दिनविशेष १८ नोव्हेंबर | 18 November

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
182

आम्ही 18 November | १८ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 18 November . The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

१८ नोव्हेंबर: जन्म

१८९८: भारताचा अतिप्राचीन इतिहास प्रबोध चंद्र बागची यांचा जन्म.

१९०१: चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते व्ही. शांताराम यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९०)

१९०६: मिनी कार चे निर्माते अॅलेक इझिगोनिस यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९८८)

१९०९: कॅपिटल रिकॉर्ड्स चे सहसंस्थापक जॉनी मर्सर यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९७६)

१९१०: क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९६५)

१९३१: हिन्दी कवी, पत्रकार व समीक्षक, राज्यसभा सदस्य श्रीकांत वर्मा यांचा जन्म.

१९४५: श्रीलंकेचे ६ वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुख महिंदा राजपक्षे यांचा जन्म.

१८ नोव्हेंबर : मृत्यू

१७७२: मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव पेशवे यांचे निधन.

१८३०: इल्युमिनॅटि चे संस्थापक अॅडम वाईशप्त यांचे निधन.

१९३६: भारताचे वकील व राजकारणी व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांचे निधन.

१९६२: अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्‍या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक नील्स बोहर यांचे निधन.

१९९३: लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक पु. रा. भिडे तथा स्वामी विज्ञानानंद यांचे निधन.

१९९६: समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे आरंभापासूनचे नेते कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई यांचे निधन.

१९९८: भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक तारा सिंग हेर यांचे निधन.

१९९८: सातार्‍याच्या सामाजिक समाजसेवक रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले यांचे निधन.

१९९९: स्वातंत्र्यसैनिक रामसिंह रतनसिंह परदेशी यांचे निधन.

२००१: नाडेप कंपोस्ट खताचे जनक नारायण देवराव पांढरीपांडे तथा नाडेप काका यांचे निधन.

२००६: मराठी कथाकार व कवी काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचे निधन.

२०१३: भारतीय संगीतकार एस. आर. डी. वैद्यनाथन यांचे निधन.

२०१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते सी. रुधराय्या यांचे निधन.

१८ नोव्हेंबर : महत्वाच्या घटना

१४९३: ख्रिस्तोफर कोलंबस यांनी पोर्तो रिको हे बेट पहिल्यांदा पाहीले.

१८०९: फ्रान्सच्या आरमाराने बंगालच्या उपसागरात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला.

१८८२: अण्णासाहेब किर्लोस्करांचे संगीत सौभद्र हे नाटक रंगभूमीवर आले.

१९०५: लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे १७ वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणुन सूत्रे हाती घेतली.

१९१८: लाटव्हियाने आपण रशियापासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.

१९२८: वॉल्ट डिस्‍ने यांच्या मिकीमाऊस या प्रसिद्ध कार्टूनचा स्टीमबोट विली या चित्रपटाद्वारे जन्म.

१९३३: प्रभात चा पहिलाच रंगीत चित्रपट सैरंध्री प्रदर्शित झाला.

१९५५: भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली.

१९६२: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले.

१९६३: पहल्या पुश-बटण टेलिफोनची सेवा चालू झाली.

१९९२: ललित मोहन शर्मा यांनी भारताचे २४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९९३: दक्षिण अफ्रिकेत २१ राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला मान्यता दिली.

२०१५: टेनिसपटू रॉजर फेडरर ने नोव्हाक जोकोविच ला पराभूत करून एटीपी वर्ल्ड टूर लंडन च्या उपांत्यफेरीत प्रवेश केला.

२०१५: भारतीय शटलर पी. व्ही. सिंधू ला काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत स्पेनच्या कॅरोलिना मारीन हिने पहिल्याच फेरीत पराभूत केले.

२०१५: भारतीय शटलर किदाम्बी श्रीकांत ला काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत चीनच्या तियान हुवेई ने पहिल्याच फेरीत पराभूत केले.

२०१५: भारतीय शटलर जयराम चा काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत चीनच्या चेन लोंग ने पहिल्याच फेरीत पराभूत केले.

२०१५: भारतीय महिला दुहेरी शटलर जोडी ज्वाला व अश्विनी यांचा काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभव.

२०१५: भारतीय स्क़्वाॅश खेळाडू सौरव घोशाल चा बेलिबी येथे जागतिक स्क़्वाॅश स्पर्धेत ईंग्लंडच्या जेम्स विल्यस्ट्राप ने दुसऱ्या फेरीत पराभूत केले.

 

 

 

निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम