चालू घडामोडी : 07 डिसेंबर 2019

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
154

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 07 December 2019 | चालू घडामोडी : 07 डिसेंबर 2019

चालू घडामोडी – पॉक्सो’ गुन्हेगारांचा दयेच्या अर्जाचा अधिकार काढून घ्यावा- राष्ट्रपती

  • महिलांवरच्या राक्षसी हल्ल्यांमुळे देशाच्या विवेकालाच हादरा बसला आहे त्यामुळे ज्यांना पॉक्सो कायद्याखाली दोषी ठरवण्यात आले आहे त्यांचा दयेच्या अर्जाचा (याचिकेचा) अधिकार काढून घेतला पाहिजे, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले.
  • देशातील महिला अत्याचाराच्या घटनांवर त्यांनी जळजळीत भाष्य करताना ठोस संदेश दिला.
  • अशा आरोपींचा दयेच्या अर्जाचा अधिकार नाकारायचा की नाही याचा निर्णय संसदेने घ्यायचा आहे, त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल.
  • पण आमचा सर्वाचा विचार आता त्या दिशेने आहे, असे त्यांनी माउंट अबू येथे महिला सुरक्षेवर आयोजित कार्यक्रमात सांगितले.

# Current Affairs


चालू घडामोडी – साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला प्रकाशकाचा सन्मान

  • यंदा ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे १० ते १२ जानेवारी दरम्यान होत आहे.
  • दर वर्षी संमेलनामध्ये एक प्रकाशक आणि एका साहित्यिकाचा विशेष सन्मान केला जातो.
  • साहित्य संमेलनाच्या ९३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला प्रकाशकाचा सन्मान केला जाणार आहे.
  • शब्दालय प्रकाशनाच्या सुमती लांडे यांना संमेलनात गौरवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचाही सन्मान होणार आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – आशियातील सर्वात मोठे दानशूर व्यक्ती –अझीम प्रेमजी

  • विप्रो कंपनीचे एके काळचे प्रमुख अझीम प्रेमजी हे आशियातील सर्वात दानशूर व्यक्ती ठरले.
  • फोर्ब्ज मासिकाने आशियातील ३0 दानशूर व्यक्तींची यादी प्रकाशित केली असून, त्यात प्रथमच स्थानावर अझीझ प्रेमजी आहेत.
  • या ३0 दानशूरांच्या यादीत भारतातील किरण मजुमदार-शॉ, त्यांचे पती जॉन शॉ व हेक्सावेअर टेक्नॉलॉजीचे संस्थापक व चेअरमन अतुल निशार यांचीही नावे आहेत.
  • बायकॉन लिमिटेडच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक किरण मजुमदार शॉ व त्यांचे पती जॉन शॉ यांनी युनिव्हर्सिटी आॅफ ग्लासगोला ५३ कोटी ४५ हजार लाखांची देणगी दिली.

# Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम