चालू घडामोडी : 18 मार्च 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 18 March 2020 | चालू घडामोडी : १८ मार्च २०२०
चालू घडामोडी – रक्तस्त्राव थांबविण्यासाठी भारतीय संशोधकांनी ‘स्टार्च’पासून एक पदार्थ विकसित केला
- गंभीर दुखापतीनंतर, जीवघेणा रक्तस्त्राव तत्काळ थांबविणे महत्त्वाचे असते. यासाठी केल्या गेलेल्या एका प्रयत्नांमधून भारतीय संशोधकांनी एक असा पदार्थ विकसित केला आहे, ज्याद्वारे रक्त गोठवण्याची प्रक्रिया वाढते आणि रक्तस्त्राव थांबतो.
- मोहाली येथल्या इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी (INST) इथल्या संशोधकांनी स्टार्चपासून ‘हेमोस्टॅट’ पदार्थ तयार केला आहे.
- जखमेवर जेल तयार करण्यासाठी एकत्रित केलेले जैविक विघटन होणारे सूक्ष्मकण विद्यमान उपलब्ध असलेल्या पर्यायांच्या तुलनेत पांच ते दहा पटीने अधिक सुधारणा देतात.
चालू घडामोडी – ICMR संस्थेनी ‘कोरोनाची चाचणी केंद्रे’ न वाढविण्याचा निर्णय घेतला
- देशातल्या लोकसंख्येचा आकार पाहता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनी (ICMR) नव्या कोरोना विषाणूच्या चाचण्यांचा विस्तार न करण्याचा निर्णय घेतला आहे.
- त्याऐवजी, समुदायातल्या लोकांमधून काही नमुने घेऊन लोकांवर नजर ठेवून विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. ज्या रुग्णांचा प्रवासाचा इतिहास नाही किंवा वास्तविक प्रकरणांशी संपर्क साधला गेला नाही त्यांची चाचणी करणे व्यर्थ ठरणार आहे.
- योजनेनुसार, ICMRच्या इंटेग्रेटेड डिसीज सर्वीलन्स प्रोग्राम लॅब’ या प्रयोगशाळांमध्ये दर आठवड्याला यादृच्छिकपणे 10 नमुने तपासले जाणार आहे.
- सरकारकडे सध्या दररोज 6000 चाचण्या करण्याची क्षमता असून ते 1.5 लक्ष टेस्टिंग किट मागविलेल्या आहेत तसेच आणखी दशलक्ष किट पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)
- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) याची स्थापना 1911 साली करण्यात आली, जी जगातल्या सर्वात जुन्या वैद्यकीय संशोधन संस्थांपैकी एक आहे.
- त्याचे नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे. ही संस्था जागेवरच निदान, उपचार प्रक्रिया आणि पद्धती अश्या विविध वैद्यकीय पैलूंवर शोधकार्य चालवीत आहे.
चालू घडामोडी – मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी भूषण धर्माधिकारी
- मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी भूषण धर्माधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग हे २३ फेब्रुवारीला सेवानिवृत्त झाल्यानंतर न्या. धर्माधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- मुंबई प्रभारी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांची अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आदेशानुसार, केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयानं आज नियुक्तीसंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली.
- मुंबईउच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग हे २३ फेब्रुवारीला सेवानिवृत्त झाल्यानंतर न्या. धर्माधिकारी यांना प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून नेमण्याची अधिसूचना मंत्रालयाने २४ फेब्रुवारीला जारी केली होती. त्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्या. धर्माधिकारी यांना मुख्य न्यायमूर्ती म्हणून नेमण्याची शिफारस केली होती. त्यानंतर आज केंद्र सरकारने त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केली.
- मुंबईउच्च न्यायालयात सध्या सर्वात वरिष्ठ असलेले न्या. धर्माधिकारी २८ एप्रिल रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. बी. एस्सी (बायोलॉजी), बीए (इंग्रजी साहित्य) व एलएलबी असे शिक्षण घेतलेले धर्माधिकारी यांनी १९८०पासून नागपूरमध्ये वकिली सुरू केली. १५ मार्च २००४ रोजी अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून उच्च न्यायालयाच्या सेवेत रुजू झाल्यानंतर १२ मार्च २००६ रोजी त्यांना न्यायमूर्तीपदी बढती मिळाली.
चालू घडामोडी – राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशन
- महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे जिथे कुपोषणाशी लढण्याचे कार्य मिशनसारखे राबवण्यात येत आहे आणि याच उद्देशाने राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशनची स्थापना करण्यात आली आहे. आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा २००५ मध्ये आणि दुसरा टप्पा नोव्हेंबर २०११ मध्ये आखण्यात आला होता. या मिशनचे मुख्य उद्दिष्ट महाराष्ट्रातील कुपोषण समस्या कमी करणे असून त्यासाठी गर्भधारणेपासून पहिल्या १००० दिवस म्हणजेच वजा ९ ते २४ महिन्यांच्या कालावधीवर लक्ष केंद्रित केले जाते.
- राजमाता जिजाऊ मिशन ही एक तांत्रिक आणि सल्लागार स्वायत्त संस्था असून संपूर्णत: युनिसेफच्या अर्थसाहाय्यावर चालते. याचा मुख्य हेतू महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आय सी डी एस आयुक्तालय यांच्या मध्ये संवाद आणि सहयोग घडवून आणणे हा आहे.
- महिला आणि बालक विकास विभाग आणि या मिशनच्या कार्यात कोणताही संभ्रम आणि पुनरावृत्ती होऊ नये याकरिता मिशनची भूमिका स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याने अगदी विचारपूर्वक निर्णय घेतला की या मिशनला शासकीय अर्थसाहाय्य देण्यात येणार नाही आणि या मिशनतर्फे कोणत्याही योजनांची थेट अमंलबजावणी करण्यात येणार नाही. यामुळे मिशनला स्वतंत्रपणे आणि स्वायत्तपणे कार्य करणे शक्य होते. या मिशनची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:
- पहिले १००० दिवसांचे अनन्य साधारण महत्व पटवून देणे.
एक ‘विचार गट’ म्हणून कार्य करणे आणि शासनाला धोरण निश्चिती करण्याकरिता वास्तविक पुराव्यावर आधारीत सल्ला देणे.
कुपोषण कमी करण्याचे सामाइक उद्दिष्ट साध्य करण्याकरिता विविध विभांगात एककेंद्राभिमुखता/एकवाक्यता आणणे. - या भूमिकेला अनुसरुन, या मिशनने विविध विभांगासाठी बहु-क्षेत्रीय कृती कार्यक्रम तयार केला आहे, ज्यात कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी विविध विभाग प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे कसे सहाय्य करू शकतात याचा आराखडा दिलेला आहे.
# Current Affairs
चालू घडामोडी – जागतिक आरोग्य संघटनेकडून मोदी सरकारचे कौतुक, म्हणाले “भारताच्या कामगिरीने प्रभावित”.
- करोनामुळे जगभरामध्ये दहशत पसरली आहे. अनेक देशांनी मागील काही वर्षांमध्ये पाहिले नव्हते इतके मृत्यू या साथीच्या रोगामुळे झाले आहेत. अनेक देशांमधील सरकारी यंत्रणांनी करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु केलं आहे. मात्र करोनाग्रस्तांची जगभरातील संख्या एक लाख ८२ हजारहून अधिक झाली आहे. हा रोग आणखीन पसरु नये म्हणून वेगवेगळ्या देशांमधील अनेक शहरे पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
- भारतामध्येही करोनाचे शंभरहून अधिक रुग्ण अढळून आले आहेत. मात्र भारत सरकारने करोनाला थांबवण्यासाठी सुरु केलेले प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी झाल्याची चिन्हे दिसत आहेत. यावरुनच आता जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी हेन्क बेकेनडॅम यांनी करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नाचे कौतुक केलं आहे.
- “या आजारासंदर्भात भारत सरकारने आणि पंतप्रधान कार्यालयाने घेतलेले निर्णय आणि सुरु असणारे काम हे प्रचंड मोठ आहे. या कामाने मी प्रभावित झालो आहे. याच निर्णयांमुळे करोनाला थांबवण्यात भारत अद्याप तरी यशस्वी ठरला आहे. प्रत्येक यंत्रणा काम करत आहे हे पाहून नक्कीच प्रभावित झालो आहे,” असं मत बेकेनडॅम यांनी एएनआयशी बोलताना व्यक्त केलं आहे. बेकेनडॅम यांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची (आयसीएमआर) कौतुक केलं आहे.
- “भारताकडे संशोधनाची चांगली क्षमता आहे. खास करुन आयसीएमआर आणि आरोग्य विभागाकडे आरोग्यसंदर्भात संशोधनाची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी या विषाणूवर संशोधन सुरु केलं आहे. आता भारत हा संशोधक देशांमध्ये गणला जाईल,” असा विश्वास बेकेनडॅम यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला.
# Current Affairs
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
2 total views , 1 views today
Table of Contents