दिनविशेष : १७ मे – जागतिक उच्च रक्तदाब दिन / जागतिक माहिती संस्था दिन

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
341

१७ मे: जन्म

१७४९: देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर एडवर्ड जेन्‍नर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १८२३)
१८६५: मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्म. (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९५९)
१८६८: डॉज मोटर कंपनी चे संस्थापक होरॅस डॉज यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९२०)
१९३४: ऍपल इन्क कंपनी चे सहसंस्थापक रॉनाल्ड वेन यांचा जन्म.
१९४५: लेगस्पिनर भागवत चंद्रशेखर यांचा जन्म.
१९५१: गझल गायक पंकज उदास यांचा जन्म.
१९६६: सद्दाम हुसेन यांचा मुलगा कुसय हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै २००३)
१९७९: अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा जन्म.

 

१७ मे  : मृत्यू

१८८६: डीयेर एंड कंपनीची स्थापक जॉन डीयेर यांचे निधन. (जन्म: ७ फेब्रुवारी १८०४)
१९७२: शिल्पकार रघुनाथ कृष्ण फडके यांचे निधन.
१९९६: कसोटी क्रिकेटपटू रुसी शेरियर मोदी यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १९२४)
२०१२: अमेरिकन गायिका डोना समर यांचे निधन. (जन्म: ३१ डिसेंबर १९४८)
२०१४: द लीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स चे स्थापक सी. पी. कृष्णन नायर यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९२२)

 

१७ मे  : महत्वाच्या घटना

१७९२: न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना झाली.
१८७२: इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला.
१९४०: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी बेल्जियममधील ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.
१९४९: भारताचा राष्ट्रकुलामधे राहण्याचा निर्णय.
१९८३: लेबाननमधुन सैन्य काढुन घेण्याच्या करारावर लेबानन, इस्त्रायल आणि अमेरिकेने सह्या केल्या.
१९९०: जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकता मानसोपचार रोगांच्या यादीतून काढून टाकले.
१९९५: जॅक शिराक फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.
२००४: अमेरिकेतील पहिला कायदेशीर समलिंगी विवाह झाला.

 

१७ मे – जागतिक उच्च रक्तदाब दिन / जागतिक माहिती संस्था दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम