दिनविशेष : १ मे – जागतिक कामगार दिन / महाराष्ट्र दिन / गुजरात दिन

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
239

दिनविशेष

१ मे  : जन्म

१२१८: जर्मनीचा राजा रुडॉल्फ (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १२९१)
१९१३: अभिनेता बलराज साहनी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल १९७३)
१९१५: हिन्दी साहित्यिक डॉ. रामेश्वर शुक्ल उर्फ अंचल यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९९५)
१९१९: भारतीय भाषेतील प्रतिभासंपन्न पार्श्वगायक मन्ना डे यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर २०१३)
१९२२: स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि समाजवादी नेते मधु लिमये यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९९५)
१९३२: कर्नाटकचे १६ वे मुख्यमंत्री आणि केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांचा जन्म.
१९४३: नृत्यांगना सोनल मानसिंह यांचा जन्म.
१९४४: केंद्रीय मंत्री आणि आमदार सुरेश कलमाडी यांचा जन्म.
१९७१: भारतीय अभिनेते आणि रेस कार ड्रायव्हर अजित कुमार यांचा जन्म.

 

१ मे  : मृत्यू

१९४५: जर्मनीचा चॅन्सेलर नाझी नेता जोसेफ गोबेल्स यांचे निधन. (जन्म: २९ ऑक्टोबर १८९७)
१९५८: नाटककार गणेश शिवराम उर्फ नाना जोग यांचे नागपुर येथे निधन.
१९७२: उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १९१५)
१९९३: स्वातंत्र्यसैनिक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते ना. ग. गोरे यांचे निधन. (जन्म: १५ जून १९०७)
२०१३: निखील एकनाथ खडसे यांचे निधन.

 

१ मे  : महत्वाच्या घटना

१७०७: किंगडम ऑफ इंग्लंड व किंगडम ऑफ स्कॉटलंड मिळून किंगडम  ऑफ ग्रेट ब्रिटन बनवण्यात आले.
१७३९: चिमाजी अप्पाने पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या वसईवर निकराचा हल्ला केला. तीन महिन्याच्या युद्धानंतर वसई मराठ्यांच्या ताब्यात आली.
१८४०: द पेनी ब्लॅक हे पहीले अधिकृत पोस्टेज स्टॅम्प युनायटेड किंगडममध्ये जारी केले गेले.
१८४४: हाँगकाँग पोलिस फोर्स हे जगातील दुसरे आणि आशियातील पहिले आधुनिक पोलिस दल स्थापन झाले.
१८८२: आर्य महिला समाजा ची पं. रमाबाई यांच्या पुढाकाराने पुणे येथे स्थापना झाली.
१८८४: अमेरिकेत कामगारांना एका दिवसात ८ तास कामकाज असावे ह्या मागणीची घोषणा.
१८८६: आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा कम्युनिस्ट आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दुसर्‍या बैठकीत पहिल्यांदा साजरा केला.
१८९०: जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला.
१८९७: रामकृष्ण मिशन ची सुरूवात स्वामी विवेकानंद यांनी केली.
१९२७: जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.
१९३०: सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.
१९४०: युद्ध सुरू असल्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या.
१९६०: मुंबईसह मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य आणि गुजरात या स्वतंत्र राज्यांचा निर्माण झाला.

 

१ मे – जागतिक कामगार दिन / महाराष्ट्र दिन / गुजरात दिननिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम