चालू घडामोडी : 12 फेब्रुवारी 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 12 FEBRUARI 2020 , | चालू घडामोडी : 12 फेब्रुवारी 2020
चालू घडामोडी – जागतिक युनानी दिन: 11 फेब्रुवारी
- दरवर्षी 11 फेब्रुवारी या दिवशी जागतिक युनानी दिन साजरा केला जातो. श्रेष्ठ युनानी विद्वान आणि समाज सुधारक हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
- युनानी औषधोपचारांच्या रोगप्रतिबंधक आणि रोगनाशक गुणधर्माविषयी जनजागृती निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
- युनानी दिनानिमित्त आयुष मंत्रालयाने नवी दिल्लीत एक कार्यक्रम आयोजित केला होता.
दिनाविषयी
- मूळ ग्रीसची असलेली युनानी उपचार पद्धती ही अकराव्या शतकात अरब आणि पर्शियामध्ये लोकप्रिय झाली. त्याच मार्गाने ही उपचारपद्धत भारतात आली. आता युनानी पद्धतीचे उपचार, शिक्षण आणि संशोधन या क्षेत्रात भारताचे स्थान जागतिक महत्त्वाचे आहे.
- हकीम अजमल खान ही एक भारतीय युनानी वैद्य होते ज्यांना युनानी औषधी प्रणालीमधील वैज्ञानिक संशोधनाचे संस्थापक मानले जाते. ते नवी दिल्लीतल्या जामिया मिलिया इस्लामिया या शैक्षणिक संस्थेच्या संस्थापकांपैकी एक होते
चालू घडामोडी – ‘करोना’ विषाणूचे अधिकृत नाव आता ‘कोविड-19’
- जागतिक आरोग्य संघटनेकडून ‘करोना’ विषाणूला आता नवीन नाव देण्यात आले आहे. करोना विषाणूला आता ‘कोविड-19’ असे अधिकृत नाव जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहे.
- जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एधनोम गेब्रेयेसुसने यांनी सांगितले की, करोना विषाणूला अधिकृत नाव देण्यात आले आहे. कोविड-19 असे त्याचे नाव असून को म्हणजे करोना, व्ही म्हणजे व्हायरस आणि डी म्हणजे डिसीज (आजार) असा त्याचा अर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.
- दरम्यान, हा विषाणू 31 डिसेंबर 2019 रोजी पहिल्यांदा चीनमध्ये आढळला होता. आता पर्यंत चीनमध्ये या विषाणूमुळे एक हजारहून अधिक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. तर 42 हजारहून अधिकांना या आजाराची लागण झाली आहे
चालू घडामोडी – शाश्वत मत्स्योद्योग विकास क्षेत्रामध्ये भारत आणि आइसलँड यांच्यामध्ये सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शाश्वत मत्स्योद्योग विकास क्षेत्रामध्ये भारत आणि आइसलँड यांच्यामध्ये सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आली. उभय देशांमध्ये हा करार दि.10 सप्टेंबर, 2019 रोजी झाला होता.
कराराची ठळक वैशिष्ट्ये –
- अ. खोल सागरामध्ये आणि इतर ठिकाणी मासे पकडण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आपल्याकडील ज्ञानाची देवाण-घेवाण करणे. तसेच मासेमारीसाठी योग्य स्थानावर विविध सुविधा निर्माण करणे.
- ब. आधुनिक मत्स्यपालन, व्यवस्थापन आणि प्रक्रिया या क्षेत्रामध्ये मत्स्य व्यवसायातील लोकांना प्रशिक्षणा देण्याची व्यवस्था करणे.
- क. मत्स्यपालन क्षेत्रातल्या शास्त्रीय शिक्षण आणि संशोधनाने मिळालेली माहिती आणि इतर सूचनांचे आदान-प्रदान करणे.
- ड. उद्योग म्हणून विकास करण्यासाठी खोल समुद्रातून मिळणा-या मत्स्य उत्पादनावर प्रक्रिया करणे आणि त्यांचे विपणन करणे यासाठी असलेल्या शक्यतांचा तपास करणे. यासाठी तज्ञ आणि या क्षेत्रातले विशेषज्ञ यांची देवाण-घेवाण करणे.
- या सामंजस्य करारामुळे भारत आणि आइसलँड यांच्यामधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होतील आणि मत्स्यपालन क्षेत्राबरोबरच व्दिपक्षीय चर्चेसाठी असलेल्या विषयांबाबत परस्परांमध्ये सहयोग वाढीस लागणार आहे.
चालू घडामोडी – बिम्स्टेक सदस्य देशांसाठी आयोजित ‘अंमली पदार्थ तस्करी प्रतिबंध परिषदेचे’ केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत उद्घाटन
- बिम्स्टेक सदस्य देशांसाठी आयोजित ‘अंमली पदार्थ तस्करी प्रतिबंध परिषदेचे’ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्या नवी दिल्ली येथे उद्घाटन होणार आहे.
- 2018 मध्ये काठमांडू येथे झालेल्या चौथ्या बिम्स्टेक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या प्रतिबद्धतेनुसार अंमली पदार्थ प्रतिबंधक विभाग या परिषदेचे आयोजन करत आहे.
- आशियाई देशांना अमली पदार्थांच्या तस्करीचा मोठा फटका बसत असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया यांच्यातील दुवा असलेला बिम्स्टेक सदस्य मंच यासाठी प्रभावी मंच ठरेल.
- बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड आणि भारत हे बंगालच्या उपसागरातले आणि लगतच्या सात देश बिम्स्टेकचे (बहुउद्देशीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बंगालचा उपसागर उपक्रम) सदस्य आहेत.
- बँकांनी “प्रधानमंत्री जन धन योजना” अंतर्गत केलेल्या प्रयत्नांनी ही स्थिती लक्षणीय बदलली आहे. असे म्हणता येईल की इतिहासात यापूर्वी कधीही इतक्या लोकांना औपचारिक आर्थिक व्यवस्थेच्या कक्षेत आणले नव्हते. ही योजना जसजशी प्रगतीपथावर गेली तसतसे अंदाजे 35 कोटी बँक खाती उघडण्यात आली .
# Current Affairs
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents