दिनविशेष : १९ मे

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
256

दिनविशेष

१९ मे : जन्म

१८८१: तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर १९३८)
१८९०: व्हिएतनामचे राष्ट्रपती हो ची मिन्ह यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर १९६९)
१९०५: भारतीय संगीत क्षेत्रातील अध्वर्यू गानहिरा हिराबाई बडोदेकर यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९८९)
१९०८: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर  १९५६)
१९१०: नथुराम गोडसे यांचा जन्म. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १९४९)
१९१३: भारताचे ६ वे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९९६ – बंगळुरू)
१९२५: ख्मेर रुज चे नेते पॉल पॉट यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल १९९८)
१९२५: कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते माल्कम एक्स यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९६५)
१९२६: आध्यात्मिक गुरू आणि लेखक स्वामी क्रियानंद यांचा जन्म.
१९२८: लोटस कार कंपनी चे स्थापक कोलिन चॅपमन यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९८२)
१९३४: भारतीय लेखक आणि कवीरस्किन बाँड यांचा जन्म.
१९३८: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अभिनेते व दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचा जन्म.
१९६४: तामिळ अभिनेता मुरली यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर २०१०)

 

१९ मे : मृत्यू

१२९७: संत ज्ञानदेव यांची बहिण मुक्ताबाई यांनी एदलाबाद येथे समाधी घेतली.
१९०४: आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १८३९)
१९५८: औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांचे
निधन. (जन्म: १० डिसेंबर १८७०)
१९६५: मालागासी येथील तुई मलिला या वयोवृद्ध कासवाचा मृत्यू.
१९६९: इतिहास व पुराणसंशोधक पांडुरंग मार्तंड तथा आबा चांदोरकर यांचे निधन.
१९९५: ग्वाल्हेर घराण्याचे संगीतज्ञ पं. विनयचंद्र मौदगल्य यांचे निधन.
१९९७: बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार शंभू मित्रा यांचे निधन. (जन्म: २२ ऑगस्ट १९१५)
१९९९: काव्य आणि संतवाङ्‌मयाचे गाढे अभ्यासक, कवी व समीक्षक प्रा. रमेश तेंडुलकर यांचे निधन.
२००८: नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १९२८ – कोल्हापूर, महाराष्ट्र)

 

१९ मे : महत्वाच्या घटना

१५३६: इंग्लंडचा राजा आठवा हेन्‍री यांची बायको अ‍ॅन बोलेन हिचा व्यभिचाराबद्दल शिरच्छेद करण्यात आला.
१७४३: जीन पियरे क्रिस्टीन यांनी सेंटीग्रॅड तापमान पातळी विकसित केली.
१९१०: हॅले धुमकेतुचे शेपूट पृथ्वीला चाटुन गेले.
१९११: पार्कस कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा सुरु झाली.
१९६३: द न्यू यॉर्क पोस्ट संडे मॅगझीनने डॉ. मार्टिन लूथर किंग जूनियर यांचे बर्मिंगहॅम जेलमधील पत्र प्रकाशित केले.

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम