चालू घडामोडी : 17 फेब्रुवारी 2020

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
106

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या. 

Visit Regularly our site to check Current Affairs  

Current Affairs :17 FEBRUARI 2020 | चालू घडामोडी : 17 फेब्रुवारी 2020

चालू घडामोडी – अरविंद केजरीवाल झाले तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री 

  •  रामलीला मैदानावर घेतली शपथमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना अरविंद केजरीवाल
  •  विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसचा दणदणीत पराभव केल्यानंतर आम आदमी पक्ष सलग तिसऱ्यांदा सत्तेवर विराजमान झाला आहे.
  •  ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची, तर इतर सहा नेत्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. दिल्लीतील रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला.
  • या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, इतर राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासह दिल्लीच्या विकासात योगदान देणाऱ्या डॉक्टर, रिक्षा चालक, सफाई कर्मचारी, कामगार, बस मार्शल अग्निशमन दलाचे जवान आदींना विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं.
  • दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी रविवारी तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

# Current Affairs

[irp]


चालू घडामोडी –  लष्करातील महिला अधिकाऱयांना आता मिळणार कायमची पोस्टिंग

  • लष्करातील महिला अधिकाऱयांना आता कायमची पोस्टिंग देण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.
  •  लष्करातील महिलांना कायमची पोस्टिंग दिल्यास त्याचा शत्रू राष्ट्र लाभ घेऊ शकतो. त्यामुळे महिलांना कायमची पोस्टिंग (स्थायी कमिशन) देता येणार नाही, असे मोदी सरकारचे म्हणणे होते. 2010 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने महिला अधिकाऱयांच्या बाजूने निर्णय दिला होता. त्याला मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
  • त्यावर सर्वोच्च न्यायालयाने महिलांना कायमची पोस्टिंग देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. महिलांना कायमस्वरूपी पोस्टिंग मिळाली पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
  •  तसेच महिला पुरुषांबरोबर खांद्याला खांदा मिळवून काम करत आहेत. 30 टक्के महिला लढाऊ क्षेत्रात आताही तैनात आहेत. केंद्राने आपल्या दृष्टिकोन आणि मानसिकतेत बदल करायला हवा, लष्करात खरी समानता यायला हवी, असेही केंद्र सरकारला न्यायालयाने सुनावले.
    [irp]

# Current Affairs


चालू घडामोडी – विदेशात सुरू होणार पहिले योग विद्यापीठ

  • भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ अमेरिकेत चालू वर्षात संशोधनासह स्वतःचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणार आहे. या अभ्यासक्रमासाठी एप्रिलपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती विद्यापीठ अधिकाऱयांनी दिली आहे. विवेकानंद योग विद्यापीठ 50 लाख डॉलर्सच्या अर्थसंकल्पासह लॉस एंजिलिस शहरात उभारण्यात आले आहे.
  •  केस वेस्टर्न विद्यापीठातील प्राध्यापक श्रीनाथ यांना योग विद्यापीठाशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर भारतीय योगगुरु एच.आर. नागेंद्र याचे अध्यक्ष असतील. अभ्यासक्रम ऑगस्ट 2020 पासून सुरू होणार आहे. विद्यापीठाने योगवर आधारित उच्चशिक्षण उपलब्ध करण्यासाठी नोव्हेंबर 2019 मध्ये ब्युरो फॉर प्रायव्हेट पोस्टसेकंड्री एज्युकेशन, कॅलिफोर्नियाकडून अधिकृत मान्यता प्राप्त केल्याच्या तीन महिन्यांमध्येच ही घोषणा केली आहे.
  •  ‘वायु’ची संकल्पना नासाचे माजी वैज्ञानिक नागेंद्र यांचीच आहे. नागेंद्र हे मागील 4 दशकांपासून योगप्रसार तसेच त्याच्या शिक्षणासाठी कार्यरत आहेत. भारतात 2002 मध्ये पहिले योग विद्यापीठ स्थापन करण्यात आले होते. त्यानंतरच नागेंद्र यांनी योगवर आधारित उच्चशिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता. विद्यापीठामुळे अमेरिकेतील हजारो योगशिक्षकांना मदत मिळणार असल्याचे विधान विद्यापीठाच्या संचालक मंडळाचे सदस्य प्रेम भंडारी यांनी केले आहे
    [irp]

# Current Affairs


चालू घडामोडी – स्थलांतरित  प्रजातीबाबत संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेचे तीन वर्षासाठीचे अध्यक्षपद भारताने स्वीकारले

  •  स्थलांतरित प्रजातींच्या 13 व्या सीओपी परिषदेला आज गांधीनगर येथे सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या परिषदेचे उद्‌घाटन केले. वरिष्ठ सरकारी अधिकारी, 130 देशातले पर्यावरण तज्ञ, कार्यकर्ते, संशोधक या परिषदेला उपस्थित आहेत.
  • जैवविविधतेच्या मुद्यांवर सामुहिक दृष्टीकोनावर लक्ष केंद्रित करत भारताने येत्या तीन वर्षासाठी सीओपी अध्यक्षपद स्वीकारले. स्थलांतरित प्रजातीविषयीची ही परिषद भारतासाठी महत्वाची आहे असे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अध्यक्षपद स्वीकारताना सांगितले
  •  स्थलांतरीत पक्षी, जल प्रजाती, त्यांच्या प्रवासाच्या मार्गावर धोक्यात असून त्यांच्या संरक्षणासाठी सर्व देशांनी एकजुटीने काम करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली

 # Current Affairs

[irp]


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम