चालू घडामोडी : 19 मार्च 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 19 March 2020 | चालू घडामोडी : १९ मार्च २०२०
चालू घडामोडी – जागतिक चिमणी दिन World Sparrow Day
- 20 मार्च
- Eco-Sys Action Foundation (France) आणि जगातील इतर संस्थांच्या मदतीने भारतातील अशासकीय संघटना (NGO) Nature
- Forever Society या संस्थेकडून हा दिवस साजरा केला जातो. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- 2020 Theme: I Love Sparrow
उद्देश
- शहरी भागातील चिमण्यांची घरटी आणि ग्रामीण भागातील चिमण्यांची कमी होणारी संख्या याबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो.
- 2020 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
- दिल्ली सरकारने 2012 मध्ये Rise of Sparrow हे अभियान सुरू केले.
Nature Forever Society
- भारतीय अशासकीय संघटना
- स्थापना: 2006
- संस्थापक: Heroes of The Environment महंमद दिलावर या संस्थेकडून पर्यावरणासंबंधी काम करणार्या लोकांना 2011 पासून Sparrow Award दिले जातात.
चालू घडामोडी – लोकसभेत ‘विमान (दुरुस्ती) विधेयक-2020’ मंजूर
- लोकसभेत ‘विमान (दुरुस्ती) विधेयक-2020’ मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकाद्वारे 1934 सालच्या कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे.
- ‘विमान (दुरुस्ती) विधेयक-2020’मध्ये नागरी उड्डयन महासंचालनालय (DGCA), नागरी उड्डयन सुरक्षा विभाग (BCAS) आणि विमान अपघात अन्वेषण विभाग (AAIB) या संस्थांना वैधानिक संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे.
- कायद्यान्वये, केंद्र सरकार (i) हवाई वाहतूक सेवांचे नियमन करणे, (ii) कोणत्याही निर्दिष्ट क्षेत्रावर उड्डाण करण्यास मनाई करणे आणि (iii) विमानाची नोंदणी याबाबतीत नियम बनवू शकणार. तसेच केंद्र सरकार तीनही आस्थापणांवर महासंचालकांची नेमणूक करू शकते.
- विधेयकांतर्गत दंडाची कमाल मर्यादा 10 लक्षावरून एक कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
- संरक्षण दलांच्या विमानांना या विधेयकांतर्गत कायद्यातून सूट देण्यात आली आहे.
- नागरी उड्डयन सुरक्षा विभाग हे नागरी उड्डयन मंत्रालयाशी संलग्न असलेले कार्यालय आहे. हे नागरी विमान वाहतूकीच्या सुरक्षेसाठी नियामक प्राधिकरण म्हणून कार्य करते. त्याची स्थापना 1976 साली झाली.
- नागरी उड्डयन महासंचालनालय विमान अपघात आणि घटनांचा तपास करते.
चालू घडामोडी – अरुणाचल प्रदेशात “केंद्रीय हिमालयी संस्कृती शिक्षण संस्था” याची स्थापना
- बौद्ध तत्वज्ञान, संस्कृती आणि कला यांचे शिक्षण आणि बौद्ध धर्माच्या विविध पैलूंवर संशोधन करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी अरुणाचल प्रदेशाच्या दाहुंग या शहरात भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने “केंद्रीय हिमालयी संस्कृती शिक्षण संस्था” (Central Institute of Himalayan Culture Studies -CIHCS) याची स्थापना केली.
- आधुनिक विद्यापीठाच्या प्रणालीद्वारे तिबेटी, चिनी, पाली, संस्कृत, जापानी आणि इतर आशियाई भाषांमध्ये जतन केलेल्या प्राचीन बौद्ध हस्तलिपी आणि ग्रंथांचे जतन करणे आणि ते डिजिटल करणे हा या संस्थेचा मुख्य हेतू आहे.
- संस्थेच्या कामकाजासाठी केंद्र सरकारकडून वित्तपूरवठा केला जाणार आहे. तसेच संस्कृती मंत्रालयाच्या योजनांच्या माध्यमातून संशोधनासाठी निधी पुरवला जाणार आहे.
- वर्तमानात, तिबेट हाऊस, नवी दिल्ली; लायब्ररी ऑफ तिबेटियन वर्क्स अॅन्ड आर्चीव्ह, धर्मशाला; नामग्याल तिबेटोलॉजी संस्था, सिक्कीम; बौद्ध सांस्कृतिक शिक्षण केंद्र, तवांग मठ, अरुणाचल प्रदेश; आंतरराष्ट्रीय बौद्ध संघ; आणि GRL मोनास्टिक स्कूल, बोमडिला, अरुणाचल प्रदेश या सहा संस्थांना बौद्ध संस्कृती आणि कलेच्या संवर्धनासाठी संस्कृती मंत्रालय वार्षिक अनुदान देखील देत आहे.
चालू घडामोडी – ई. के. जानकी अम्मल राष्ट्रीय पुरस्कार
- वनस्पतिशास्त्र क्षेत्रात पीएच.डी. करणाऱ्या प्रा. अम्मल या पहिल्या भारतीय महिला होत.
- वनस्पतिशास्त्र संशोधनातील उत्कृष्ट कार्यास प्रोत्साहन मिळावे आणि तरुण विद्यार्थ्यांना या क्षेत्रात कार्य करण्याची ऊर्जा मिळावी, या उद्देशाने भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्रालयाने ‘ई. के. जानकी अम्मल राष्ट्रीय पुरस्कार’ १९९९ पासून सुरू केला.
- परा. ई. के. जानकी अम्मल यांनी ‘सायटोटॅक्सोनॉमी’ (जीवांच्या वर्गीकरणाचे पद्धतिशास्त्र) या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार सुरू करण्यात आला.
वनस्पतिशास्त्र क्षेत्रात पीएच.डी. करणाऱ्या प्रा. अम्मल या पहिल्या भारतीय महिला होत. - त्यांनी अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातून १९३१ साली पीएच.डी. केली. मुलींच्या उच्च शिक्षणाबद्दल उदासीनता असणाऱ्या त्या काळात प्रा. अम्मल यांनी जगभर फिरून वनस्पतिशास्त्रात संशोधन केले..
- कोइम्बतूरच्या ऊस संशोधन केंद्रात कार्यरत असताना त्यांनी भारतातील उसाच्या जातींचा सखोल अभ्यास केला. अधिक गोड आणि भारतातील सर्व प्रकारच्या वातावरणात पिकवता येईल अशी उसाची सुधारित जात त्यांनी तयार केली. ऊस संकरांचा शोध हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे संशोधन मानले जाते. त्यामुळेच ‘उसाला गोडवा देणारी शास्त्रज्ञ’ अशी त्यांची ख्याती आहे.
- केरळातील सदाहरित वनांमधून औषधी गुणधर्म असलेल्या आणि आर्थिकदृष्टय़ा मौल्यवान समजल्या जाणाऱ्या झाडाझुडपांच्या नमुन्यांचाही प्रा. अम्मल यांनी संग्रह केला होता. त्यांनी अनेक फुलांच्या गुणसूत्रांचाही अभ्यास केला.
- ऊस आणि फुलांबरोबरच वांग्याच्या ‘क्रॉस ब्रीडिंग’वर संशोधन करून त्यांनी वांग्याचे वाणही शोधले.
- १९७७ साली त्यांना पद्मश्रीने गौरविण्यात आले.
- दर वर्षी ‘ई. के. जानकी अम्मल राष्ट्रीय पुरस्कार’ जागतिक पर्यावरणदिनी दिला जातो.
- देशपातळीवर दिला जाणारा हा पुरस्कार मागील वर्षी कोल्हापूर विद्यापाठातील डॉ. श्रीरंग यादव यांना मिळाला. हा पुरस्कार मिळवणारे डॉ. यादव हे एकमेव महाराष्ट्रीय आहेत!
- वनस्पती प्रजाती वर्गीकरण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या, नवीन प्रजाती शोधून त्यांची अचूक वर्गवारी करणाऱ्या, तसेच आण्विक टॅक्सोनॉमी, केमोटॅक्सोनॉमी इत्यादी क्षेत्रांतील उत्कृष्ट प्रयोगात्मक कार्यासाठी, तसेच वनस्पतिशास्त्र संशोधनात पीएच.डी. प्रबंध, त्या विषयात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.
# Current Affairs
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents