चालू घडामोडी : 08 जानेवारी 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 08 Janewari 2020 | चालू घडामोडी : 08 जानेवारी 2020
चालू घडामोडी – 31 वा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्स
- गुजरातमध्ये 31 व्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला सुरुवात झाली आहे. 7 जानेवारी 2020 रोजी साबरमती नदीच्या किनारी या कार्यक्रमाचे उद्घाटन गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केले.
ठळक बाबी
- हा कार्यक्रम 14 जानेवारी 2020 पर्यंत म्हणजेच मकरसंक्रांतीपर्यंत चालणार आहे. राज्याच्या विविध भागात पतंगोत्सव साजरा केला जातो.
- या कार्यक्रमात 40 देशांमधून 140 हून अधिक पतंग उड्डाण तज्ञ सहभागी होत आहेत. याशिवाय गुजरातमधून सुमारे 800 आणि इतर 12 राज्यांमधून 200 जन या अनोख्या उत्सवात सहभागी होत आहेत.
- कवडिया, सूरत आणि वडोदरासह राज्यभरात इतर नऊ ठिकाणी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आयोजित केला जात आहे.
चालू घडामोडी – CBI अधिकारी बी. पी. राजू: ‘इंडिया सायबर कॉप ऑफ द ईयर 2019’ पुरस्काराचे विजेता
- केंद्रीय अन्वेषण विभागाचे अधिकारी बी. पी. राजू ह्यांना ‘इंडिया सायबर कॉप ऑफ द ईयर 2019’ हा सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे.
- 17 डिसेंबर 2019 रोजी हरयाणाच्या गुरुग्राम या शहरात झालेल्या वार्षिक माहिती सुरक्षा शिखर परिषदेदरम्यान या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
- राजस्थानातल्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेत झालेल्या फसवणूकीच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात त्यांच्या भूमिकेसाठी हा सन्मान बी. पी. राजू ह्यांना NASSCOM-DSCI यांच्यावतीने देण्यात आला आहे.
- तया प्रकरणात बी. पी. राजू यांच्या नेतृत्वात असलेल्या चौकशी पथकाने नऊ आरोपींना अटक केली. छडा लावताना त्यांनी सायबर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल उपकरणांमधून महत्त्वाचे पुरावे देखील गोळा केले. मुख्य म्हणजे हा तपास अल्पावधीतच पूर्ण करण्यात आला होता.
चालू घडामोडी – ओबीसी जनगणना प्रस्ताव मंजूर
- ओबीसी नागरिकांची निश्चित आकडेवारी उपलब्ध नसल्याने आता होणाऱ्या जनगणनेच्या अर्जात जातीचा रकाना ठेवावा, अशी शिफारस राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेने एकमताने केंद्र सरकारकडे केली.
- दोन्ही सभागृहात ओबीसी जनगणना प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.
- जणगणना अर्जात जातीचा रकाना असावा, अशी शिफारस करणारा ठराव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात मांडला.
- तयावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली मते मांडली.
- विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी जनगणना प्रस्ताव मांडला.
- मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीत काय कामकाज होणार आहे, याबाबत ठरले आहे.
- छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींना स्वतंत्र निधी मिळाला पाहिजे.
- लोकसंख्येची नेमकी आकडेवारी नाही. नव्याने जनगणना करण्याची गरज असून, जनगणनेत ओबीसींचा रकाना ठेवण्याची गरज आहे.
- परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार २७ टक्के आरक्षण देण्यास सांगण्यात आले. याबाबत चर्चा झाली तर ओबीसीचा रकाना त्यात समाविष्ट करून त्यांची निश्चित आकडेवारी उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents