दिनविशेष : १८ जानेवारी

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
214

  १८ जानेवारी: जन्म

१८४२: न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९०९)

१८५४: अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचा मदतनीस तसेच त्यांचा पहिल्या दुरध्वनी संभाषणातील भागीदार थॉमस वाॅॅॅटसन यांचा जन्म.

१८८९: नाट्यछटाकार शंकर काशिनाथ गर्गे उर्फ दिवाकर यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑक्टोबर १९३१)

१८८९: कन्नड कवी व विचारवंत देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १९७५ – बंगळुरू, कर्नाटक)

१८९२: अमेरिकन अभिनेता ऑलिव्हर हार्डी यांचा जन्म.

१९३३: अमेरिकन संशोधक रे डॉल्बी यांचा जन्म.

१९३३: भारताचे २७ वे सरन्यायाधीश जगदीश शरण वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल २०१३)

१९५२: चंदन तस्कर वीरप्पन यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर २००४)

१९६६: रशियन बुद्धिबळपटू अलेक्झांडर खलिफमान यांचा जन्म.

१९७२: भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांचा जन्म.

१९९५: साहित्यिक, कवी आणि शिक्षणतज्ज्ञ वि. द. घाटे यांचा जन्म.

१८ जानेवारी : मृत्यू

१९३६: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक रुडयार्ड किपलिंग यांचे निधन. (जन्म: ३० डिसेंबर १८६५)

१९४७: भारतीय अभिनेता आणि गायक के. एल. सैगल उर्फ कुंदनलाल सैगल यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १९०४)

१९६७: कृषितज्ज्ञ डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन.

१९७१: भारीतय वकील आणि संसद सदस्य बॅरीस्टर नाथ पै यांचे निधन.

१९९३: कृतिशील विचारवंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचे निधन. (जन्म: १२ मे १९०५)

१९९६: अभिनेते आणि राजकीय नेते एन. टी. रामाराव यांचे निधन. (जन्म: २८ मे १९२३)

२००३: हिंदी साहित्यिक आणि कवी हरिवंशराय बच्चन यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १९०७)

१८ जानेवारी : महत्वाच्या घटना

१७७८: कॅप्टन जेम्स कूक हे हवाई बेटांवर पोचणारे पहिले युरोपियन ठरले.

१९११: युजीन बी. इलाय यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.

१९५६: संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईमध्ये गोळीबार. यात १० लोक ठार, २५० जखमी, दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू लावण्यात आला.

१९६४: न्यूयॉर्क येथे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन झाले.

१९७४: इजिप्त व इस्त्राएल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या.

१९९७: नॉर्वेच्या बोर्ग औसलँडने एकट्याने अटलांटिक महासागर पार केला.

१९९८: मदनमोहन पूंछी यांनी भारताचे २८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९९९: नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.

२००५: एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले.


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम