चालू घडामोडी : 13 फेब्रुवारी 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
[irp]
Current Affairs : 13 FEBRUARI 2020 | चालू घडामोडी : 13 फेब्रुवारी 2020
चालू घडामोडी – सरोजिनी नायडू यांची 140 वी जयंती
- सरोजिनी नायडू यांची आज 140 वी जयंती आहे. सरोजिनी नायडू यांच्या विशेष कार्याबद्दल त्यांना ‘नायटेंगल ऑफ इंडिया’ या नावाने ओळखले जाते.
- सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी, 1879 ला हैद्राबाद येथे झाला होता. त्यांचे वडील एक शास्त्रज्ञ होते आणि त्यांची आई एक तत्वज्ञ होती. सरोजिनी नायडू या अभ्यासात अत्यंत हुशार होत्या.
- सरोजिनी नायडू या मद्रास विद्यापीठातून मॅट्रिक परीक्षा पास झाल्या होत्या. 16 वर्षाच्या असताना सरोजिनी नायडू उच्च शिक्षणासाठी इंग्लंड येथे गेल्या होत्या. तेथे त्यांनी शिक्षण घेतले होते. सरोजिनी नायडू यांनी बालपणापासूनच गायनाची आवड होती.
- किंग्स् कॉलेज, लंडन आणि गिरटन कॉलेज येथे शिक्षण घेतले होते. डॉ. गोविंद राजालू नायडू यांच्यासोबत त्यांचा विवाह वयाच्या 19 व्या वर्षी झाला. त्यानंतर 2 मार्च, 1949 मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे सरोजिनी नायडू यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यातच त्यांचे निधन झाले.
सरोजिनी यांच्याबाबत…
- सरोजिनी नायडू या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या पहिला महिला अध्यक्षा बनल्या होत्या. इतकेच नाहीतर भारतीय राज्य (गव्हर्नर ऑफ युनायटेड प्रोविनस) पहिली महिला गव्हर्नर बनल्या होत्या.
- 1915 ते 1918 यादरम्यान सरोजिनी नायडू यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नोंदवला होता. गोपाळ कृष्ण गोखले, रविंद्रनाथ टागोर, अॅनि बेझेंट, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते.
- 1925 मध्ये साऊथ आफ्रिकेत ईस्ट आफ्रिकन इंडियन काँग्रेसच्या अध्यक्षपदाने ब्रिटिश सरकारकडून केसर-ए-हिंद या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
[irp]
चालू घडामोडी – फिलीपाईन्स-अमेरिका संरक्षण करार संपुष्टात
- अमेरिकेसोबतचा 20 वर्षांपेक्षा अधि काळापासून अस्तित्वात असलेला संरक्षण करार (व्हिजिटिंग फोर्सेस ऍग्रीमेंट-व्हीएफए) संपुष्टात आणण्याची घोषणा फिलीपाईन्सचे अध्यक्ष रोड्रिगो दुतेर्ते यांनी केली आहे. या निर्णयामुळे आशिया-प्रशांत क्षेत्रात चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखू पाहणाऱया अमेरिकेच्या प्रयत्नांना झटका बसणार आहे.
- दुतेर्ते यांची घोषणा दुर्दैवी आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन व्हावे याकरता चीनवर दबाव निर्माण केला जात असताना चुकीच्या दिशेने उचलेले हे पाऊल उचल्याचे विधान अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क ऍस्पर यांनी केले आहे.
- 1998 मध्ये झालेल्या व्हीएफए अंतर्गत अमेरिकेच्या सैन्यतुकडीला फिलीपाईन्समध्ये प्रवेश करण्याची सुविधा प्राप्त झाली होती.
- फिलीपाईन्सच्या सार्वभौमत्वावरील हल्ला आणि न्यायपालिकेचा अपमान झाल्याने हा करार संपुष्टात आणला गेला आहे. अन्य देशांशी संबंध प्रस्थापित करण्यास आता मोकळे आहोत. कराराच्या आड अमेरिका हेरगिरी करत असल्याचा आरोप दुतेर्ते यांच्या प्रवक्त्याने केला आहे.
[irp]
चालू घडामोडी – कोहलीचे अग्रस्थान कायम, बुमराहची घसरण
- आयसीसीने जाहीर केलेल्या वनडेच्या ताज्या मानांकनात भारतीय कर्णधार विराट कोहलीने अग्रस्थान कायम राखले आहे तर गोलंदाजीत जसप्रित बुमराहची मात्र अग्रस्थानावरून घसरण झाली आहे.
- न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विराट कोहलीला फलंदाजीत नेहमीची चमक दाखविता आली नाही. तीन सामन्यांत मिळून त्याला फक्त 75 धावा जमविता आल्या, तरीही त्याचे अग्रस्थान कायम राहिले आहे.
- दुखापतीमुळे रोहित शर्मा या मालिकेत खेळू शकला नाही. त्याने दुसरे स्थान मिळविले आहे. भारताविरुद्ध मालिकावीर ठरलेल्या न्यूझीलंडच्या रॉस टेलरने एका स्थानाची प्रगती केली असून तो आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
- गोलंदाजीत बुमराहचे अग्रस्थान न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने मिळविले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत बुमराहला एकही बळी मिळविता आला नाही. त्याचा फटका त्याला बसला. त्याने 30 षटकांत 167 धावा दिल्या होत्या. या क्रमवारीत अफगाणचा मुजीब उर रहमान तिसऱया, कागिसो रबाडा चौथ्या, ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स पाचव्या स्थानावर आहेत.
- अष्टपैलूमध्ये भारताच्या रवींद्र जडेजाने तीन स्थानांची झेप घेतली असून तो आता सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. दोन डावात त्याने 63 धावा जमविल्या तर गोलंदाजीत 2 बळीही मिळविले. अफगाणच्या मोहम्मद नबीने अग्रस्थानावर झेप घेतली असून इंग्लंडचा बेन स्टोक्स दुसऱया स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत स्टोक्सला विश्रांती दिल्याने त्याचा परिणाम क्रमवारीवर झाला आणि दुसऱया स्थानावर त्याची घसरण झाली.
चालू घडामोडी – गीता सेन यांना प्रतिष्ठित डॅन डेव्हिड पुरस्कार मिळाला
- भारतीय स्त्रीवादी विद्वान आणि कार्यकर्त्या गीता सेन यांना प्रतिष्ठित डॅन डेव्हिड पुरस्कार मिळाला आहे. डॅन डेव्हिड फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार सेन यांना स्त्री-पुरुष समानता (वर्तमान श्रेणी) या गटात दिला जात आहे.
- डेबोरा डिनीझ आणि सेन यांना हा पुरस्कार संयुक्तपणे दिला जात आहे. डेबोरा डिनीझ हे इंटरनॅशनल प्लान्ड पॅरेन्टहुड फेडरेशन-वेस्टर्न हेमिस्फेयर रिजन यासाठी हक्क व न्याय केंद्राचे उपसंचालक आहेत.
- इस्राएल देशातल्या तेल अवीव विद्यापीठात मुख्यालय असलेल्या डॅन डेव्हिड फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार देण्यात येत आहे. मे 2020 या महिन्यात तेल अवीव येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभात तीन गटात सहा जणांना हा सन्मान दिला जाणार आहे.
गीता सेन विषयी
- सेन यांना लोकसंख्येबाबतचे धोरण, प्रजनन आणि आरोग्य, दारिद्र्य, महिलांचे हक्क, कामगार पेठ आणि जागतिक प्रशासन अक्षय क्षेत्रांमधल्या त्यांनी केलेल्या कामासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
- सेन हार्वर्ड विद्यापीठात जागतिक आरोग्य आणि लोकसंख्येच्या एक संलग्न प्राध्यापक आहेत आणि ती भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) बेंगळुरू येथे सार्वजनिक धोरणाच्या प्राध्यापकही राहिलेल्या आहेत. त्या ‘पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया’ येथे ‘रामालिंगास्वामी सेंटर ऑन इक्विटी अँड सोशल डिटेर्मिनेंट्स ऑफ हेल्थ’ याच्या संचालिका आहेत.
इतर गटाचे विजेते
- सांस्कृतिक जतन आणि पुनरुज्जीवन (भूतकाळ श्रेणी) – लोनी जी. बंच तिसरा (वॉशिंग्टन, अमेरिका) आणि बारबरा किर्शेनब्लाट-गिम्ब्लेट (न्यूयॉर्क विद्यापीठ)
कृत्रिम बुद्धिमत्ता (भविष्य श्रेणी) – डेमिस हसाबिस आणि अॅमनोन शाशुआ (जेरुसलेमचे हिब्रू विद्यापीठ).
पुरस्कार
- डॅन डेव्हिड पुरस्कार दरवर्षी जागतिक स्तरावर प्रेरणा देणार्या व्यक्ती आणि संस्थांना दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. इस्राएल देशातल्या तेल अवीव विद्यापीठात मुख्यालय असलेल्या डॅन डेव्हिड फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.
- पुरस्कार स्वरूपात प्रत्येकी एक दसलक्ष डॉलर एवढ्या रोख रकमेसह तीन पुरस्कार दिले जातात. एकूण तीन दशलक्ष डॉलर एवढ्या मूल्यांसह हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सर्वाधिक मूल्य असलेल्या पुरस्कारांपैकी एक आहे.
# Current Affairs
[irp]
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents