चालू घडामोडी : 16 मार्च 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 16 March 2020 | चालू घडामोडी : १६ मार्च २०२०
चालू घडामोडी – पश्चिम बंगाल शासनातर्फे दीप्ती शर्माचा गौरव
- ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करणाऱया दिप्ती शर्माचा पश्चिम बंगाल शासनाच्या क्रीडा आणि युवजन खात्यातर्फे सत्कार करण्यात आला.
- या स्पर्धेत झालेल्या सलामीच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. या सामन्यात दिप्ती शर्माने आपल्या चार षटकांत केवळ 17 धावा देत 3 गडी बाद केले होते. तर त्यानंतर या स्पर्धेतील लंका संघाविरूद्धच्या सामन्यात तिने 16 धावांच्या मोबदल्यात 1 गडी बाद केला होता.
- या स्पर्धेत भारताने अंतिम फेरी गाठली पण यजमान ऑस्ट्रेलियाने भारताचा अंतिम सामन्यात पराभव करून पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकली. भारतीय महिला संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पश्चिम बंगाल शासनातर्फे माजी क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्ला यांच्याहस्ते दिप्ती शर्माचा सत्कार करण्यात आला. या समारंभाला राज्याचे क्रीडामंत्री अरूप विश्वास तसेच माजी हॉकीपटू गुरूबक्ष सिंग उपस्थित होते.
चालू घडामोडी – मेळघाट व्याघ्र अभयारण्यातील वनरक्षकास राष्ट्रीय पुरस्कार
- मेळघाट व्याघ्र अभयारण्यातील वाइल्ड लाइफ क्राइम सेलमध्ये कार्यरत वनरक्षक आकाश सारडा व पांढरकवडा वनविभागात कार्यरत वनरक्षक प्रमिला इस्तारी सिडाम या महाराष्ट्रातील दोन कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार घोषित झाला.
- राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल आॅफ फॉरेस्ट सुरिंंदर मेहरा यांनी ११ मार्च रोजी या पुरस्कारांची घोषणा केली.
- महाराष्ट्राच्या वाट्याला दोन : देशपातळीवर सहा पारितोषिके
- परतवाडा : भारत सरकारच्या पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालय तथा राष्ट्रीय व्याघ्र संरक्षक प्राधिकरणाकडून व्याघ्र संवर्धनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशपातळीवरील सहा कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
- यात महाराष्ट्रातील दोन वनरक्षकांचा समावेश आहे.
पहिला पुरस्कार
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ४६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा वनरक्षकास राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यात देशपातळीवर गौरव प्राप्त करणारा महाराष्ट्रातील हा पहिला व्याघ्र प्रकल्प ठरला आहे.
उल्लेखनीय कार्य
मेळघाट व्याघ्र अभयारण्यातील आकाश सारडा यांनी सन २०१७ मध्ये पोलिसांच्या मदतीने सहा आरोपींना सहा गाड्यांसह पकडून दिले. ते दुतोंड्या सापाच्या तस्करीत संलग्न होते.
-व्याघ्र प्रकल्पाच्या वाइल्ड लाइफ क्राइम सेलमध्ये कार्यरत असताना त्यांनी २०१९ मध्ये चिखलदरा व चौराकुंडमधील शिकाºयांना पकडून वाघाच्या कातडीसह वाघनख व दात हस्तगत करण्यात उल्लेखनीय कार्य केले.
चालू घडामोडी – माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेवर, राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड
- रंजन गोगोई हे भारताचे 46 वे सरन्यायाधीश होते.
- 3 ऑक्टोबर 2018 रोजी सरन्यायाधीश झालेल्या गोगोई यांचा कार्यकाळ जवळपास 13 महिन्यांचा होता.
- राज्यसभा सदस्य केटीएस तुलसी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागी गोगोई यांची वर्णी लागली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचं नाव नामनिर्देशित केलं. याबाबत आजच एक अधिसूचना जारी करण्यात आली.
- ‘भारतीय संविधानाच्या कलम 80 तील खंड (3) सह पठित खंड (1) चा उपखंड (क) द्वारे प्रदत्त नियमानुसार राष्ट्रपती यांच्या द्वारे एका रिक्त जागेवर राज्यसभेसाठी श्री रंजन गोगोई यांना नामनिर्देशित करत आहोत’.
चालू घडामोडी – अभिनेते जयराम कुलकर्णी काळाच्या पडद्याआड
मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे आज पुण्यात निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. हरहुन्नरी अभिनेता निवर्तल्यामुळे कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
जयराम कुलकर्णी यांच्याविषयी :
- जयराम कुलकर्णी यांचे मूळगाव सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे हे होय. त्यांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयातुन शिक्षण पूर्ण केले. याठिकाणी त्यांची श्रीकांत मोघे, शरद तळवलकर यांच्याशी मैत्री झाली.
- जयराम यांना अभिनयाची आवड लहानपणापासून होती. त्यांनी विविध नाटकांमध्ये काम केले होते. त्यांनी अभिनेते महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांच्यासोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले.
- गाजलेले चित्रपट : ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’, ‘भुताचा भाऊ’, ‘दे दणादण’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘धुमधडाका’, ‘झपाटलेला’ आणि इतर चित्रपट
- दरम्यान, आज दुपारी 12 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत जयराम कुलकर्णी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
# Current Affairs
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents