दिनविशेष : ९ नोव्हेंबर

दिनविशेष

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
159

  ९ नोव्हेंबर  : जन्म

१८०१: आटवलेल्या दुधाचे शोधक गेल बोर्डन यांचा जन्म.

१८६७: जैन तत्त्वज्ञानी, विद्वान, कवी श्रीमद राजचंद्र यांचा जन्म.

१८७७: इटली प्रजास्ताक चे पहिले अध्यक्ष इरिको डी निकोला यांचा जन्म.

१८७७: सारे जहाँन से अच्छा चे पाकिस्तानी कवी, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते कवी मोहम्मद इक़्बाल यांचा जन्म.

१९०४: सपुष्प वनस्पतींतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचा जन्म.

१९१८: तायक्वोंडो मार्शल आर्ट चे निर्माते चोई हाँग हाय यांचा जन्म.

१९२४: ख्यालगायक, गुरु व बंदिशकार पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास यांचा जन्म.

१९३१: लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत एल. एम. सिंघवी यांचा जन्म.

१९३४: अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक कार्ल सगन यांचा जन्म.

१९४४: भारतीय कोरिओग्राफर चितेश दास यांचा जन्म.

१९८०: अभिनेत्री व मॉडेल पायल रोहतगी यांचा जन्म.

९ नोव्हेंबर : मृत्यू

१९४०: इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचे निधन.

१९५२: इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष चेम वाइझमॅन यांचे निधन.

१९६२: भारतरत्न पुरस्कार विजेते धोंडो केशव कर्वे यांचे निधन.

१९६७: मराठी रंगभूमीचे खलनायक व चित्रपट अभिनेते बाबुराव पेंढारकर यांचे निधन.

१९७०: फ्रेंच राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती चार्ल्स द गॉल यांचे निधन.

१९७७: सुप्रसिद्ध संगीत समीक्षक, संगीतकार, संगीत दिगदर्शक व लेखक केशवराव भोळेे यांचे निधन.

२०००: मिस वर्ल्ड स्पर्धेचे निर्माते एरिक मॉर्ले यांचे निधन.

२००३: मैथिली भाषेतील लेखक व कवी विनोद बिहारी वर्मा यांचे निधन.

२००५: भारताचे १०वे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचे निधन.

२०११: भारतीय-अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते हर गोविंद खुराना यांचे निधन.

९ नोव्हेंबर : महत्वाच्या घटना

१९०६: आपल्या कार्यकालात देशाबाहेर जाणारे थिओडोर रुझव्हेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी पनामा कालव्याला भेट दिली.

१९२३: दिनचर्या नावाचे एक पत्र दतात्रय गणेशजी यांनी पुण्यात सुरु केले.

१९३७: जपानी सैन्याने चीनमधील शांघाय शहराचा ताबा घेतला.

१९४७: भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.

१९५३: कंबोडियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९६०: रॉबर्ट मॅकनामारा हे फोर्ड मोटर कंपनीचे अध्यक्ष बनले.

१९६५: इलेक्ट्रिसिटी ग्रिड खराब झाल्याने न्यूयॉर्क शहरासह पूर्व अमेरिकेतील बर्‍याच भागाचा वीजपुरवठा १२ तास खंडित झाला.

१९६७: रोलिंग स्टोन मासिकांचा पहिला अंक प्रकाशित झाला.

१९८८: मुंबईतील भारत पेट्रोलियमच्या शुद्धीकरण संकुलातील दुर्घटना, भीषण आगीत १२ जण मृत्युमुखी.

१९९७: साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठान चा जनस्थान पुरस्कार प्रदान.

२०००: उत्तराखंड उच्‍च न्यायालयाची स्थापना.

२०००: न्यूयॉर्क येथे झालेल्या एका लिलावात पाब्लो पिकासो यांचे एक चित्र पाच कोटी छप्पन्न लाख डॉलरला विकले गेले. पिकासोच्या चित्रासाठी मिळालेली ही विक्रमी किंमत आहे.


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s

अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम  वर फॉलो करा : @mpscexam07

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा :दिनविशेष : ९ नोव्हेंबर

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम