दिनविशेष : २० ऑगस्ट – जागतिक मच्छर दिन / भारतीय अक्षय ऊर्जा दिन

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
185

२० ऑगस्ट    : जन्म

१७७९: स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ जेकब बर्झेलिअस यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑगस्ट १८४८)

१८३३: अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १९०१)

१८९६: भारतीय फुटबॉल खेळाडू गोस्त पाल यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९७६)

१९४०: भारतीय-ऑस्ट्रेलियन क्रिकेटर रेक्स सेलर्स यांचा जन्म.

१९४१: युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच सर्बिया यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च २००६)

१९४४: भारताचे ६वे व सर्वात कमी वयाचे पंतप्रधान राजीव गांधी यांचा मुंबई येथे जन्म. (मृत्यू: २१ मे १९९१)

१९४६: इन्फोसिस चे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांचा जन्म.

 २० ऑगस्ट  : मृत्यू

१९३९: भारतीय इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ व लेखक एग्नेस गिबर्ने यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८४५)

१९८४: सुप्रसिद्ध जादूगार रघुवीर भोपळे यांचे निधन. (जन्म: २४ मे १९२४)

१९८५: अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९३२)

१९८८: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक माधवराव शिंदे यांचे निधन.

१९९७: गुजराथी नाटककार लेखक प्रागजी डोस्सा यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १९०७)

२०००: चित्रपट निर्माते प्राणलाल मेहता यांचे निधन.

२००१: प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष एम. आर. यार्दी यांचे निधन.

२०११: भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९१९)

२०१३: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे निधन.

२०१३: ज्योतिर्भास्कर, लेखक उद्योजक जयंत साळगावकर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९२९)

२०१४: भारतीय योग प्रशिक्षक व लेखक तसेच आयंगर योगा चे निर्माते बी. के. अय्यंगार यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९१८)

 

२० ऑगस्ट   : महत्वाच्या घटना

१६६६  शिवाजीराजांनी दख्खनेमधे येण्यासाठी नरवीर घाटी हे ठाणे खोटे दस्तऐवज दाखवून ओलांडले.

१८२८: राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.

१८९७: सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.

१९१४: पहिले महायुद्ध – जर्मन फौजांनी ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.

१९२०: डेट्रॉइट,मिशिगन येथे जगातील पहिले व्यावसायिक नभोवाणी केंद्र 8MK (सध्याचे WWJ) सुरू झाले.

१९४१: दुसरे महायुद्ध – फ्रान्समधील भुमिगत चळवळ उखडून काढण्याच्या उद्देशाने जर्मनांनी एका दिवसात ५० हजार नागरिकांना अटक केली

१९६०: सेनेगलने आपण मालीपासून स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.

१९८८: ८ वर्षांच्या युद्धानंतर इराण-इराक युद्धबंदी करार झाला.

१९९५: भारतातील फिरोजाबाद रेल्वे अपघातात २५८ जणांचा मृत्यू झाला.

२००८: कुस्तीगीर सुशील कुमारला बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले.

 

निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम