दिनविशेष : 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन
१७ नोव्हेंबर : जन्म
०००९: रोमन सम्राट व्हेस्पासियन यांचा जन्म.
१७४९: कॅनिंग चे निर्माते निकोलस एपर्टीट यांचा जन्म.
१७५५: फ्रान्सचा राजा जन्म लुई (अठरावा) यांचा जन्म.
१९०१: युरोपियन कमिशनचे पहिले अध्यक्ष वॉल्टर हॉलस्टेन यांचा जन्म.
१९०६: होंडा मोटर कंपनी चे सहसंस्थापक सोईचिरो होंडा यांचा जन्म.
१९२०: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मिथुन गणेशन यांचा जन्म.
१९२३: केप व्हर्दे देशाचे पहिले अध्यक्ष अरिसिदास परेरा यांचा जन्म.
१९२५: अमेरिकन अभिनेता रॉक हडसन यांचा जन्म.
१९३२: अभिनेत्री शकुंतला महाजन तथा बेबी शकुंतला यांचा जन्म.
१९३८: लेखक, नाटककार, निर्माते रत्नाकर मतकरी यांचा जन्म.
१९८२: भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाण यांचा जन्म.
१७ नोव्हेंबर: मृत्यू
१८१२: द टाईम्स वृत्तपत्र चे संस्थापक जॉन वॉल्टर यांचे निधन.
१९२८: स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी लाला लजपतराय यांचे निधन.
१९३१: संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचे निधन.
१९३५: भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य गोपाळ कृष्ण देवधर यांचे निधन.
१९६१: साहित्यिक व समीक्षक कुसुमावती आत्माराम देशपांडे यांचे निधन.
२०१२: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निधन.
२०१२: भारतीय उद्योगपती पॉंटि चड्डा यांचे निधन.
२०१५: विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचे निधन.
२०१५: कर्नल संतोष महाडिक कुपवाडा श्रीनगर येथे कोम्बिंग ऑपरेशनचे नेतृत्व करताना शहीद.
२०१२ : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन.
१७ नोव्हेंबर : महत्वाच्या घटना
१८३१: ग्रॅन कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्वेडोर व व्हेनेझुएला असे दोन देश अस्तित्त्वात आले.
१८६९: भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणार्या सुएझ कालव्याचे उद्घाटन झाले. या कालव्याचे बांधकाम मात्र १० वर्षे आधीच पूर्ण झाले होते.
१९३२: तिसर्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
१९३३: अमेरिकेने सोविएत युनियनला मान्यता दिली.
१९५०: ल्हामो डोंड्रब हे अधिकृतपणे १४वे दलाई लामा बनले.
१९९२: देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका इंदिराबई हळबे यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.
१९९२: महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.
१९९४: रशियाच्या मीर या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेर्या पूर्ण करून नवा विक्रम केला.
१९९६: पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) सेन्द्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांची अहमदाबादच्या नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेस चे फेलो म्हणून निवड.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents