चालू घडामोडी : 14 मार्च 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 14 March 2020 | चालू घडामोडी : १४ मार्च २०२०
चालू घडामोडी – बिल गेट्स मायक्रोसॉफ्टच्या संचालक पदावरून पायउतार
- बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली.
- सामाजकार्यात स्वत:ला झोकून द्यायचे असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.
- बिल गेट्स यांना जागतिक आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम करायच आहे, त्यामुळेच ते सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाले आहेत.
- मात्र ते मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्यासोबत तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत राहणार आहेत.
- सह-संस्थापक व तांत्रिक सल्लागार बिल गेट्स यांना आपला सर्वाधिक वेळ शिक्षण, आरोग्य आणि जागतिक विकासाला चालना देण्यासाठी द्यायचा आहे, यासाठीच ते कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा देत असल्याची माहिती मायक्रोसॉफ्टकडून दिली आहे.
- 1975 मध्ये पॉल अलेन यांच्यासोबत त्यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती.
- 2000 पर्यंत त्यांनी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी पार पाडली होती.
चालू घडामोडी – कोरोना : मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत केंद्र सरकारकडून मोठी घोषणा
- चीनमधील वुहानपासून सुरू झालेल्या कोरोना व्हायरस पूर्ण जगामध्ये वाढत चालला आहे.
- कोरोनाव्हायरसने जगभरात आतापर्यंन 4300 पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला आहे. भारतात देखील भीतीचे वातावरण आहे.
- भारतात कोरोना विषाणूने दोघांचा बळी घेतला आहे.
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारकडून कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत आर्थिक मदत जाहीर केली आहे.
- या बरोबच, केंद्र सरकारने करोना विषाणूच्या भारतातील उद्रेकाला राष्ट्रीय संकट घोषित केले आहे.
- दरम्यान, भारतात आतापर्यंत दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- दोन दिवसांपूर्वी कर्नाटकात कोरोनामुळे 76 वषीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर, शुक्रवारी दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात 68 वर्षांच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- महिलेल्या तिच्या मुलामुळे कोरोनाचा संसर्ग झाला होता. या महिलेचा मुलगा 5 ते 22 फेब्रुवारी दरम्यान स्वित्झर्लंड आणि इटलीच्या दौऱयावर होता. सध्या महिलेच्या मुलाचा उपचार सुरु आहे.
- देशभरात आतापर्यंत एकूण 85 जणांना करोना विषाणूची लागण झाली आहे. उपचारांनंतर 10 जण बरे झाले आहेत. करोनाचा उदेक पाहता देश, तसेच जगभरातील सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. अमेरिकेने तर राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे
चालू घडामोडी – “निर्यात वस्तूंवरील शुल्क किंवा कर माफी (RoDTEP)” योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
13 मार्च 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वित्तीय व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत “निर्यात वस्तूंवरील शुल्क किंवा कर माफी (RoDTEP)” या नव्या योजनेला मंजुरी देण्यात आली. RoDTEP योजना सध्याच्या ‘भारताकडून माल निर्यात योजना’ (Merchandise Export from India Scheme -MEIS) याची जागा घेणार.
ठळक वैशिष्ट्ये
- योजनेच्या अंतर्गत भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या उत्पादनांवर कर आणि शुल्कमाफी दिली जाणार आहे. त्यासाठी केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर एक वेगळी यंत्रणा उभी केली जाणार
- निर्यातीसाठीच बनवल्या जाणाऱ्या ज्या उत्पादनांच्या कराचे परतावे मिळण्यासाठी सध्या कोणतीही यंत्रणा नाही, त्यांच्यासाठी नवी यंत्रणा काम करणार.
- या योजनेच्या अंतर्गत, आंतर-मंत्रालयीन समिती तयार केली जाणार आहे. ज्या उत्पादनांवरचे निर्यात शुल्क/कर भरपाईच्या स्वरूपात माफ करायचा आहे, त्याचे दर आणि शुल्क निश्चित करण्याचे काम ही समिती करणार.
- संपूर्ण डिजिटलीकरणाच्या माध्यमातून ही योजना राबवली जाईल.
- वर्तमानात, निर्यातक्षम उत्पादने तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील GST आणि आयात/सीमाशुल्क कर एकत्र माफ आहेत किंवा त्यांचे परतावे दिले जातात. मात्र, GSTच्या पलीकडे काही कर/शुल्क जे निर्यातीत वस्तूंवर आहेत, ते माफ नाहीत. जसे की वाहतुकीच्या इंधनावर लागणारा मूल्यवर्धित कर, मंडी टैक्स, विजेवरील कर, हे सगळे शुल्क आहेत, जे RoDTEP योजनेच्या अंतर्गत येणार.
- योजना लागू करण्याचे टप्पे, क्षेत्रांचे प्राधान्य, विविध उत्पादनांवरील करमाफीचे लाभ, ह्या सगळ्या गोष्टी समितीद्वारे ठरवल्या जाणार. निर्यातमालाच्या निर्यातमूल्यानुसार दिल्या जाणाऱ्या सवलतीचे प्रमाण ठरवले जाणार.
- या योजनेमुळे देशातल्या उद्योगांना आणि निर्यातीलाही बळ मिळणार तसेच, भारतीय उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारात समतुल्य किमतींना मिळू शकतील.
चालू घडामोडी – चार राज्यांमधल्या 780 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांच्या पुनर्वसनाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि आंध्रप्रदेश या चार राज्यांमध्ये असलेल्या एकूण 780 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा सुधारण्यास आणि पुनर्वसनास मंजुरी दिली.
प्रस्तावानुसार
- दुपदरी तसेच चौपदरी रस्त्यांच्या पुनर्वसन आणि दर्जा सुधारण्यासाठी ही मंजुरी देण्यात आली आहे.
- या प्रकल्पामध्ये 7762.45 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून त्यामध्ये 3500 कोटी रुपयांच्या कर्जाचा अंतर्भाव आहे.
- राष्ट्रीय हरित महामार्ग मार्गिका प्रकल्प (National Highway Corridor Project -GNHCP) याच्या अंतर्गत जागतिक बँकेकडून या प्रकल्पासाठी मदत घेण्यात आली आहे.
- महामार्गांची रस्तेबांधणी पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षापर्यंत या मार्गांचा राखरखाव या प्रकल्पांच्या किमतीमध्ये अंतर्भूत आहे
- # Current Affairs
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents