • २०१७ आणि २०१८मध्येही सर्वाधिक वेतन देणाऱ्या शहरांच्या यादीतही बेंगळुरूच अव्वल होते.
  • ‘रँडस्टँड इनसाइट्स सॅलरी ट्रेंड्स रिपोर्ट २०१९’ या अहवालात नमूद केल्याप्रमाणे बेंगळुरूमधील कनिष्ठ कर्मचाऱ्याला वार्षिक ५.२७ लाख रुपये, त्यापेक्षा अधिक अनुभवी कर्मचाऱ्याला वार्षिक १६.४५ लाख रुपये आणि वरिष्ठ कर्मचाऱ्याला वार्षिक ३५.४५ लाख रुपये वेतन मिळत आहे.
  • कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या गटात वार्षिक ५ लाख रुपये आणि ४.५९ लाख रुपयांचे वेतन देऊन हैदराबाद आणि मुंबई यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे. मध्यम गटातील कर्मचाऱ्यांच्या गटात वार्षिक १५.०७ लाख रुपये आणि १४.५ लाख रुपयांचे वेतन देऊन मुंबई आणि नॅशनल कॅपिटल रिजनने दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे.
  • या शिवाय मुंबई आणि पुण्याने वार्षिक ३३.९५ लाख रुपये आणि ३२.६८ लाख रुपये वेतन देऊन अतिवरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या गटात दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – कतार आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धात जेरेमीचे विक्रमासह रौप्य

  • युवा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता वेटलिफ्टिंगपटू जेरेमी लालरिनुंगाने विक्रमी कामगिरीची नोंद करताना कतार आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतील पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले.
  • 17 वर्षीय जेरेमीने एकूण 306 किलो वजन उचलून स्नॅच, क्लीन अँड जर्क आणि एकूण वजनांचे वैयक्तिक युवा आशियाई विक्रम मोडीत काढले.
  • जेरेमीच्या खात्यावर 12 आंतरराष्ट्रीय आणि 15 राष्ट्रीय विक्रम नावावर आहेत.
  • आशियाई युवा अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा जेरेमी 62 किलो वजनी गटातून 67 किलोमध्ये समाविष्ट झाल्यापासून त्याच्या कामगिरीत कमालीची सुधारणा होत आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – माता मृत्यू रोखण्यासाठी विशेष कृती आराखडा

  • राज्यातील माता मृत्यूंचे प्रमाण वाढत असल्यामुळे आता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. माता मृत्यू रोखण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला असून त्याअंतर्गत सर्व जिल्ह्यांतील आरोग्य विभागाला माता मृत्यू सनियंत्रण आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  • राज्यातील माता मृत्यूचा दर हा एक लाख प्रसूतीमागे 61 इतका आहे. 2020 अखेर हे प्रमाण प्रतिलाखामागे 30 एवढे कमी करण्याचे ध्येय आरोग्य विभागाने बाळगले आहे. प्रसूतीदरम्यान वाढणारा रक्तदाब, प्रसूतीपूर्व किंवा त्यानंतर होणारा रक्तस्राव, जंतूदोष या तीन आरोग्य समस्या मातेच्या मृत्यूस कारणीभूत ठरत असल्याचे या प्रकरणांच्या आढाव्यातून समोर येत आहे.
  • तर या तिन्ही समस्यांतून मातेला वाचवता येऊ शकते. यातून होणारे मृत्यू टाळण्यासाठी कुटुंब कल्याण कार्यालयातर्फे आरोग्य केंद्रातील उपचार व गर्भवतींची काळजी घेण्याच्या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्याचे सुचविले आहे.
  • माता मृत्यू कृती नियंत्रण आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले आहेत.
  • माता मृत्यू दर कमी करण्यासाठी कुटुंब कल्याण विभागामार्फत आवश्यक कृती योजना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, 12 आठवड्यांच्या आत गर्भवतींची नोंद करून त्यातील जोखीमग्रस्त भागातील मातांची वेगळी नोंद करणे. त्यांच्या आरोग्य स्थितीनुसार उपचारांची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम