चालू घडामोडी : 18 फेब्रुवारी 2020

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
132

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs :18 FEBRUARI 2020| चालू घडामोडी :18 फेब्रुवारी 2020

चालू घडामोडी – वारसा वास्तूंच्या पुनरुज्जीविकरणासाठी कर्नाटक सरकारची ‘समरक्षने’ योजना

  • राज्यभरातल्या ऐतिहासिक वारसा असलेल्या असूचीबद्ध वास्तूंच्या पुनरुज्जीविकरणासाठी कर्नाटक राज्य सरकारने नवी ‘समरक्षने’ योजना आणली आहे.
  •  भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) किंवा कर्नाटक पुरातत्व विभागाकडून नोंद न घेण्यात आलेल्या ऐतिहासिक महत्त्व असलेली स्मारके आणि इमारतींचे जतन करणे हा या योजनेचा उद्देश्य आहे.

ठळक बाबी

  •  राज्यभरातल्या 25,000 हून अधिक मंदिरे, मशिदी, चर्च, इमारती आणि इतर स्मारकांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
  • धर्मस्थला मंजूनाथेश्वरा धर्मस्थान ट्रस्टने (SDMDT) गेल्या 20 वर्षात 176 मंदिरांचे जीर्णोद्धार केले आहे.
  •  गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात राज्य सरकारने स्मारक स्थळांच्या संशोधनात्मक कार्यासाठी 3-डी मॅपिंग तंत्रज्ञानाद्वारे नकाशा तयार करण्यासाठी 844 संरक्षित स्मारकांची ओळख पटवली.

कर्नाटक राज्य

  • कर्नाटक हे दक्षिण भारतातले एक राज्य आहे. राज्याची स्थापना दिनांक 1 नोव्हेंबर 1956 रोजी ‘म्हैसूर राज्य’ म्हणून झाली; 1973 साली या राज्याला वर्तमान नाव मिळाले. कन्नड ही राज्याची मुख्य भाषा आहे. राज्याची राजधानी बेंगळुरू हे शहर आहे.
  •  राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र व गोवा हे राज्य आहे, उत्तरेला महाराष्ट्र, पूर्वेला आंध्रप्रदेश आणि दक्षिणेला केरळ व तामिळनाडू ही राज्ये येतात.

[irp]

# Current Affairs


चालू घडामोडी – 70 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात डॉ. एस जयशंकर इंडियन पॅव्हेलियनचे उद्‌घाटन करणार

  •  70 वा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 20 फेब्रुवारी ते 1 मार्च या काळात जर्मनीतल्या बर्लिन येथे आयोजित करण्यात आला आहे. परदेशी बाजारपेठेत भारतीय चित्रपट लोकप्रिय व्हावेत तसेच नव्या व्यवसाय संधी प्राप्त व्हाव्यात यासाठी या महोत्सवात इंडियन पॅव्हेलियनद्वारे मंच प्रदान करण्यात आला आहे.
  • परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर या इंडियन पॅव्हेलियनचे उद्‌घाटन करतील. बर्लिन महोत्सवासाठी यावर्षी तीन भारतीय फिचर फिल्म आणि एका लघु माहितीपटाची निवड करण्यात आली आहे. पुष्पेंद्र सिंग यांचा ‘लिपला और सत्त गीत’, प्रतीक वत्स यांचा ‘इब अले ओऊ’, अक्षय इंडीकर यांचा ‘स्थलपुराण’ तसेच एकता मित्तल यांचा ‘गुमनाम दिन’ या माहितीपटाचा यात समावेश आहे.
  •  माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारतीय उद्योग महासंघासमवेत या चित्रपट महोत्सवात सहभागी होत आहेत. भारतीय प्रतिनिधी मंडळ इज्रायल, दक्षिण आफ्रिका, न्युझीलंड, स्पेन, ब्राझील, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, अमेरिका या देशातल्या अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेणार आहे.
    [irp]

# Current Affairs


चालू घडामोडी –  डिफेन्स स्टडीज्‌ ॲन्ड ॲनलिसिस संस्थेला मनोहर पर्रिकर यांचे नाव

  •  संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्थेला माजी संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे नांव देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आता या संस्थेचे नाव मनोहर पर्रिकर संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्था असे राहील.
  •  9 नोव्हेंबर 2014 ते 14 मार्च 2017 या काळात पर्रिकर यांनी संरक्षण मंत्री पदाचा कार्यभार सांभाळला. या काळात पठाणकोट आणि उरी हल्ल्यासारख्या खडतर आव्हानांना तोंड द्यावे लागले मात्र पर्रिकर यांनी धाडसी पावले उचलत त्याला प्रत्युत्तर दिले.
  • त्यांच्या कार्यकाळात भारताच्या संरक्षण सामर्थ्यात भर घालणारे तसेच स्वदेशी संरक्षण उत्पादनाला चालना देणारे अनेक निर्णय झाले. वन रँक वन पेन्शन या अनेक वर्षापासूनच्या मागणीच्या अंमलबजावणी प्रती पर्रिकर यांचे मोठे योगदान राहिले.
    [irp]

# Current Affairs


चालू घडामोडी – 2020-21 या वर्षापासून RBIचे लेखा वर्ष आणि सरकारचे वित्त वर्ष एकच असणार

  •  भारतीय रिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष (अकाउंटिंग ईयर) आणि भारत सरकारचे वित्त वर्ष  2020-21 या वर्षापासून एकच करण्याची शिफारस समितीने केली आहे.
  • सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष 1 जुलै ते 30 जून असून, वित्त वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे आहे. या निर्णयानुसार, दोनही वर्षे जुळविल्यास रिझर्व्ह बँकेला अंतरिम लाभांश देण्याची गरज पडणार नाही.
  • भारतीय रिझर्व्ह बँक
  • भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारत सरकारने स्थापना केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे.
  •  RBIची स्थापना दिनांक 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) येथे आहे. RBIचे 1949 साली भारत सरकारद्वारे राष्ट्रीयीकरण गेले आहे.
  •  RBI वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण जाहीर करते.

 भारतीय रिझर्व बँकेचे प्रमुख उद्देश 

  • भारतीय चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे, भारताचा FDI प्रवाह (गंगाजळी) राखणे, भारताची आर्थिक स्थिती राखणे, भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.
  • RBIने शैली आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या ‘दि प्राॅब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्यूशन’ या पुस्तकातून घेतले
  • सर ओस्बॉर्न स्मिथ हे RBIचे पहिले गव्हर्नर (1 एप्रिल 1935 ते 30 जून 1937) होते. सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय मूल निवासी गव्हर्नर (तिसरे गव्हर्नर) दि. 11 ऑगस्ट 1943 रोजी या पदावर विराजमान झाले.
  •  वर्तमानात, शक्तीकांत दास गव्हर्नर आहेत. बी. पी. कानुंगो, एन. एस. विश्वनाथन, महेश कुमार जैन आणि मायकल पात्रा असे चार डेप्युटी गव्हर्नर आहेत.

 # Current Affairs

[irp]

 


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम