चालू घडामोडी : 17 डिसेंबर 2019

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
127

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 17 December 2019 | चालू घडामोडी : 17 डिसेंबर 2019

चालू घडामोडी – अभिनेते श्रीराम लागू यांचं निधन झाले आहे. ते 92 वर्षाचे होते.

  •  वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली व नंतर भालबा केळकर यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यांसमवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली.
  •  1950 च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात पाच वर्षे काम केले . नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले.
  •  1960 च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता.
  • भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते. शेवटी 1969 मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली.
  •  कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर सिंहासन, पिंजरा, मुक्ता सारख्या अनेक चित्रपटांतून कामही केले.
  • लागू यांना फिल्मफेअर पुरस्कार, कालिदास सन्मान, चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील योगदानाबद्दल मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, राजश्री शाहू कला गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
  • डॉ. श्रीराम लागू यांचे निवडक लेख, मुलाखती, भाषणे इत्यादींचा संग्रह असलेले ‘रूपवेध’ तसेच ‘लमाण’ हे डॉ. श्रीराम लागू यांचे आत्मचरित्र ही पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – लैंगिक समानतेत भारत ११२ व्या क्रमांकावर

  • लैंगिक समानतेत भारत जागतिक पातळीवर चार अंकांनी घसरून ११२ व्या क्रमांकावर गेला असून महिलांचे आरोग्य, आर्थिक सहभाग या दोन निकषांत भारत खालून पाचव्या क्रमांकावर आहे.
  • आइसलँड जगात लैंगिक समानतेत पहिल्या क्रमांकावर असून भारत गेल्या वर्षी १०८ व्या क्रमांकावर होता तो आता ११२ व्या क्रमांकावर गेला आहे. 
  • जागतिक आर्थिक मंचाने लैंगिक समानता अहवाल जाहीर केला असून त्यात चीन १०६, श्रीलंका, १०२, नेपाळ १०१, ब्राझील ९२, इंडोनेशिया ८५, बांगलादेश ५० या प्रमाणे क्रमवारी आहे.
  • येमेन सर्वात शेवटच्या १५३ क्रमांकावर असून इराक १५२ तर पाकिस्तान १५१ व्या क्रमांकावर आहे.
  • जागतिक आर्थिक मंचाने म्हटले आहे की, जगात लैंगिक समानता आणण्यासाठी २०१९ पासून ९९.५ वर्षे लागतील.
  • २०१८ मधील क्रमवारीनुसार १०८ वर्षे लागतील. याचा अर्थ महिला व पुरूष यांच्यात आरोग्य, शिक्षण, काम, राजकारण यात खूप दरी आहे.
  • या वर्षी लैंगिक समानतेत जी प्रगती झाली आहे ती राजकारणातील महिलांच्या मोठय़ा प्रमाणावरील सहभागामुळे आहे. राजकीय क्षेत्रातील असमानता दूर करण्यासाठी गेल्या वर्षीच्या स्थितीनुसार १०७ वर्षे लागली असती तर आता ९५ वर्षे लागणार आहेत.
  • आर्थिक पातळीवर दरी भरून काढण्यासाठी गेल्या वर्षीच्या परिस्थितीत २०२ वर्षे लागणार होती ती आता २५७ वर्षे लागतील. याचा अर्थ आर्थिक पातळीवर लैंगिक असमानता वाढली आहे. २००६ मध्ये जागतिक आर्थिक मंचाने लैंगिक समानता क्रमवारी सुरू केली तेव्हा भारताचा ९८ वा क्रमांक होता. तेव्हापासून भारताची एकूण क्रमवारीत घसरण झाली आहे.

महिलांना कमी वेतन

  • भारताने महिलांच्या राजकीय सक्षमीकरणात १८ वा क्रमांक पटकावला असला तरी आरोग्यात १५० वा तर महिलांच्या आर्थिक सहभागात १४९ वा क्रमांक लागला आहे. शिक्षणातील लैंगिकत समानतेत भारत ११२ व्या क्रमांवर आहे.
  • आर्थिक संधींचे महिलांतील प्रमाण पुढीलप्रमाणे आहे- भारत ३५.४ टक्के, पाकिस्तान ३२.७ टक्के, येमे २७.३ टक्के, सीरिया २४.९ टक्के, इराक २२.७ टक्के. कं पन्यांच्या संचालक मंडळात भारतात महिलांना कमी स्थान असून ते प्रमाण १३.८ टक्के तर चीनमध्ये सर्वात कमी ९.७ टक्के आहे.
  • महिलांचे नेतृत्वातील प्रमाण पाहता भारत १३६ व्या क्रमांकावर असून हे प्रमाण १४ टक्के आहे तर व्यावसायिक व तंत्रज्ञान व्यावसायिकात तीस टक्के महिला आहेत.
  • राजकीय सक्षमीकरणात भारत १२२ व्या क्रमांकावर आहे. कारण संसदेत १४.४ टक्के महिला आहेत. मंत्रिमंडळातील समावेशात भारत ६९ व्या क्रमांकावर असून महिलांचे प्रमाण २३ टक्के आहे.
  • भारतात महिलांना पुरुषांच्या तुलनेत एकपंचमांश वेतन मिळते त्यामुळे त्या निकषात भारत १४५ वा आहे. कामगार बाजारपेठेत महिलांचे प्रमाण एक चतुर्थाश असून पुरुषांचे प्रमाण ८२ टक्के आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – ल.ज. मनोज नरवणे हे नवे लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारणार

  •  लष्करप्रमुख बिपीन रावत ३१ डिसेंबर रोजी होणार सेवा निवृत्त.
  • लष्करप्रमुख बिपीन रावत ३१ डिसेंबर रोजी सेवा निवृत्त होणार आहेत. आता या पदावर ले. ज. मनोज मुकुंद नरवणे यांची वर्णी लागणार आहे.
  •  एक मराठी माणूस लष्करप्रमुख या पदावर बसणार आहे.
  •  लफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी लष्कराच्या उपप्रमुखपदाच्या कार्यभार १ सप्टेंबर २०१९ रोजी स्वीकारला होता.
  •  आता बिपीन रावत यांच्यानंतर भारताचे लष्करप्रमुख मनोज नरवणे कार्यभार स्वीकारणार आहेत.

# Current Affairs


चालू घडामोडी – मराठमोळ्या स्मृतीला ICC कडून मिळाला बहुमान 

  • टीम इंडियाची मराठमोळी सलामीवीर स्मृती मंधाना हिला ICC च्या २०१९ या वर्षातील एकदिवसीय आणि टी २० संघात स्थान मिळाले आहे.
  • वर्षभरात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या सर्वोत्तम खेळाडूंचा मिळून ICC वर्षाअखेरीस एक संघ जाहीर करते.
  • एकदिवसीय आणि टी २० अशा दोनही संघात भारताच्या स्मृती मंधानाचा समावेश करण्यात आला आहे.
  • समृतीने वर्षभरात ५१ एकदिवसीय सामने तर ६६ टी २० सामने खेळले.
  • तिने अनुक्रमे २ हजार २५ आणि १ हजार ४५१ धावा केल्या.
  • तिच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर ICC कडून तिला हा बहुमान मिळाला आहे.
  • समृतीव्यतिरिक्त शिखा पांडे, झुलन गोस्वामी आणि पूनम यादव यांचाही वर्षाच्या एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे.
  • तर दीप्ती शर्मा आणि राधा यादव या दोघींनी टी २० संघात स्थान मिळवले आहे.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम