दिनविशेष : १९ फेब्रुवारी [छत्रपती शिवाजी महाराज जयंती]
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
१९ फेब्रुवारी : जन्म
१४७३: सूर्यकेन्द्री विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारा पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निकोलस कोपर्निकस यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १५४३)
१६३०: छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १६८०)
१८५९: स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज स्वांते अर्हेनिअस यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९२७)
१८९९: गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री बळवंतराय मेहता यांचा जन्म.
१९०६: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी यांचा जन्म. (मृत्यू: ५ जून १९७३)
१९१९: मराठी नवकथेचे जनक अरविंद गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९९२)
१९२२: पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियंत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट १९९५)
१९६२: झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू हॅना मंडलिकोव्हा यांचा जन्म.
१९ फेब्रुवारी : मृत्यू
१८१८: पेशव्यांचे अखेरचे सरसेनापती सरदार बापू गोखले यांचे आष्टी येथे निधन.
१९१५: थोर समाजसेवक, काँग्रेसचे अध्यक्ष, संसदपटू, भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) संस्थापक नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे निधन. (जन्म: ९ मे १८६६)
१९५६: प्रजा समाजवादी पक्षाचे नेते, लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य नरेन्द्र देव यांचे निधन.
१९५६: ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत केशव लक्ष्मण दफ्तरी यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८८०)
१९७८: गायक व संगीतकार पंकज मलिक यांचे निधन. (जन्म: १० मे १९०५)
१९९७: संगीतकार राम कदम यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९१८)
१९९७: सुधारणावादी चिनी नेते डेंग जियाओ पिंग यांचे निधन. (जन्म: २२ ऑगस्ट १९०४)
२००३: पौराणिक हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते अनंत मराठे यांचे निधन.
१९ फेब्रुवारी : महत्वाच्या घटना
१८७८: थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफचे पेटंट घेतले.
१८८४: यू. एस. ए. च्या दक्षिण भागाला ६० चक्रीवादळांनी तडाखा दिला.
१९४२: पर्ल हार्बरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझव्हेल्ट यांनी जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात ठेवण्याच्या आदेशावर सह्या केल्या.
२००३: तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents