चालू घडामोडी : 16 डिसेंबर 2019
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs :16 December 2019| चालू घडामोडी :16 डिसेंबर 2019
चालू घडामोडी – चीन डिजिटल चलनाची अंमलबजावणी करणार
- चीन जागतिक स्पर्धेत आपले स्थान कायम मजबूत ठेवण्यासाठी स्वतःला तयार करत आहे. त्यासाठी तो उद्योग, अवकाश यासोबत अन्य आर्थिक स्थितीचा विस्तार आणि सुधारणा करण्यास प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. सध्या चीन स्वतःचे डिजिटल चलन बाजारात आणण्याची योजना आखत आहे.
- यासाठी केंद्रीय बॅंकेनी काही शहरांचे परिक्षण करण्यासाठी मान्यता दिली आहे. सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सच्या माहितीनुसार केंद्रीय बॅंक-पिपल्स बॅंक ऑफ चायनाकडून (पीबीसी) डिजिटल चलन इलेक्ट्रॉनिक पेमेन्ट(डीसीईपी) सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
- चीनने जगभरात केंद्रीय बॅंकांच्यासोबतच्या जागतिक स्पर्धेत वरचढ राहण्यासाठी आर्थिक पातळीवर सक्षम राहण्यासाठी कार्य करत आहेत.
- बॅंक शेनझेन आणि गुआंगदोंन प्रांतामधील शहरात डिजिटल चलनाची पडताळणी करण्याची तयारी करत आहेत. आगामी वर्षात हे परीक्षण वाढविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
- चीनबरोबर प्रसिद्ध सोशल मिडीया साईट फेसबुकनेही डिजिटल चलनात प्रवेश केलेला आहे.
- लिब्रा क्रिप्टोकरन्सी या डिजिटल चलन येत्या वर्षात वापरात आणण्याची योजना तयार केली असल्याचे फेसबुकने म्हटले आहे.
- लिब्राचे व्यवहार करण्यास फेसबुक नवीन कंपनी स्थापन करणार आहे. परंतु यावर भारतात खासगी क्रिप्टो चलनास मान्यता देण्यास भारतीय रिझर्व्ह बॅंक राजी नसून आपले स्वतःचे सर्वभौम डिजिटल चलन विकसित करण्याचा विचार करत असल्याचे समजते.
चालू घडामोडी – जमैकाची टोनी सिंह विश्वसुंदरी
- मिस जमैका टोनी सिंह हिने ‘मिस वर्ल्ड २०१९’ चा किताब पटकावला आहे. भारताची सुमन राव तिसऱ्या क्रमांकावर राहिली.
- युकेतील लंडनमध्ये ही ६९ वी मिस वर्ल्ड स्पर्धा पार पडली. एकूण ११४ स्पर्धकांमध्ये टोनीने बाजी मारली.
- माजी विश्वसुंदरी २०१८ वेनेसा पोन्स हिने टोनी हिला मानाचा मुकूट चढवला. उत्तम गायिका असणाऱ्या २३ वर्षीय मॉडेल टोनी हिनं सुरुवातीपासून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
- टोनी-अॅन ही फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी आहे. ती वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तिने कॅरेबियन स्टुडंट असोसिएशनची अध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे. ती गायिका देखील आहे. तिने व्हिटनी ह्य़ूस्टनचे ‘आय हॅव नथिंग’हे गाणे सादर केले.
- टोनी सिंह ही जमैकाची चौथी विजेती आहे यापूर्वी तिच्या देशाला १९६३, १९७६, १९९३ या वर्षी विजेतेपद मिळाले होते. फ्रान्सची ऑफले मेझिनो ही उपविजेती,तर भारताची सुमन राव तिसऱ्या क्रमांकावर राहिली. राव ही सीएची विद्यार्थिनी असून मूळ राजस्थानची आहे.
चालू घडामोडी – १८ वर्षीय लक्ष्य सेन ठरला बांगलादेश चॅलेंजर स्पर्धेत चॅम्पियन
- भारताच्या १८ वर्षीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने रविवारी बांगलादेश चॅलेंजर बॅडमिंटन स्पर्धेचा किताब पटकावला.
- त्याने यासाठी पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये मलेशियन बॅडमिंटनपटू िलयाेंग जुन हाअाेचा पराभव केला.
- त्याने २२-२०, २१-१८ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली.
- यासह त्याला हा बहुमान संपादन करता अाला. भारताच्या लक्ष्य सेनचा यंदाच्या सत्रातील हा पाचवा किताब ठरला.
- त्याने गत चार महिन्यांत झालेल्या सात स्पर्धेतून पाच विजेतेपदावर नाव काेरले अाहे. अाता त्याने हीच लय कायम ठेवताना बांगलादेशची स्पर्धा गाजवली.
- तसेच या स्पर्धेत भारताच्या मनीषा अाणि ऋतुपर्णाला महिला दुहेरीच्या गटात उपविजेपदावर समाधान मानावे लागले. त्याचा फायनलमध्ये अव्वल मानांकित खेळाडूने पराभव केला.
चालू घडामोडी – वुडच्या नेतृत्वात अमेरिकेने अाठव्यांदा पटकावला प्रेसिडेंट चषक
- मेलबर्न टायगर वुडच्या नेतृत्वाखाली अमेरिकेच्या गाेल्फ संघाने रविवारी प्रेसिडेंट कप पटकावला.
- या संघाने फायनलमध्ये इंटरनॅशनल टीमचा पराभव केला.
- अमेरिकेच्या संघाने १६-१४ अशा दाेन गुणांच्या अाघाडीने सामना जिंकला.
- यासह अमेरिकेचा संघ अाठव्यांदा या किताबाचा मानकरी ठरला अाहे.
- शेवटच्या दिवशी अमेरिकेचा संघ पिछाडीवर हाेता.
- मात्र, अनुभवी गाेल्फपटू अाणि माजी नंबर वन टायगर वुड्सने अब्राहमचा पराभव केला. यासह त्याने अापल्या अमेरिका संघाचा विजय निश्चित केला.
- यामुळे इंटरनॅशनल टीमला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
# Current Affairs
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents