दिनविशेष : ९ जानेवारी [भारतीय प्रवासी दिन]

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
236

  ९ जानेवारी: जन्म

१९१३: अमेरिकेचे ३७वे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल १९९४)

१९१८: मार्क्सवादी विचारवंत लेखक प्रभाकर उर्ध्वरेषे यांचा जन्म.

१९२२: जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते हर गोबिंद खुराना यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०११)

१९२६: चित्रपट अभिनेते कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार यांचा जन्म. (मृत्यू: २० सप्टेंबर १९९७ – मुंबई)

१९२७: सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक आणि समीक्षक रा. भा. पाटणकर यांचा जन्म.

१९३४: पार्श्वगायक महेंद्र कपूर यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर २००८ – मुंबई)

१९३८: गणिती चक्रवर्ती रामानुजम यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९७४)

१९५१: ख्यालगायक व पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य पं. सत्यशील देशपांडे यांचा जन्म.

१९६५: नृत्यदिग्दर्शक फराह खान यांचा जन्म.

९ जानेवारी : मृत्यू

१८४८: जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ कॅरोलिन हर्षेल यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १७५०)

१८७३: फ्रांसचे पहिले अध्यक्ष लुई-नेपोलियन बोनापार्ट उर्फ नेपोलियन ३रा यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८०८)

१९२३: पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचे निधन. (जन्म: १ जून १८४२)

२००३: गीतकार व कवी कमर जलालाबादी यांचे निधन.

२००४: पखवाज वादक शंकरबापू आपेगावकर यांचे निधन.

२०१३: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ जेम्स बुकॅनन यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर१९१९)

 ९ जानेवारी: महत्वाच्या घटना

१७६०: बरारीघाटच्या लढाईत अहमद शाह दुर्रानी यांनी मराठ्यांचा पराभव केला.

१७८८: कनेक्टिकट हे अमेरिकेचे ५वे राज्य बनले.

१८८०: क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि त्यांना तेहरान जहाजाने एडनला नेण्यात आले.

१९१५: महात्मा गांधी अफ्रिकेतुन भारतात आले.

२००१: नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.

२००१: नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.

२००२: भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड विरूद्ध एकदिवसीय मालिका जिंकली.

२००२: महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल ९ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले.

२००७: स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला.


 

भारतीय प्रवासी दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम