दिनविशेष : १८ डिसेंबर [आंतरराष्ट्रीय स्थलांतरीत दिन]

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
144

१८ डिसेंबर: जन्म

१६२०: जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक हेन्‍रिच रॉथ यांचा जन्म. (मृत्यू: २० जून १६६८)

१८५६: इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ सर जे. जे. थॉमसन यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९४०)

१८७८: सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ स्टालिन यांचा जन्म. (मृत्यू: ५ मार्च १९५३)

१८८७: भोजपुरी भाषेचे शेक्सपिअर भिखारी ठाकूर यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै १९७१)

१८९०: एफ. एम. रेडिओचे संशोधक ई. एच. आर्मस्ट्राँग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी १९५४)

१९४६: ड्रीमवर्क्सचे सहसंस्थापक स्टीव्हन स्पिलबर्ग यांचा जन्म.

१९५५: भारतीय उद्योगपती विजय मल्ल्या यांचा जन्म.

१९६१: माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांचा जन्म.

१९६३: अमेरिकन अभिनेते व निर्माते ब्रॅड पिट यांचा जन्म.

१९७१: पत्रकार बरखा दत्त यांचा जन्म.

१९७१: स्पॅनिश लॉन टेनिस खेळाडू अरांताक्सा सँचेझ व्हिकारिओ यांचा जन्म

१८ डिसेंबर: मृत्यू

१८२९: फ्रेंच शास्त्रज्ञ जीन बाप्टिस्टे लॅमार्क यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १७४४)

१९७३: भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरू आणि तत्त्वज्ञ अल्लामाह रशीद तुराबी  यांचे निधन. (जन्म: ९ जुलै १९०८)

१९८०: रशियाचे पंतप्रधान अलेक्सी कोसिजीन यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १९०४)

१९९३: चित्रपट दिग्दर्शक राजा बारगीर यांचे निधन.

१९९५: राष्ट्रीय कीर्तनकार कमलाकरबुवा औरंगाबादकर यांचे निधन.

२०००: इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी यांचे निधन.

२००४: भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विजय हजारे यांचे निधन. (जन्म: ११ मार्च १९१५)

२०११: चेक रिपब्लिकचे पहिले अध्यक्ष वाक्लाव हेवल यांचे निधन. (जन्म: ५ ऑक्टोबर १९३६)

१८ डिसेंबर: महत्वाच्या घटना

१२७१: कुबलई खान यांनी साम्राज्याचे नाव युआन करून राजवंश सुरू केले.

१७७७: अमेरिकेत पहिले थँक्सगिव्हिंग साजरे करण्यात आले.

१८३३: रशियन साम्राज्याचे राष्ट्रगीत गॉड सेव्ह द झार! हे पहिल्यांदा गायले गेले.

१९३५: श्रीलंकेत लंका सम समाज पार्टी ची स्थापना केली.

१९५८: जगातील पहिले संचार उपग्रह प्रोजेक्ट स्कोर प्रक्षेपित करण्यात आले.

१९५९: ब्रिटीश रॉयल नेव्ही मध्ये एचएमएस हार्मिस हि युद्धनौका दाखल झाली.

१९७८: डॉमिनिक देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९८९: सव्यसाची मुकर्जी यांनी भारताचे २० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९९५: अहिंसक मार्गाने सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या प्रयत्‍नांबद्दल पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार टांझानियाचे माजी अध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांना जाहीर.

२००६: संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या.

२०१६: इंडोनेशियन हवाई दलाचे वाहतूक विमान पापुआ मधील दुर्गम भागात प्रशिक्षण व्यायाम करताना डोंगरावर क्रॅश झाले, त्यात विमानातील सर्व जण ठार झाले.

२०१६: भारतीय ज्युनिअर हॉकी टीम ने बेल्जियम ला हरवून जुनिअर वर्ल्ड हॉकी कप जिंकला.


आंतरराष्ट्रीय स्थलांतरीत दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम