दिनविशेष : १६ मे

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
248

दिनविशेष

१६ मे  : जन्म

१८२५: आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च १८८४)
१८३१: मायक्रोफोन चे सहसंशोधक डेव्हिड एडवर्ड ह्यूजेस यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९००)
१९०५: अमेरिकन अभिनेते हेन्‍री फोंडा यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑगस्ट १९८२)
१९२६: गायिका माणिक वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर १९९६)
१९३१: भारतीय राजकारणी व परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंह यांचा जन्म.
१९७०: अर्जेंटिनाची टेनिस खेळाडू गॅब्रिएला सॅबातिनी यांचा जन्म.

 

१६ मे  : मृत्यू

१८३०: फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फोरियर यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १७६८)
१९५०: कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १८७८)
१९७७: माली देशाचे पहिले अध्यक्ष मादीबो केएटा यांचे निधन. (जन्म: ४ जुन १९१५)
१९९०: द मपेट्स चे जनक जिम हेनसन यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९३६)
१९९४: साहित्य समीक्षक माधव मनोहर यांचे निधन.
१९९४: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक फणी मुजुमदार यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९११ – फरिदपूर, बांगला देश)
२००८: ओपस वन व्हाइनरी चे सहसंस्थापक रॉबर्ट मोन्डवी यांचे निधन. (जन्म: १८ जुन १९१३)
२०१४: टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रुसी मोदी यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९१८)

 

१६ मे  : महत्वाच्या घटना

१६६५: पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाने घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्‍नात मुरारबाजी यांचा मृत्यू.
१८६६: अमेरिकेत पाच सेन्ट किंवा निकेल हे नाणे व्यवहारात आणले.
१८९९: क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर यांना फाशी.
१९२९: हॉलिवूडच्या अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर, आर्ट्‌स अँड सायन्सेस या संस्थेतर्फे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ऑस्कर असे नाव पडले.
१९६९: सोविएत रशियाचे व्हेनेरा-५ हे मानवविरहित अंतराळयान शुक्रावर उतरले.
१९७५: सिक्कीम भारतात विलीन झाले.
१९७५: जपानची जुंको तबेई ही माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बनली.
१९९३: बचेन्द्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह अठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला व नवा जागतिक विक्रम नोंदविला.
१९९६: भारताचे १० वे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी सूत्रे हाती घेतली. मात्र आवश्यक पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांचे सरकार केवळ १३ दिवस टिकले.
२०००: बॅडमिंटन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी तसेच खेळांचे दूरचित्रवाणी प्रसारण सुलभ करण्यासाठी या खेळातील गेम १५ ऐवजी ७ गुणांचा करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाच्या क्‍वालालंपूर येथील बैठकीत घेण्यात आला. मात्र २००६ मधे हा नियम परत बदलला गेला.
२००५: कुवेतमधे स्त्रियांना प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त झाला.
२००७: निकोलाय सारकॉझी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम