चालू घडामोडी : 07 फेब्रुवारी 2020

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
201

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 07 Februar 2020| चालू घडामोडी : 07 फेब्रुवारी 2020

चालू घडामोडी –  झांसीमध्ये ‘एरो अँड डिफेन्स पार्क’ उभारणार

  •  उत्तरप्रदेशाच्या झांसी या शहरात ‘एरो अँड डिफेन्स पार्क’ उभारण्याची भारत सरकारची योजना आहे. सध्या विकसित करण्यात येत असलेल्या बुंदेलखंड प्रदेशात संरक्षण मार्गिका तयार केली जात आहे, त्यांच्याच एक भाग म्हणून ‘एरो अँड डिफेन्स पार्क’ची उभारणी केली जाणार आहे.
  •  ‘एरो अँड डिफेन्स पार्क’ याचा परिसर 6 हजार एकर पर्यंत पसरलेला असेल. प्रकल्पामध्ये अंदाजे 37 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.
  • हा प्रकल्प युक्रेनच्या कंपन्यांच्या सहकार्याने ‘टायटन एव्हिएशन अँड एरोस्पेस इंडिया लिमिटेड’ ही कंपनी विकसित करणार आहे.
  •  हा प्रकल्प चार टप्प्यात विकसित करण्याचे नियोजित आहे. तेथे एव्हिएशन यूनिवर्सिटी, एरोस्पेस लॅबोरेटरीज तसेच एअरबस, बोईंग, रशियन हेलिकॉप्टर अश्या वाहनांसाठी सिम्युलेटर सुविधा उभारली जाणार आहे. विमानांसाठी प्रगत देखरेख व दुरुस्ती केंद्र आणि ड्रोनची निर्मिती अश्या अत्याधुनिक सुविधा देखील असणार आहे.
  • याशिवाय धावपट्टी, निवासी वसाहत, विमानांसाठी सुट्या भागांसाठी उत्पादन केंद्र आणि विमानबांधणी केंद्र देखील असणार आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी –  चालू आर्थिक वर्षातला शेवटचा द्वैमासिक पतधोरण आढावा: रेपो दर कायम

  • भारतीय रिझर्व्ह बँकेनी चालू आर्थिक वर्षातला शेवटचा द्वैमासिक पतधोरण आढावा 6 फेब्रुवारी 2020 रोजी जाहीर केला आहे. ही पतधोरण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांसाठी आहे.
  •  भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय आढावा समितीने एकमताने व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

 दर पुढीलप्रमाणे आहेत 

  • रपो दर – 5.15 टक्के
  • रिव्हर्स रेपो दर – 4.9 टक्के
  • बक दर – 5.4 टक्के
  • कश रिझर्व्ह रेशियो (CRR) – 4 टक्के
  • सटॅट्यूटरी लिक्वीडिटी रेशियो (SLR) – 18.5 टक्के
  • पुढील दोन महिन्यांसाठी रेपो दर 5.15 टक्के राहणार असून, सलग दुसऱ्यांदा भारतीय रिझर्व्ह बँकेनी रेपो दर कायम ठेवले आहे.

रिझर्व्ह बँकेचे वक्तव्य

  •  2020-21 या वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) किंवा विकास दर 6 टक्के राहण्याचा अंदाज आहे.
  •  तसेच अर्थव्यवस्थेची अवस्था कुमकुवत असून, उत्पादनांना असलेली एकूण मागणी कमी राहण्याची शक्यता आहे.
  • RBIने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये डिसेंबरमधील पतधोरणाआधी सलग पाचवेळा रेपो दरात कपात केली होती.

# Current Affairs


चालू घडामोडी –  रोसोबोरोनएक्सपोर्ट रशियाबरोबर डीआरडीओने केला तंत्रज्ञान विकास करार

  • हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरी (एचईएमआरएल) ही डीआरडीओची प्रयोगशाळा उपग्रह रॉकेट आणि बंदूकांसाठी आवश्यक उच्च ऊर्जा सामुग्री विकसित करते.
  •  संरक्षण प्रदर्शनादरम्यान पुणे स्थित एचईएमआरएलने रशियाच्या रोसोबोरोनएक्सपोर्ट बरोबर प्रगत पायरो टेक्निक इग्नीशन प्रणालीच्या विकासासाठी तंत्रज्ञान विकास करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
  • या करारामुळे एनर्जेटीक आणि पायरो टेक्निक तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञान प्राप्त होऊन प्रगत इग्नीशन प्रणालीचा विकास करता येईल, असे एचईएमआरएलचे संचालक के.पी.एस.मुर्ती म्हणाले. यामुळे भविष्यातील गरजा पूर्ण होण्यास मदत होईल.
  •  या तंत्रज्ञान विकासामुळे अत्याधुनिक सॉलिड रॉकेट मोटर्सची संरचना आणि विकास करता येईल. ही उत्पादने कॉम्पॅक्ट आणि ऊर्जा कार्यक्षम प्रॉप्लशन प्रणालीवर आधारीत असते

# Current Affairs


चालू घडामोडी –  महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाय योजना

  •  रेल्वे परिसर तसेच चालत्या रेल्वेमध्ये गुन्ह्यांना आळा घालणे, गुन्हे दाखल करणे, तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकाराची आहे.
  • रेल्वे सुरक्षा दल सरकारला यात मदत करते. महिला प्रवाशांसह अन्य प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुढील उपाययोजना करण्यात आल्या आहेत:
  •  संवेदनशील मार्गांवर 2200 रेल्वे गाड्यांवर दररोज रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात असतात.
    182 हा सुरक्षा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.
  •  ट्विटर, फेसबुक सारख्या सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी रेल्वे, प्रवाशांच्या नियमित संपर्कात आहे.
  •  महिला प्रवाशांसाठी आरक्षित डब्यांमध्ये पुरुष प्रवाशांनी केलेल्या प्रवेशा विरोधात मोहिम हाती घेण्यात आली असून, ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तिंवर रेल्वे कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
  •  महानगरांमध्ये धावणाऱ्या महिला विशेष गाड्यांमध्ये महिला आरपीएफ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
  • चोरी, तस्करी सारख्या गुन्ह्यांविरोधात सावधानता बाळगण्यासाठी सार्वजनिक घोषणा प्रणालीच्या माध्यमातून सातत्याने घोषणा दिल्या जात आहेत.
  • 2019 डब्यांमध्ये आणि 511 रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
  •  नवीन EMU गाड्यांच्या डब्यांमध्ये आपत्‍कालीन संवाद प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम