दिनविशेष : ८ जानेवारी २०२२

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
195

  ८ जानेवारी: जन्म

१९०९: ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिल्या लेखिका आशापूर्णा देवी यांचा जन्म.

१९२४: स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य गीता मुखर्जी यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च २०००)

१९२५: हिंदी नाटककार राकेश मोहन यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर १९७३)

१९२६: प्रसिद्ध ओडिसी नर्तक केलुचरण महापात्रा यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल २००४)

१९२९: अभिनेता सईद जाफरी यांचा जन्म.

१९३५: अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि किंग ऑफ द रॉक अँड रोल एल्व्हिस प्रिस्टले यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १९७७)

१९३६: परराष्ट्रसचिव, मुत्सद्दी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ज्योतिंद्रनाथ दिक्षीत यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी २००५)

१९३९: अभिनेत्री नंदा यांचा जन्म.

१९४२: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक स्टिफन हॉकिंग यांचा जन्म.

१९४५: मराठी लेखिका प्रभा गणोरकर यांचा जन्म.

८ जानेवारी : मृत्यू

१६४२: इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ गॅलेलिओ गॅलिली यांचे निधन. (जन्म: १५ फेब्रुवारी १५६४)

१८२५: कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक एली व्हिटनी यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १७६५)

१८८४: ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक केशव चंद्र सेन यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८३८)

१९४१: बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७)

१९६६: प्रथितयश दिग्दर्शक बिमल रॉय यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १९०९)

१९६७: प्राच्यविद्या पंडित श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर १८८० – नरसोबाची वाडी, शिरोळ, कोल्हापूर)

१९७३: सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक ना. भि. परुळेकर उर्फ नानासाहेब परुळेकर यांचे निधन.

१९७३: तत्वज्ञ आणि विचारवंत स. ज. भागवत यांचे निधन.

१९७६: चीनचे राष्ट्राध्यक्ष चाऊ एन लाय यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १८९८)

१९८४: पहिल्या भारतीय महिला वैमानिक सुषमा मुखोपाध्याय यांचे निधन.

१९९२: आनंद मासिकाचे माजी संपादक दं. प्र. सहस्रबुद्धे यांचे निधन.

१९९४: ६८वे शंकराचार्य परमाचार्य श्री. चंद्रशेखर सरस्वती यांचे निधन.

१९९५: समाजवादी विचारवंत मधु लिमये यांचे निधन. (जन्म: १ मे १९२२)

१९९६: फ्रान्सचे २१वे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवाँ मित्राँ यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९१६)

८ जानेवारी: महत्वाच्या घटना

१८३५: अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.

१८८०: सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्‍च न्यायालयाचा निर्णय. ब्राम्हणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करु शकतात हे न्यायालयाने मान्य केले.

१८८९: संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले.

१९४०: दुसरे महायुद्ध – ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.

१९४७: राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली.

१९५७: गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली.

१९६३: लिओनार्डो डा व्हिन्सि यांच्या मोनालिसा चे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट, वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.

२०००: लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

२००१: भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.

 

 


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम