दिनविशेष : १३ डिसेंबर

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
183

  १३ डिसेंबर: जन्म

१७८०: जर्मन रसायनशास्त्रज्ञ योहान वुल्फगँग डोबेरायनर यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १८४९)

१८०४: कोशकार व शिक्षणतज्ञ मेजर थॉमस कॅन्डी यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८७७)

१८१६: सीमेन्सचे संस्थापक वर्नेर व्हॅन सीमेन्स यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १८९२)

१८९९: छायालेखक (cinematographer) पांडुरंग सातू नाईक यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९७६ – मुंबई)

१९४०: भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक संजय लोळ यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुन २००५)

१९५४: भारतीय ऑटोलरीगोलॉजिस्ट आणि राजकारणी हर्षवर्धन यांचा जन्म.

१९५५: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा जन्म.

१३ डिसेंबर : मृत्यू

१७८४: ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, पत्रकार व विचारवंत सॅम्युअल जॉन्सन यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १७०९)

१९२२: आइसलँड देशाचे पहिले पंतप्रधान हेंस हाफस्टाइन यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १८६१)

१९३०: सेंद्रीय पदार्थांच्या पृथ्थक्‍करणासाठी रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ फ्रिट्झ प्रेग्ल यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १८६९)

१९६१: अ‍ॅना मेरी रॉबर्टसन ऊर्फ ग्रँडमा मोझेस यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन.

१९८६: अभिनेत्री स्मिता पाटील यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १९५५ – पुणे)

१९९४: सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १९१७ – कोडोवली, पन्हाळा, कोल्हापूर)

१९९६: स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, कॅपिटॉल बॉम्बस्फोटाचे सूत्रधार श्रीधर पुरुषोत्तम तथा शिरुभाऊ लिमये यांचे निधन.

२००६: अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे  संस्थापक लामर हंट यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १९३२)

  १३ डिसेंबर: महत्वाच्या घटना

१९३०: प्रभात चा उदयकाल हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

१९४१: दुसरे महायुद्ध – हंगेरी व रुमानियाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.

१९९१: मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे २३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२००१: जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबा च्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाचही अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.

२००२: ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा फाळके पुरस्कार जाहीर.

२०१६: सायरस मिस्त्री यांना टी सी एस च्या संचालक मंडळ आणि अध्यक्ष पदावरून काढण्यात आले.

२०१६: अँडी मरे आणि अँजेलीक्यू केरबर यांना आयटीएफ (इंटरनॅशनल टेनिस फेडेरेशन) ने २०१६ जागतिक विजेते घोषित केले.


निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम