चालू घडामोडी :19 डिसेंबर 2019

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
112

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 19 December 2019 | चालू घडामोडी : 19 डिसेंबर 2019

चालू घडामोडी – ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना साहित्य अकादमी पुरस्कार

  • ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या कविता संग्रहाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • साहित्य अकादमीने २०१९च्या वार्षिक पुरस्काराची घोषणा बुधवारी केली.
  • त्यात २३ भाषांसाठी हे पुरस्कार घोषित करण्यात आले. सात कवितासंग्र, सहा कथासंग्रह, तीन निबंध, एक कथात्तर गद्य आणि आत्मचरित्र आदी साहित्य प्रकारांचा त्यात समावेश आहे.
  • यात मराठीतून अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या कविता संग्रहाला यंदाचा साहित्य अकदमी पुरस्कार घोषित करण्यात आला.
  • गेल्या ४५ वर्षांपासून अनुराधा पाटील निष्ठेने आणि चिंतनपूर्णतेने काव्यलेखन करीत आहेत. त्यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशित आहेत. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ‘मटा’ने त्यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, ‘या पुरस्काराने आनंद झाला आहे. आजवर निष्ठेने लिहित आलेल्या कवितेचा तो सन्मान आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये शमी अव्वल

  • भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीसाठी यंदाचं वर्ष हे अतिशय चांगलं जाताना दिसत आहे.
  • २०१९ विश्वचषक, त्यानंतर घरच्या मैदानावरील कसोटी मालिकांमध्ये शमीने आपल्या भेदक माऱ्याने प्रतिस्पर्ध्यांची भंबेरी उडवली.
  • वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात मोहम्मद शमीने २०१९ वर्षातला वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनण्याचा बहुमान पटकावला आहे.
    विंडीजविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात शमीने ३ फलंदाजांना माघारी धाडलं.
  • यासोबत शमीच्या खात्यात ४१ बळी जमा झाले असून भारताला आणखी एक सामना खेळायचा आहे.
  • या सामन्यात शमीला आपलं अव्वल स्थान अधिक भक्कम करण्याची संधी आहे. यावेळी शमीने न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टला मागे टाकलं, बोल्टच्या नावावर सध्या ३८ बळी जमा आहेत.

# Current Affairs


चालू घडामोडी – वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये २५ वर्षांत पहिल्यांदा महिलेने पुरुषाला हरवले

  • जागतिक डार्ट चॅम्पियनशिपमध्ये २५ वर्षांत पहिल्यांदा कोणत्या महिलेने पुरुष खेळाडूला हरवले.
  • लंडनमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेत बुधवारी इंग्लंडच्या २५ वर्षीय फेलोन शेरोकने आपल्याच देशाच्या टेड इवेट्सला ३-२ ने हरवले.
  • डार्ट चॅम्पियनिशप १९९४ पासून हाेत आहे. २००० मध्ये पहिल्यांदा स्पर्धेत महिला खेळाडूंना सहभागी करुन घेण्यात आले.

# Current Affairs


चालू घडामोडी – रोहित एका वर्षात ७ देशांविरुद्ध शतके ठोकणारा पहिला फलंदाज बनला

  • रोहित शर्मा याने वेस्ट इंडीजविरुद्ध १३८ चेंडूंमध्ये १५९ धावा ठोकल्या त्याने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड, बांगलादेश, श्रीलंका, वेस्ट इंडीजविरुद्ध शतके झळकावली.
  • सोबत २०१९ मध्ये तिन्ही प्रकारांत मिळून त्याची एकूण १० शतके पूर्ण झाली. एका वर्षात १० आंतरराष्ट्रीय शतके करणारा तो पहिला सलामीवीर फलंदाज बनला. अशी कामगिरी करणारा भारताचा चौथा फलंदाज आहे.
  • रोहितने वनडेमध्ये आठव्यांदा १५० पेक्षा अधिक धावा काढल्या.
  • तो काेणत्याही एका टीमविरुद्ध ३ वेळा १५० पेक्षा अधिक धावा करणारा पहिला खेळाडू बनला.
  • रोहितने वनडेत ८ वेळा १५० +धावा केल्या. हादेखील विश्वविक्रम आहे. दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर असून त्याने ६ वेळा अशी कामगिरी केली .

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम