चालू घडामोडी : 15 फेब्रुवारी 2020

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
132

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs :15 FEBRUARI 2020 | चालू घडामोडी : 15 फेब्रुवारी 2020

चालू घडामोडी –  इन्फोसिसच्या नारायण मूर्तींचे जावई ऋषी सुनाक ब्रिटनचे अर्थमंत्री!

  •  इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या जावयाच्या हाती ब्रिटनच्या तिजोरीची चावी असणार आहे. नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनाक यांना ‘ब्रिटन चान्सलर ऑफ द एक्सचेकर’ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे पद अर्थमंत्र्याच्या समकक्ष असते.
  • इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या जावयाच्या हाती ब्रिटनच्या तिजोरीची चावी असणार आहे. नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनाक यांना ‘ब्रिटन चान्सलर ऑफ द एक्सचेकर’ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे पद अर्थमंत्र्याच्या समकक्ष आहे.
  •  सध्या ऋषी सुनाक यांच्यावर ट्रेजरी विभागाच्या मुख्य सचिवपदाची जबाबदारी आहे. सुनाक यांच्या नियुक्तीची माहिती ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आली आहे. सुनाक यांच्यासह भारतीय वंशाच्या गृह सचिव प्रीती पटेल यांचीही ‘चान्सलर ऑफ द एक्सचेकर’ पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे दोन भारतीय वंशांच्या अधिकाऱ्यांकडे ब्रिटनच्या अर्थ खात्याशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.
  • दरम्यान, ब्रेक्झिटनंतर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेची स्थिती कमालीची नाजूक झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०१९ या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत अर्थव्यवस्थेने शून्य विकासदर नोंदवला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात औद्योगिक उत्पादन आक्रसून ०.८ टक्क्यांवर आले आहे. विशेषतः वाहन उद्योगाने देशाची निराशा केली.

# Current Affairs


चालू घडामोडी – मंत्रालयाचा “शालेय सुदृढ शारिरीक आरोग्य सदिच्छादूत” उपक्रम

  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने 12 फेब्रुवारी 2020 रोजी नवी दिल्लीत “शालेय सुदृढ शारिरीक आरोग्य सदिच्छादूत” उपक्रमाचा शुभारंभ केला गेला.
  • हा ‘आयुषमान भारत’ योजनेच्या अंतर्गत चालविला जाणारा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामधून शालेय विद्यार्थ्यांच्या विकासाला प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल.

उपक्रमाविषयी

  •  समाजात आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रत्येक शाळेतल्या दोन शिक्षकांची “सुदृढ शारिरीक आरोग्य सदिच्छादूत” म्हणून केंद्र सरकार नियुक्ती करणार आहे.
  • हा उपक्रम सुरुवातीला 200 जिल्ह्यांमध्ये राबवला जाणार आहे. अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात आकांक्षी जिल्ह्यांमधल्या सर्व सरकारी उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचा समावेश असणार.
  •  दूत वर्ग प्रमुखाच्या माध्यमातून काम करतील. वर्ग प्रमुख “हेल्थ अँड वेलनेस मेसेंजर म्हणून काम करणार

# Current Affairs


चालू घडामोडी – अटार्क्टिकामध्ये प्रथमच 20.75 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले

  •  पृथ्वीचे दक्षिण ध्रुव असलेल्या अंटार्क्टिकामध्ये सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. तिथे 20.75 अंश सेल्सियसची नोंद झाली.
  •  अर्जेंटिना देशाच्या एका संशोधन तळावरच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 हा आकडा पार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तत्पूर्वी जानेवारी 1982 साली तिथे 18.3 अंश सेल्सियसची नोंद झाली होती.
  • अंटार्क्टिकाच्या उत्तर टोकावर इस्पेरान्झामध्ये मार्च 2015 मध्ये 17.5 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेले
    होते.
  •  अंटार्क्टिकाच्या द्वीपसमूहाचा दक्षिण अमेरिकेच्या बाजूचा जो भाग आहे तिथे तापमान वेगाने वाढत आहे. गेल्या 50 वर्षांत तिथल्या तापमानात 3 अंश सेल्सियसची वाढ झालेली आहे. या भागातल्या जवळपास सगळ्याच हिमनद्या वितळत चालल्या आहेत.
  • अंटार्क्टिकामधल्या हिमनद्या वितळत असल्याने समुद्राच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. एल निनो आणि महासागरामधला प्रवाह यामधील बदलांमुळे उच्च तापमानाचा परिणाम झाला. वैज्ञानिकांच्या मते, अंटार्क्टिक प्रदेश जगातले 70 टक्क्यांपेक्षा जास्त ताजे पाणी साठवते. जर ते वितळले तर समुद्राची पातळी 50-60 मीटर एवढ्या उंचीने वाढणार.

अंटार्क्टिका बाबत

  • हा पृथ्वीवरच्या सात खंडांपैकी एक खंड आहे. पृथ्वीचा दक्षिण ध्रुवही या खंडावर आहे. प्रशांत, अटलांटिक आणि हिंदी महासागरांच्या दक्षिण टोकाला दक्षिण महासागर अथवा दक्षिणी महासागर म्हणतात.
  • हा खंड सर्वांत जास्त सरासरी उंची असणारा खंड आहे. अंटार्क्टिका खंड हा ऑस्ट्रेलिया, युरोप या खंडांपाठोपाठ आकारमानाने तिसरा सर्वांत लहान खंड आहे.
  • अंटार्क्टिकापासून दक्षिण अमेरिकेचे अंतर एक हजार किलोमीटर आहे, ऑस्ट्रेलिया अडीच हजार किलोमीटर, आफ्रिका चार हजार किलोमीटर आणि भारत बारा हजार किलोमीटर अंतरावर आहे.
  •  अंटार्क्टिका खंडाचा शोध जेम्स कुक यांनी 1772 साली लावला. 1729 साली प्रथमच बेलिग्ज हाऊजेन यांनी याविषयी विस्तृत माहितीची नोंद करून ठेवली.

# Current Affairs


चालू घडामोडी – भारत जगातला सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा क्रुड स्टील उत्पादक:-

  • जागतिक पोलाद संघटनेच्या आकडेवारीनुसार भारत हा जगातला सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा क्रुड स्टील उत्पादक ठरला आहे.
  •  2018 आणि 2019 मध्ये चीन नंतर भारताने क्रमांक पटकावला असून, जपानला मागे टाकत भारताने हे स्थान प्राप्त केले आहे.
  • 2018 मधे भारताचे क्रुड स्टील उत्पादन 109.3 मेट्रिक टन होते.
  • 2017 मधल्या 101.5 मेट्रीक टन उत्पादनाच्या तुलनेत यात 7.7 टक्के वाढ झाली.
  •  पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम