चालू घडामोडी : 15 मार्च 2020

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
136

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 15 March 2020 | चालू घडामोडी : १५ मार्च २०२०

चालू घडामोडी –  GST परिषदेची 39 वी बैठक: भ्रमणध्वनी संचावरचा GST आता 18 टक्के

  • 14 मार्च 2020 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्यांच्या अध्यक्षतेखाली GST परिषदेची 39 वी बैठक पार पडली.

घतलेले निर्णय 

  • भ्रमणध्वनी संचावरचा (आणि त्यांच्या काही सुट्या भागांवर) वस्तू व सेवा कर (GST) हा आत्ताच्या 12 टक्क्यांवरुन 18 टक्के इतका केला. हा निर्णय 1 एप्रिल 2020 पासून लागू होणार.
  •  GST भरण्यास विलंब केल्यास 1 जुलै 2020 पासून व्याज द्यावे लागणार.
    विमानांची देखरेख, दुरूस्ती यासाठी येणाऱ्या खर्चावरचा GST आत्ताच्या 18 टक्क्यांवरुन 5 टक्के इतका केला.
  • हाताने किंवा यंत्राने तयार करण्यात आलेली माचिस यावरचा GST 12 टक्के असणार.
  • रू. 2 कोटींपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या संस्थांना 2017-18 आणि 2018-19 या आर्थिक वर्षांसाठी वार्षिक परतावे भरण्यासंबंधीचे विलंब शुल्क माफ करण्यात आले.

काही महत्त्वाचे मुद्दे

  •  सध्या, दूरदर्शन संच (TV), टॉर्च, गिझर, इस्त्री, हिटर, मिक्सर, ज्युसर या वस्तूंवर 18 टक्के GST लागतो.
  • बैठकीत इन्फोसिस कंपनीसोबत GST नेटवर्क जोडण्यासंबंधी चर्चा झाली.
  •  2015 साली इन्फोसिस या माहिती तंत्रज्ञान कंपनीला GST नेटवर्कच्या तांत्रिक व्यवस्थापनाचे कंत्राट देण्यात आले आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – मास्क आणि हँड सॅनिटायझरचा समावेश अत्यावश्यक वस्तूंमध्ये

  • केंद्र सरकारने N95 मास्क, सर्जिकल मास्क आणि हँड सॅनिटायझरचा समावेश अत्यावश्यक वस्तूंमध्ये केला आहे. ग्राहक संरक्षण आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने याबाबत आदेश दिला आहे.
  •  देशभरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागणाऱ्या मास्क आणि हँड सॅनिटायझरच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
  • अनेक ठिकाणी त्यांचा काळा बाजार होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
  • या निर्णयामुळे चढ्या दराने विक्री, साठेबाजी आणि काळाबाजार रोखणे शक्य होणार आहे. सदर आदेश 30 जून 2020 पर्यंत कायम राहणार असून त्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
  •  या निर्णयामुळे, बाजारात जर आपल्याला मास्क मिळाला नाही तर तक्रार करता येणार आहे. त्यासाठी 1800-11-400 या राष्ट्रीय ग्राहक क्रमांकावर तक्रार करावी लागणार.

 अत्यावश्यक वस्तू कायदा-1955

  •  अत्यावश्यक वस्तू कायदा हा भारतीय संसदेचा एक कायदा आहे. चढ्या दराने वस्तूंची विक्री, साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे.
  • यात अन्न-धान्य, औषधे, खते, डाळी व खाद्यतेल आणि इंधन (पेट्रोलियम उत्पादने) इत्यादींचा समावेश आहे.
  • या व्यतिरिक्त, सरकार अत्यावश्यक वस्तू घोषित करण्यात आलेल्या कोणत्याही डब्बाबंद असलेल्या उत्पादनाची कमाल किरकोळ किंमत (MRP) निश्चित करू शकते.
  •  गरज भासते तेव्हा केंद्र सरकार या यादीत नवीन वस्तूंचा समावेश करू शकते आणि परिस्थिती सुधारल्यानंतर त्यांना या यादीतून वगळू शकते.

# Current Affairs


चालू घडामोडी – सार्क देशांना संयुक्त रणनीतीचा मोदी यांचा प्रस्ताव

  • करोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सार्क देशांनी संयुक्त रणनीती आखण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी प्रस्तावित केले. त्याला नेपाळ आणि श्रीलंकेसारख्या सदस्य देशांनी त्वरित प्रतिसाद दिला आणि करोनाचा संयुक्तपणे मुकाबला करण्यासाठी मोदी यांनी ठेवलेल्या प्रस्तावाचे जोरदार समर्थन केले.
  • सार्क सदस्य देशांनी जगासमोर एक उदाहरण ठेवण्याचे आवाहन करताना मोदी यांनी, रणनीती ठरविण्यासाठी सदस्य देशांच्या नेत्यांची एक व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करण्याचेही प्रस्तावित केले. श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाय राजपक्ष, मालदीवचे अध्यक्ष इब्राहीम मोहम्मद सोलीह, नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि भूतानचे पंतप्रधान लोटे त्सेरिंग यांनी मोदी यांच्या प्रस्तावाचे स्वागत केले.

# Current Affairs


चालू घडामोडी – IPL पुढे ढकलली, आता 15 एप्रिल रोजी होणार सुरू

  • करोना व्हायरसच्या भितीच्या सावटामुळे आयपीएलची स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • तसेच आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे आयपीएल 29 मार्च रोजी सुरू होणार होती परंतु आता ती 15 एप्रिल रोजी सुरू असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तशी कल्पना सगळ्या संघांच्या मालकांना देण्यात आली आहे.
  • जगभरातील 110 पेक्षा जास्त देशांमध्ये करोनाचा प्रसार झाला असून भारतामध्येही 80 जणांना लागण झाल्याचे आढळले आहे. सर्व पातळींवर करोनाचा सामना करण्याचे आवाहन करण्यात येत असून अशा वातावरणात आयपीएल भरवणे धोक्याचे असल्याचे प्रतिक्रिया व्यक्त होती. या पार्श्वभूमीवर आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम