चालू घडामोडी : 13 जानेवारी 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 13 janewari 2020 | चालू घडामोडी : 13 जानेवारी 2020
चालू घडामोडी – शाळकरी मुलांच्या आईच्या खात्यात वर्षाला जमा होणार 15 हजार रुपये
●आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी महत्त्वाकांक्षी ‘अम्मा वोडी’ योजना जाहीर केली आहे.
● या योजनेअंतर्गत ज्यांची मुलं शाळेत शिकत आहेत अशा गरीब महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे.
● तसेच या महिलांच्या खात्यात वर्षाला 15 हजार रुपये देण्याची सरकारची योजना असून मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी याची घोषणा केली आहे.
● हे पैसे वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.
●जोपर्यंत मुलांचं शालेय शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ही मदत दिली जाणार आहे. या योजनेमुळे गरीब महिलांना आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे.
चालू घडामोडी – मिलन 2020
● जगभरातल्या नौदलांचा वार्षिक आंतरराष्ट्रीय सराव
●थीम:- ‘सिनर्जी अक्रॉस द सीज’
● एकूण देश:- 41
● स्थळ:-विशाखापट्टणम (यापूर्वी फेब्रुवारी 2016 मध्ये हा सराव विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आला होत).
● उद्देश:-व्यवसायिक संबंध वाढवने आणि सागरी क्षेत्रामधील एकमेकांचे सामर्थ्य आणि उत्कृष्ट पद्धतींमधून शिकणे
● मिलन हा बहुपक्षीय नौदल सराव 1995 साली पहिल्यांदा आयोजित करण्यात आला होता.
● भारतीय नौदलाकडून अंदमान व निकोबार कमांडच्या अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते होते
● अनेक देशांची या सरावात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सरावाचे ठिकाण अंदमान व निकोबार येथूनविशाखापट्टणम येथे हलविण्यात आले.
चालू घडामोडी – कर्नाटकाच्या छल्लाकेरे येथे अंतराळवीरांसाठी ISROचे प्रशिक्षण केंद्र उभारणार.
- अतराळवीरांना मोहिमेसाठी सज्ज करण्याच्या हेतूने त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) कर्नाटक राज्यातल्या छल्लाकेरे या गावाजवळ जागतिक दर्जाची सुविधा देणार एक प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे.
- कर्नाटकातल्या चित्रदुर्गा जिल्ह्यात बेंगळुरू-पुणे NH4 वरील छल्लाकेरे या गावाजवळ हे केंद्र उभारले जाणार आहे. हा प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण केला जाणार आहे.
- ISROने या प्रकल्पासाठी 2,700 कोटी रुपयांचा एक आराखडा तयार केला आहे. या केंद्रामध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तसेच तेथे ‘योंग ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटर’ देखील तयार केले जाणार.
- सध्या, गगनयान अभियानासाठी भारतीय अंतराळवीरांना रशियामध्ये प्रशिक्षण दिले जात आहे.
ISRO विषयी..
- भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे आणि त्याचे बेंगळुरू येथे मुख्यालय आहे. 1962 साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे, 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापना झालेल्या ISRO या संस्थेनी 1962 साली स्थापना झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) या संस्थेची जागा घेतली. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते.
- ISRO चा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत युनियनने प्रक्षेपित केला. 1980 साली, भारतीय बनावटीचे प्रक्षेपक SLV-2 द्वारे ‘रोहिणी’ हा उपग्रह पाहिल्यादा प्रक्षेपित करण्यात आला. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वी झाली. त्यानंतर ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.
चालू घडामोडी – नसीम-अल-बहर’: भारत आणि ओमान यांचा द्विपक्षीय सागरी सराव..
- रॉयल नेव्ही ऑफ ओमान आणि भारतीय नौदल यांच्यादरम्यान ‘नसीम-अल-बहर’ नावाचा द्विपक्षीय सागरी सराव आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी या कार्यक्रमाची ही 12 वी आवृत्ती आहे.
- या सरावात भाग घेण्यासाठी ओमानच्या नौदलाची RNOV खसाब आणि RNOV अल रसीख ही दोन जहाजे 5 जानेवारी 2020 रोजी गोव्याच्या मोरमुगाव बंदरात दाखल झाली.
- हा सागरी सराव 1993 सालापासून आयोजित केला जात आहे. ओमान हा देश होरमुजची सामुद्रधुनी याच्या प्रवेशद्वारावर असून त्याद्वारे भारत आपल्या आयातीतील एक पंचमांश तेल आयात करतो.
ओमान देश-
- ओमान हा पश्चिम आशियातला अरबी द्वीपकल्पाचा आग्नेय किनारपट्टीवरचा एक अरब देश आहे. हे पर्शियन गल्फच्या मुखाशी एक धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थानी आहे.
- मस्कट हे देशाचे राजधानी शहर आहे आणि ओमानी रियाल हे राष्ट्रीय चलन आहे.
# Current Affairs
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents