दिनविशेष : १९ जानेवारी

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
287

१९ जानेवारी  : जन्म

१७३६: वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे स्कॉटिश शास्रज्ञ आणि संशोधक जेम्स वॅट यांचा जन्म.

१८०९: अमेरिकन गूढ व भयकथांचे लेखक व कवी एडगर अ‍ॅलन पो यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १८४९)

१८८६: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९५२)

१८९२: विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचा जन्म.

१८९८: मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक विष्णू सखाराम तथा वि. स. खांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर १९७६)

१९०६: चित्रपट दिगदर्शक, अभिनेते आणि निर्माते विनायक दामोदर कर्नाटकी उर्फ मास्टर विनायक यांचा जन्म.

१९२०: संयुक्त राष्ट्रांचे पाचवे सरचिटणीस झेवियर पेरेझ द कुइयार यांचा जन्म.

१९३६: बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९८१)

१९ जानेवारी  : मृत्यू

१९०५: भारतीय तत्त्वज्ञानी देबेन्द्रनाथ टागोर यांचे निधन.

१९६०: मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणे यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १८९०)

१९९०: भारतीय तत्त्वज्ञानी आचार्य रजनीश यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १९३१)

२०००: उद्योगपती व क्रिकेट प्रशासक मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम. ए. चिदंबरम यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १९१८)

१९ जानेवारी  : महत्वाच्या घटना

१८३९: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला.

१९०३: अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता.

१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी सैन्याने ब्रह्मदेशवर आक्रमण केले.

१९४९: पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन पुणे महानगरपालिका स्थापन झाली.

१९४९: क्यूबाने इस्त्रायला मान्यता दिली.

१९५४: कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन.

१९५६: देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम जाहीर.

१९६६: भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी यांनी पदभार स्वीकारला.

१९६८: पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी केली.

१९८६: (c)brain नावाचा कॉम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरूवात झाली.

१९९६: ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खाँ यांना मध्य प्रदेशाचा कालिदास सन्मान जाहीर.

१९९६: प्रसिध्द मल्याळी लेखक एम. टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड.

२००६: नासाचे न्यू होरायझन्स हे अंतराळयान प्लुटोकडे प्रक्षेपित झाले.

२००७: सरदार सरोवर धरणाचा वीजनिर्मिती प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला.

 


 

 

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम