दिनविशेष : १८ मे – आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
दिनविशेष
१८ मे : जन्म
१०४८: पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी ओमर खय्याम यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर ११३१)
१६८२: छत्रपती शाहू महाराज तथामूळ नाव शिवाजी यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १७४९)
१८७२: ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार बर्ट्रांड रसेल यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९७०)
१९१३: गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते पुरुषोत्तम काकोडकर यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १९९८)
१९२०: पोप जॉन पॉल (दुसरा) यांचा जन्म. (मृत्यू: २ एप्रिल २००५)
१९३३: भारताचे ११ वे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा जन्म.
१९७९: माईनक्राफ्ट या गेम चे सहसंस्थापक जेन्स् बर्गेंस्टन यांचा जन्म.
१८ मे : मृत्यू
१८०८: बोर्नबॉन व्हिस्की चे निर्माते एलीया क्रेग यांचे निधन.
१८४६: मराठी पत्रकारितेचे पितामह बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १८१२)
१९६६: वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १९०४)
१९९७: भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १९०१)
१९९९: पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते रामचंद्र सप्रे यांचे निधन.
२००९: एल. टी. टी. ई. (Liberation Tigers of Tamil Eelam) चे संस्थापक वेल्लुपल्ली प्रभाकरन यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९५४)
२०१२: भारतीय धार्मिक नेते जय गुरूदेव यांचे निधन.
२०१७: भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचे निधन. (जन्म: २१ जुन १९५८)
१८ मे : महत्वाच्या घटना
१८०४: नेपोलिअन बोनापार्ट फ्रान्सचे सम्राट झाले.
१९१२: पूर्णपणे भारतात बनवलेला पुंडलिक हा मूकपट प्रदर्शित झाला.
१९३८: प्रभात चा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रदर्शित झाला.
१९४०: प्रभात चा संत ज्ञानेश्वर हा चित्रपट मुंबई व पुणे या ठिकाणी एकाच दिवशी प्रदर्शित झाला.
१९७२: दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.
१९७४: भारताने पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली.
१९९०: फ्रान्स च्या टीजीव्ही रेल्वे ने ५१५.३ किमी/ताशी वेगाने धावण्याचा नवीन जागतिक विक्रम केला.
१९९१: रशियाच्या सोयुझ अंतराळातुन भ्रमण करणारी हेलन शेरमन ही महिला पहिली ब्रिटिश अंतराळयात्री बनली.
१९९५: स्थानिक ठिकाणचे ५,००० रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसर्या दिवशी ती रक्कम ग्राहकास काढण्याची मुभा द्यावी, असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने दिला.
१९९८: पुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले.
२००९: श्रीलंका सरकारने एलटीटीई ला पराभूत करून सुमारे २६ वर्षच्या युद्धाला संपवले.
१८ मे – आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents