चालू घडामोडी : 09 फेब्रुवारी 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 09 Februari 2020| चालू घडामोडी : 09 फेब्रुवारी 2020
चालू घडामोडी – खवल्या मांजरापासून कोरोना विषाणू मानवात आला: शोध
- चीनमधल्या संशोधकांनी कोरोना विषाणूचे मूळ शोधून काढले. संशोधनात असे आढळून आले आहे की खवल्या मांजर (पांगोलिन) या दुर्मिळ वन्यप्राणीपासून हा विषाणू मानवात आला आहे. खवल्या मांजराची आशियात सर्वाधिक तस्करी होते.
- चीनमध्ये या विषाणूने आतापर्यंत 800 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे आणि हा आकडा वाढतच आहे. याचा उद्रेक वुहान शहरापासून झाला.
- संशोधनानुसार, कोरोना विषाणूचे जैविक स्वरूप हे खवल्या मांजराच्या पेशीपासून मिळविण्यात आलेल्या जैविक स्वरूपाबरोबर 99 टक्के जुळतो. खवल्या मांजराची होणारी तस्करी यासाठी कारणीभूत असल्याचा संशय आहे.
- चीनमध्ये पारंपरिक औषधांमध्ये या प्राण्याचा वापर केला जातो. तसेच, त्यांच्या मांसाला अधिक मागणी आहे.
- 2002-03 या साली देखील अश्याच SARS विषाणूचा चीनमध्ये उद्रेक झाला होता. तेव्हा विषाणू सिव्हेट या सस्तन प्राण्यापासून मानवांमध्ये आला होता.
खवल्या मांजर
- स्तनिवर्गातल्या फोलिडोटा गणाच्या मॅनिडी कुलातला हा प्राणी आहे. या कुलात मॅनिस हा एकच वंश असून त्यात सात जाती आहेत.
- त्यांपैकी काही आफ्रिकेत व काही आशियात आढळतात. मुग्यांची व वाळवीची वारूळे उकरून त्यांतल्या मुंग्या व वाळव्या ते आपल्या चिकट जिभेने टिपून खाते. जिभेने चाटून पाणी पितात.
- खवल्या मांजराच्या दोन जाती भारतात आढळतात, त्या म्हणजे – भारतीय खवल्या मांजर (मॅनिस क्रॅसिकॉडेटा) आणि चिनी खवल्या मांजर (मॅनिस पेटॅडॅक्टिला).
- भारतीय जाती हिमालयाच्या दक्षिणेस मैदानी प्रदेशात व डोंगरांच्या उतरणीवर आणि श्रीलंकेत आढळतात.
- चिनी जाती हिमालय, आसाम, नेपाळ, म्यानमार, दक्षिण चीन, हैनान आणि फॉर्मोसा या देशांमध्ये आढळतात.
चालू घडामोडी – लेखक मनोज दास ह्यांना ‘मिस्टिक कलिंगा लिटररी अवार्ड’ मिळाला
- ओडिशा सरकारच्या वतीने मनोज दास ह्यांना ‘मिस्टिक कलिंगा लिटररी अवार्ड’ (भारतीय व वैश्विक भाषा) हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मनोज दास ओडिया आणि इंग्रजी भाषेत लिखाण करतात.
- 8 फेब्रुवारी 2020 रोजी भुवनेश्वर या शहरात ‘मिस्टिक कलिंग फेस्टिव्हल’ या महोत्सवाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- पुरस्कार स्वरूपात 1 लक्ष रुपये रोख रक्कम, शाल व प्रमाणपत्र देण्यात आले.
- ‘मिस्टिक कलिंग फेस्टिव्हल’ हा ओडिशा सरकारच्या वतीने आयोजित केला जाणारा वार्षिक साहित्य व सांस्कृतिक महोत्सव आहे.
- हा कार्यक्रम 8 व 9 फेब्रुवारी 2020 रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान कविता वाचन, चर्चा, व्याख्यान, संगीत मैफिली आणि नृत्य यांचे सादरीकरण करण्यात आले.
चालू घडामोडी –
पर्यावरण
- फेब्रुवारी 2020 रोजी वायव्य ऑस्ट्रेलियाच्या पिलबारा प्रांताला धडकलेले उष्णप्रदेशीय चक्रीवादळ – डॅमियन चक्रीवादळ.
आंतरराष्ट्रीय
- 15 जून 2015 रोजी झालेल्या ‘मोटार वाहन करार’च्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित सामंजस्य कराराबद्दल विचारविनिमय करण्यासाठी बांग्लादेश, भुटान, भारत आणि नेपाळ या राष्ट्रांची बैठक 8 फेब्रुवारी 2020 रोजी या शहरात झाली – नवी दिल्ली.
- भारताच्या शेजारचा हा देश समलैंगिक लोकांची अल्पसंख्याक गट म्हणून प्रथमच संख्या मोजणार – नेपाळ.
चर्चेतील व्यक्ती
- महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) याच्या संचालक मंडळावर सरकारद्वारे नेमले जाणारे संचालक – महमूद अहमद.
- अॅकोनकागुआ शिखर (6269 मीटर) गाठणारी जगातली सर्वात तरुण मुलगी – काम्या कार्तिकेयन (मुंबईतल्या नेव्ही चिल्ड्रेन स्कूलची सातवीची विद्यार्थिनी).
- जागतिक बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ जे 1 मार्च 2020 रोजी आपल्या पदाचा त्याग करणार – पिनेलोपी कौजियानो गोल्डबर्ग.
क्रिडा
- पुरुष आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती (IOC) कडून दिल्या जाणाऱ्या ‘2019 IOC प्रशिक्षक जीवनगौरव पुरस्कार’चा विजेता – पुलेला गोपीचंद (भारतीय बॅडमिंटन प्रशिक्षक).
- थायलंडमध्ये ‘2020 नोन्ताबुरी ITF’ स्पर्धेत महिला दुहिरी गटाची विजेता जोडी – अंकिता रैना आणि बिबियान स्कूफ.
- ‘राष्ट्रीय स्कीइंग व स्नोबोर्डिंग स्पर्धा’ या ठिकाणी आयोजित करण्यात आली – औली, चमोली जिल्हा, उत्तराखंड.
राज्य विशेष
- या केंद्रशासित प्रदेशाने UNESCO जागतिक वारसा स्थळ हा दर्जा मिळविण्यासाठी पावले उचलली आहेत – पुडुचेरी.
- टाटा ट्रस्ट्सच्या ‘इंडिया जस्टिस रिपोर्ट-2019’ याच्यानुसार न्याय वितरण प्रणालीच्या क्षमतेच्या संबंधित अठरा मोठ्या व मध्यम आकाराच्या राज्यांमध्ये अव्वल ठरलेले राज्य – महाराष्ट्र (त्याखालोखाल केरळ, तामिळनाडू).
- या राज्य सरकारने दहावी, बारावी आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे, जी दरमहा 2500 रुपये एवढ्या वेतानासह सहा महिने किंवा वर्षासाठी प्रशिक्षण प्रदान करणार – उत्तरप्रदेश.
- आंध्रप्रदेश सरकारने या ठिकाणी पहिले दिशा पोलीस ठाणे उघडले – राजामहेन्द्रवरम.
चालू घडामोडी –
ज्ञान-विज्ञान
- चीनच्या संशोधकांच्या मते, कोरोना विषाणूचे उगमस्थान – खवल्या मांजर हा प्राणी.
सामान्य ज्ञान
- दक्षिण अमेरिकेतले सर्वोच्च शिखर – अॅकोनकागुआ शिखर (6969 मीटर).
- आशियाच्या बाहेरचे सर्वोच्च शिखर – अॅकोनकागुआ शिखर.
- भारतीय ऑलम्पिक संघाची स्थापना – वर्ष 1924.
- इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (INTACH) – स्थापना: वर्ष 1984; मुख्यालय: नवी दिल्ली.
- महानगर टेलीफोन निगम लिमिटेड (MTNL) – स्थापना: 01 एप्रिल 1986; मुख्यालय: नवी दिल्ली.
- जागतिक बँक – स्थापना: वर्ष 1944; मुख्यालय: वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका.
# Current Affairs
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents