दिनविशेष :१५ जुलै

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
179

 १५ जुलै  : जन्म

१६०६: डच चित्रकार रेंब्राँ यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १६६९)

१६११: जयपूर चे राजे मिर्झाराजे जयसिंग यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट १६६७)

१९०३: खासदार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. कामराज यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९७५)

१९०४: जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी २००१)

१९०५: पाकिस्तानचे ४थे पंतप्रधान चौधरी मुहंमद अली यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १९८०)

१९१७: अफगणिस्तानचे ३रे राष्ट्राध्यक्ष नूरमोहंमद तराकी यांचा जन्म. (मृत्यू: १४ सप्टेंबर १९७९)

१९२७: विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २०१०)

१९३२: विद्वान, टीकाकार आणि लेखक नरहर कुरुंदकर यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १९८२)

१९३३: भारतीय लेखक आणि पटकथालेखक एम. टी. वासुदेवन नायर यांचा जन्म.

१९३७: भारतीय पत्रकार श्री प्रभाज जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर २००९)

१९४९: दलित साहित्यिक माधव कोंडविलकर यांचा जन्म.

 

१५ जुलै  : मृत्यू

१२९१: जर्मनीचा राजा रुडॉल्फ (पहिला) यांचे निधन. (जन्म: १ मे १२१८)

१५४२: लिओनार्डो दा विंची यांच्या पेंटिंग मोना लिसा मधील महिला लिसा डेल जिकॉन्डो यांचे निधन. (जन्म: १५ जून १४७९)

१९०४: रशियन कथाकार व नाटककार अंतॉन चेकॉव्ह यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १८६०)

१९१९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हर्मान एमिल फिशर यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १८५२)

१९५३: ऑर्डर ऑफ दी इमिटेशन ऑफ क्राइस्ट चे संस्थापक भारतीय आर्चबिशप गिवरगीस मार इव्हानिओस यांचे  निधन. (जन्म: २१ सप्टेंबर  १८८२)

१९६७: गायक व नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचे निधन. (जन्म: २६ जून १८८८)

१९७९: मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावोदियाझ ओर्दाझ यांचे निधन.

१९९१: जनसंघ व भाजपचे नेते, गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते जगन्नाथराव जोशी यांचे निधन.

१९९८: स्वातंत्र्यसैनिक ताराचंद परमार यांचे निधन.

१९९९: पर्यावरणवादी लेखक जगदीश गोडबोले यांचे निधन.

१९९९: सामाजिक कार्यकर्त्या इंदुताई टिळक यांचे निधन.

२००४: कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणाऱ्या सामाजिक डॉ. बानू कोयाजी यांचे निधन. (जन्म: २२ ऑगस्ट १९१८)

 

१५ जुलै   : महत्वाच्या घटना

१६६२: इंग्लंडमध्ये प्रतिष्ठित असलेल्या रॉयल सोसायटीची स्थापना झाली.

१६७४: मुघल सरदार बहादूरशहा कोकलताशच्या ताब्यातील पेडगावाची सुमारे कोटीची लूट रायगडावर जमा झाली.

१९२६: मुंबईतील कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट उपनगरी बस सेवा सुरू झाली.

१९२७: र. धों. कर्वे यांच्या समाजस्वास्थ्य मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

१९५५: आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाऊ जाहीरनाम्यावर ५८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांच्या स्वाक्षऱ्या.

१९५५: पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न सन्मान जाहीर.

१९६२: ज्ञानप्रबोधिनी संस्थेचा पुणे येथे प्रारंभ.

१९९६: पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

१९९७: पर्यावरणवादी महेशचंद्र मेहता यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

२००६: ट्विटर हा सर्वात मोठा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.

 

निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

4 total views , 1 views today

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम