चालू घडामोडी : 13 डिसेंबर 2019

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
109

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 13 December 2019 | चालू घडामोडी : 13 डिसेंबर 2019

चालू घडामोडी – रोहित शर्मा  400, अनोखी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज

  • उप-कर्णधार रोहित शर्माने अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० षटकार ठोकणारा रोहित शर्मा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
  • हा विक्रम करण्यासाठी रोहित शर्माला अवघ्या एका षटकाराची गरज होती, मात्र पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहित फलंदाजीत पुरता अपयशी ठरला. मात्र मुंबईच्या मैदानावर खेळत असताना अखेरीस रोहितने हा विक्रम केला आहे.
  • या विक्रमी कामगिरीसोबत रोहित शर्माला दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळालं आहे. वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी यांनीच आतापर्यंत ४०० षटकारांचा टप्पा ओलांडला आहे.
  • ख्रिस गेलच्या नावावर सध्या ५३४ तर शाहिद आफ्रिदीच्या नावावर ४७६ षटकार जमा आहेत. शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर रोहितने खणखणीत षटकार खेचत या दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत आपलं स्थान पक्क केलं आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – चौथी ‘भारत जल प्रभाव शिखर परिषद’ नवी दिल्लीत संपन्न 

  • नवी दिल्लीत 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर या काळात ‘व्हॅल्यूइंग वॉटर – ट्रान्सफॉर्मिंग गंगा’ या विषयाखाली चौथी ‘भारत जल प्रभाव शिखर परिषद’ पार पडली. या कार्यक्रमाचे उद्घाटन जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या हस्ते झाले.
  • IIT कानपूरच्या नेतृत्वात भारत सरकारचे जल शक्ती मंत्रालय आणि सेंटर फॉर गंगा रिव्हर बेसिन मॅनेजमेंट अँड स्टडीज (cGanga) या संस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
  • कार्यक्रमातल्या ठळक बाबी
  • पाणीपुरवठ्याशी संबंधित मुद्द्यांवर आणि त्याच्या संवर्धनाबाबत उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
  • कार्यक्रमादरम्यान, ‘रिव्हर रिस्टोरेशन अँड कन्झर्वेशन – ए कॉन्सिस मॅन्युअल अँड गाईड’ यासंबंधीचा अहवाल तसेच आतापर्यंत विकसित केलेल्या ‘गंगा हब’ यांचा हवाला जाहीर करण्यात आला.
  • बैठकीत ग्रामीण व शहरी भागातल्या जलसंपत्तीच्या एकात्मिक व्यवस्थापनावर भर देण्यात आला.

# Current Affairs


चालू घडामोडी – WADAने सर्व आंतरराष्ट्रीय क्रिडास्पर्धांसाठी रशियावर चार वर्षांची बंदी घातली

  • सरकारपुरस्कृत उत्तेजक चाचणी प्रकरणामुळे जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समितीने (WADA) सर्व आंतरराष्ट्रीय क्रिडास्पर्धांसाठी रशियावर चार वर्षांची बंदी घातली आहे, ज्यामध्ये येत्या 2020 टोकियो ऑलंपिक आणि 2022 कतार फुटबॉल विश्वचषक या स्पर्धांचा देखील समावेश आहे.
  • याशिवाय, रशिया हिवाळी ऑलंपिक आणि पॅरालंपिकमध्येही सहभाग घेऊ शकणार नाही.
  • WADAने स्पष्ट केले की, रशियावर असे आरोप होते की ते ‘उत्तेजक चाचणी’साठी आपल्या खेळाडूंचे चुकीचे नमुने पाठवत आहेत आणि तपासातही हे सिद्ध झाले की, रशियाने नमून्यांमध्ये छेडछाड केली आहे.
  • आता WADAच्या नियमांनुसार, रशियातले जे खेळाडू उत्तेजक चाचणीमध्ये दोषी आढळले नाहीत, ते न्यूट्रल खेळाडू म्हणून स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. म्हणजेच या बंदीमुळे स्पर्धेत रशियाच्या खेळाडूंना रशियाच्या ध्वजांतर्गत सहभागी होता येणार नाही. तसेच खेळाडूंना जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही सहभागी होता येणार नाही.

WADA विषयी…

  • जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समिती (WADA) ही आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समिती (IOC) कडून स्थापना करण्यात आलेली संस्था आहे, ज्याचे मुख्यालय मॉन्ट्रियल (कॅनडा) येथे असून ती क्रिडा क्षेत्रात घडणार्‍या उत्तेजक द्रव्यांच्या सेवनाला आळा घालण्यासाठी कार्यरत आहे. त्याची स्थापना 10 नोव्हेंबर 1999 रोजी डिक पाउंड आणि त्याचे विद्यमान अध्यक्ष क्रेग रीडे यांनी केली.

# Current Affairs


चालू घडामोडी –केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था आणि सौदी अन्न आणि औषध प्राधिकरण यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता   

  • पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज वैद्यकीय उत्पादने नियमनाच्या क्षेत्रात केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (सीडीएससीओ) आणि सौदी अन्न आणि औषध प्राधिकरण यांच्यातील सामंजस्य करारांना मंजुरी दिली.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौदी अरेबिया दौऱ्यादरम्यान 29 ऑक्टोबर 2019 रोजी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती.

पार्श्वभूमी:

  • सामंजस्य करारात दोन्ही बाजूंच्या नियामक बाबींबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि भारतातर्फे सौदी अरेबियाला पाठविण्यात येणाऱ्या वैद्यकीय उत्पादनांच्या निर्यातीत वाढ करण्यात मदत होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील समन्वयाचे कार्य यामुळे सक्षम होईल.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम