चालू घडामोडी : 19 फेब्रुवारी 2020

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
121

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs :19 FEBRUARI 2020 | चालू घडामोडी : 19 फेब्रुवारी 2020

चालू घडामोडी – मृदा आरोग्य पत्रिका दिवस: 19 फेब्रुवारी

 दिनांक 19 फेब्रुवारी 2020 रोजी मृदा आरोग्य पत्रिका दिवस पाळला जात आहे.

 मृदा आरोग्य पत्रिका योजना

  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 19 फेब्रुवारी 2015 रोजी राजस्थानमधल्या सुरतगड या ठिकाणी मृदा आरोग्य पत्रिका योजनेचे उद्घाटन करण्यात आले. शेत जमिनीतील पोषक द्रव्यांच्या कमतरतेचा शोध घेण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या योजनेच्या अंतर्गत शेतकर्‍यांना दर दोन वर्षांनी मृदा आरोग्य पत्रिका दिल्या जातात.
  •  देशातल्या सर्व शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यासाठी राज्य सरकारांना मदत करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. मातीचे आरोग्य आणि तिची उत्पादकता सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमीनीतल्या पोषक द्रव्यांची स्थितीची माहिती तसेच पोषक द्रव्यांच्या योग्य मात्रेबाबत माहितीही या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली जाते.
  • शेतकर्‍यांना अधिक उत्पादनाच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्नाची हमी या योजनेतून दिली जाते, तसेच शाश्वत शेतीलाही चालना दिली जाते.
  •  भारत सरकारच्या ‘मृदा आरोग्य पत्रिका’ योजनेमुळे गेल्या पाच वर्षात पिक उत्पादनात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.
  •  या योजनेच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे वर्ष 205 ते वर्ष 2017 या काळात 10 कोटी 74 लक्ष शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप केले गेले तर वर्ष 2017 ते वर्ष 2019 या दुसऱ्या टप्प्यात 11 कोटी 74 लक्ष मृदा आरोग्य पत्रिका वाटण्यात आल्या. सरकारने 700 कोटी रुपायांहून अधिक खर्च मृदा आरोग्य पत्रिकांवर केला आहे.
  •  या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 429 नवीन स्थायी मृद चाचणी प्रयोगशाळा, 102 फिरत्या प्रयोगशाळा, 8752 छोट्या प्रयोगशाळा आणि 1562 ग्रामस्तरीय प्रयोगशाळांना परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी 129 नवीन स्थायी मृद चाचणी प्रयोगशाळा, 86 फिरत्या प्रयोगशाळा, 6498 छोट्या प्रयोगशाळा आणि 179 ग्रामस्तरीय प्रयोगशाळा कार्यरत आहेत.
  • आतापर्यंत 21 खते पौषक द्रव्य-आधारित अनुदान (NBS) योजनेच्या अंतर्गत आणली गेली आहेत. सध्या सरकारने अधिसूचित केलेली 35 सानुकूलित व 25 प्रोत्साहीत खते वापरात आहेत.

# Current Affairs


चालू घडामोडी –  इंडिया /भारत 2020 संदर्भ ग्रंथाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रकाशन

  •  केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत इंडिया/भारत 2020 या वार्षिक संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन झाले. ‘हे पुस्तक म्हणजे सर्व लोकांसाठी संपूर्ण संदर्भ ग्रंथ आहे, विशेषत: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त आहे’, असे मत जावडेकर यांनी व्यक्त केले.
  • माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने हे पुस्तक तयार केल्याबद्दल त्यांनी या विभागाचे अभिनंदन केले. गेल्या काही वर्षात हे पुस्तक अतिशय लोकप्रिय झाले आहे, असेही ते म्हणाले.
  • जावडेकरांच्या हस्ते यावेळी या पुस्तकाच्या ई आवृत्तीचेही प्रकाशन झाले. ही ई आवृत्ती टॅबलेट, कॉम्प्युटर आणि स्मार्ट फोनवर वाचता येईल.
  •  या पुस्तकाची किंमत 300 रुपये इतकी असून ही आवृत्ती 225 रुपयांत उपलब्ध आहे. येत्या 20 फेब्रुवारी 2020 पासून प्रकाशन विभागाच्या संकेतस्थळावरून पुस्तक खरेदी करता येईल. संकेतस्थळाची लिंक हे पुस्तक ॲमेझॉन आणि गुगल प्ले स्टोअरवर देखील उपलब्ध आहे.
    [irp]

# Current Affairs


चालू घडामोडी –  UNFAOचा ‘खाद्यान्न किंमत निर्देशांक’

  • संयुक्त राष्ट्रसंघ खाद्यान्न व कृषी संघटनेचा (FAO) ‘खाद्यान्न किंमत निर्देशांक (food price index) हे आधारभूत कालावधी (2002-04) याचा संदर्भ घेऊन प्रमुख अन्नपदाथांच्या आंतरराष्ट्रीय किंमतीतले बदल मोजण्याचे प्रमाण आहे. हा निर्देशांक जानेवारी 2020 या महिन्यात 182.5 अंकांवर पोहोचला, जो की डिसेंबर 2014 (185.8) नंतरचा उच्चांक आहे.
  • तसेच, या निर्देशांकावर आधारित असलेला वर्षाकाठचा महागाई दर ऑगस्ट 2019 या महिन्यातल्या 1.13 टक्क्यांवरून सप्टेंबरमध्ये 2.86 टक्के, ऑक्टोबरमध्ये 5.58 टक्के, नोव्हेंबरमध्ये 9.33 टक्के, डिसेंबरमध्ये 12.22 टक्के, जानेवारी 2020 मध्ये 11.33 टक्के होता.
  • मान्सूनच्या पहिल्या सहामाहीत कमी पाऊस आणि त्यानंतर नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत जास्त पाऊस पडल्यामुळे स्थानिक अन्नपदार्थांच्या किंमतीमध्ये वाढ दिसून आली.

# Current Affairs

[irp]


चालू घडामोडी –  शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार; कबड्डीपटू रिशांक देवाडीगा-गिरीश एर्नाकचा सन्मान अण्णासाहेब पठारेंचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

  •  २०१८-१९ वर्षांसाठी राज्य सरकारच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे. राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी मुंबईत वानखेडे मैदानावर झालेल्या पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली
  •  २२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता गेट वे ऑफ इंडिया परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सर्व पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
  •  कुस्ती क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पंढरीनाथ तथा अण्णासाहेब पठारे यांना जीवन गौरव तर बाळासाहेब आवारे यांना कुस्तीसाठी उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकाचा थेट पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. याचसोबत क्रीडापटूंमध्ये पुण्याच्या अभिजित कटकेचीही क्रीडा पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.
  •  याव्यतिरीक्त प्रो-कबड्डीत महाराष्ट्राचा झेंडा उंचावणाऱ्या गिरीश एर्नाक आणि रिशांक देवाडीगा यांचीही छत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. महिलांमध्ये मुंबई शहराकडून खेळणाऱ्या सोनाली शिंगटेची निवड झालेली आहे.
  •  याचसोबत हॉकीमध्ये भारतीय संघाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व केलेल्या यवतमाळच्या आकाश चिकटेचाही या मानाच्या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. याव्यतिरीक्त केंद्र सरकारच्या खेलो इंडिया स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या राज्याच्या खेळाडूंचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

 # Current Affairs

[irp]


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम