चालू घडामोडी : 08 फेब्रुवारी 2020

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
113

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 08 Februari 2020 | चालू घडामोडी : 08 नोव्हेंबर 2019

चालू घडामोडी – रिझर्व्ह बँकेकडून नवे पतधोरण जाहीर

  • चालू आर्थिक वर्षाच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांसाठी आज (दि.6) रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले आहे.
  • या पतधोरणात कर्जदारांना फारसा दिलासा मिळालेला नाही. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीने अपेक्षेप्रमाणेच रेपो दर कायम ठेवला आहे.
  • पुढील दोन महिन्यांसाठी रेपो रेट 5.15 टक्के राहणार असून, सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कायम ठेवला आहे.
  • पतधोरण आढावा समितीची द्विमासिक पतधोरण बैठक दोन दिवसापासून सुरू होती. पुढील महिन्यांसाठी रिझर्व्ह बँक काय धोरण अवलंबणार याकडे लक्ष लागले होते.
  • अखेर आज रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले. या बैठकीत पतधोरण आढावा समितीच्या सर्व सहा सदस्यांनी रेपो रेट कायम ठेवण्याची भूमिका घेतली.
  • किरकोळ वाढती महागाई आणि अर्थव्यवस्थेची बिकट अवस्था या पार्श्वभूमीवर आरबीआयने रेपो रेट 5.15 टक्के कायम ठेवला आहे.
  • त्यामुळे कर्जदारांना आहे त्याच व्याजदराने कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. 2020-21 या वर्षात जीडीपी 6 टक्के राहणार असल्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे.

[irp]

# Current Affairs


चालू घडामोडी –  भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था कायदा (दुरुस्ती) विधेयक, 2020 ला मंत्रिमंडळाची मंजुरीनरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने पुढील गोष्टींना मान्यता दिली आहे

  • भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था कायद (दुरुस्ती ) विधेयक, सादर करणे
  • 20 आयआयआयटी (पीपीपी) मध्ये प्रत्येकी एक आणि आयआयआयटीडीएम कुरनूल (आयआयआयटी-सीएफटीआय) मध्ये एक अशा संचालकांच्या 21 पदांसाठी पूर्वप्रभावाने मंजुरी
  •  20 आयआयटी (पीपीपी) मध्ये प्रत्येकी एक आणि आयआयआयटीडीएम कुरनूल (आयआयटी-सीएफटीआय) मध्ये एक, याप्रमाणे रजिस्ट्रारच्या 21 पदांसाठी पूर्वप्रभावाने मंजुरी
  • या विधेयकामुळे , उर्वरित 5 आयआयआय टी -पीपीपी बरोबरच सार्वजनिक खासगी भागीदारीतील विद्यमान 15 भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थांना पदवी प्रदान करण्याच्या अधिकारांसह ‘राष्‍ट्रीय महत्वाच्या संस्था’ म्हणून घोषित केले जाईल.
  •  यामुळे त्यांना विद्यापीठ किंवा राष्‍ट्रीय महत्वाच्या संस्थेप्रमाणे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक) किंवा मास्टर ऑफ टेकनॉलॉजी (एम.टेक) किंवा पीएच.डी पदवीच्या नामकरणाचा वापर करता येईल. तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देशात एक मजबूत संशोधन पाया विकसित करण्यासाठी आवश्‍यक पुरेशा विद्यार्थ्यांना आकर्षित करू शकतील.

 विवरण :

  • 2014 आणि 2017 च्या प्रमुख कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था कायदा (दुरुस्ती ) विधेयक, 2020 सादर करणे
  •  सुरत , भोपाळ , भागलपुर, अगरतला आणि रायचूर येथील सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत 5 भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थांना वैधानिक दर्जा प्रदान करणे आणि त्यांना भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्‍था (सार्वजनिक खासगी भागीदारी ) कायदा 2017 अंतर्गत विद्यमान 15 भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थांबरोबरच राष्‍ट्रीय महत्वाच्या संस्‍था म्हणून घोषित करणे या मंजुरीचा उद्देश सुरत, भोपाळ, भागलपूर, अगरतला आणि रायचूर येथील आयआयआयटीना अधिकृत करणे हा आहे. या आयआयआयटी यापूर्वीच सोसायटी नोंदणी कायदा 1860 अंतर्गत नोंदणीकृत संस्था म्हणून कार्यरत आहेत .
  • .सार्वजनिक-खासगी भागीदारी योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या इतर 15 आयआयआयटी प्रमाणेच आता आयआयआयटी (पीपीपी) कायदा 2017 अंतर्गतही त्यांचा समावेश केला जाईल. तसेच आयआयटीआयटी कायदा 2014 नुसार आयआयआयटीडीएम कुर्नूल स्थापन करण्यात आले आहे आणि आयआयआयटी अलाहाबाद, आयआयआयटीएम ग्वाल्हेर, आयआयआयटीडीएम जबलपूर, आयआयआयटीडीएम कांचीपुरम या इतर 4 आयआयटी बरोबर कार्यरत आहेत.
  •  या आयआयआयटीमध्ये संचालक आणि रजिस्ट्रार हे पद आधीच अस्तित्त्वात आहे आणि सध्याचा प्रस्ताव त्यांना कोणत्याही अतिरिक्त आर्थिक भाराशिवाय केवळ औपचारिक करतो.

 पार्श्वभूमी:

  •  माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उच्च शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे ही आयआयटीमागची कल्पना आहे.
  •  केंद्रीय मंत्रिमंडळाने 26 नोव्हेंबर 2010 रोजी दिलेल्या मंजुरीनुसार सार्वजनिक खासगी भागीदारी स्वरूपात 20 नवीन आयआयआयटी संस्‍था (आईआईआईटी पीपीपी) स्थापन करण्याच्या योजनेअंतर्गत आयआयआयटी (पीपीपी) कायदा 2017 द्वारे 15 आयआयआयटी संस्‍था समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तर उर्वरित 5 संस्था समाविष्ट करायच्या आहेत. 

[irp]

# Current Affairs


चालू घडामोडी –  RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांना‘सेंट्रल बॅंकर ऑफ द इयर 2020 – एशिया-पॅसिफिक’ सन्मान बहाल

  •  लंडनमधल्या ‘द बॅंकर’ या मासिकाने भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास ह्यांना ‘सेंट्रल बॅंकर ऑफ द इयर 2020 – एशिया-पॅसिफिक’ सन्मान बहाल केला आहे.
  •  माजी वित्त सचिव शक्तिकांत दास हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे 25 वे गव्हर्नर आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे RBIमध्ये कार्यरत असणार्‍यालाच गर्व्हनरपद मिळण्याची परंपरा संपुष्टात आली. अर्थमंत्रालयामध्ये सहसचिव, तामिळनाडूमध्ये महसूल आयुक्त, उद्योग खात्यात सचिव पदासह विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे.
  •  भारतीय बँकांना बुडीत कर्जे आणि घोटाळे यामध्ये अनेक समस्या भेडसावल्या आहेत. अश्या परिस्थितीत त्यांनी RBIची धुरा सांभाळून उत्कृष्ट प्रदर्शन दर्शविलेले आहे. त्यांच्या या प्रयत्नांसाठी हा सन्मान दिला गेला आहे.
    [irp]

# Current Affairs


चालू घडामोडी – 23 वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद ▪️

  •  स्थळ :- मुंबई
  • दिंनाक:- ७ ते ८ फेब्रुवारी २०२०
  •  थीम :- India 2020:- Digitl Transformtion
  • उद्‌घाटक:- महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे
  •  महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि लोक तक्रार विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने ई-गव्हर्नन्सवरील या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे.
  •  ई -गव्हर्नन्स हे इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स न ठरता नागरिकांचे जीवन सुलभ बनवण्याचे साधन ठरावे, नागरिकांना सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध व्हाव्यात यावर या परिषदेत भर देण्यात आला. आरोग्य, कृषी, शिक्षण आणि भूमी अभिलेख या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ब्लॉक चेन, क्वॉन्टम कम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा ई-गव्हर्नन्समध्ये वापर करण्याबाबत या परिषदेत चर्चा करण्यात आली.
  •  या परिषदेत ब्लॉकचेन स्टॅन्ड बॉक्स या प्रणालीचा शुभारंभ केला. ई-गव्हर्नन्समध्ये कार्यक्षमता वाढवण्यासाठी या प्रणालीचा वापर केला जाणार आहे. याद्वारे उपलब्ध केली जाणारी सुरक्षा, अंतर्गत प्रणालीची कार्यक्षमता आणि सरकारी विभागीय कामांच्या वेळेत आणि श्रमात बचत ही या प्रणालीची मुख्य आकर्षणे आहेत.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम