चालू घडामोडी : 06 डिसेंबर 2019
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 06 December 2019 | चालू घडामोडी : 06 डिसेंबर 2019
चालू घडामोडी – लोकसभेत सभेत ‘कर आकारणी (दुरुस्ती) विधेयक-2019’ याला मंजूरी
- हा कायदा सप्टेंबर 2019 मध्ये राष्ट्रपतींनी लागू केलेल्या अध्यादेशाची जागा घेणार आहे.
- विधेयकाने ‘उत्पन्न कर कायदा-1961’ आणि ‘वित्त कायदा-2019’ या दोन्हीमध्ये दुरूस्ती करण्यात येणार आहे.
ठळक बाबी…
- या विधेयकाने कॉर्पोरेट कर कमी करण्यात आला असून तो विना अनुदानाशिवाय 22 टक्के एवढा करण्यात आला आहे आणि नवीन उत्पादन संस्थांसाठी 15% पर्यंत कमी करण्यात आला आहे.
- वर्तमानात, वार्षिक 400 कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल असलेल्या स्थानिक कंपन्या 25 टक्के या दराने उत्पन्न कर भरीत आहेत. तर इतर स्थानिक कंपन्यांसाठी कर दर 30 टक्के आहे. या विधेयकामुळे उत्पादन क्षेत्रात अधिक गुंतवणूक होणे अपेक्षित आहे.
- शिवाय, देशात गुंतवणूक वाढविण्यासाठी कॉर्पोरेट कराचे दरही 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. गेल्या 28 वर्षांमध्ये झालेली ही सर्वात मोठी कपात आहे.
चालू घडामोडी – जागतिक मृदा दिन 2019 (5 डिसेंबर) याची संकल्पना – “स्टॉप सॉइल एरोजन, सेव्ह अवर फ्युचर”.
चालू घडामोडी – केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने महाराष्ट्रातील सहा शैक्षणिक संस्थांना ‘स्वच्छता रँकिंग’ पुरस्कार जाहीर केले.
- ‘स्वच्छ भारत’ कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने देशभर राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छता रँकिंग’ पुरस्कारामध्ये देशातील 27 विद्यापीठ आणि 20 महाविद्यालयांना एकूण 8 श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
- दशातील महाविद्यालयांना चार श्रेणींमध्ये ‘स्वच्छता रँकिंग’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडून मान्यताप्राप्त अनिवासी (विनावसतिगृह) महाविद्यालयांच्या श्रेणीत पहिले तीनही पुरस्कार महाराष्ट्राने पटकाविले. नवी मुंबई येथील महात्मा गांधी मिशनच्या वैद्यकीय महाविद्यालयाला पहिल्या क्रमांक कोल्हापूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला दुसऱ्या क्रमांक तर पुण्यातील निगडी येथील पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाला तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्कार जाहिर करण्यात आला.
- विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यताप्राप्त निवासी (वसतिगृह) विद्यापीठांच्या श्रेणीत देशातील एकूण 10 विद्यापीठांना स्वच्छता रँकिंग पुरस्काराने गौरविण्यात आाले.
- यात महाराष्ट्रातील 2 विद्यापीठांना या श्रेणीत सन्मानित करण्यात आले. या श्रेणीत पुणे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाला तिसऱ्या क्रमांकाचा तर याच शहरातील डॉ. डी .वाय.पाटील विद्यापीठाला 9 व्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
- तर अनिवासी (विनावसतिगृह) विद्यापीठांच्या श्रेणीत देशातील एकूण 5 विद्यापीठांना स्वच्छता रँकिंग पुरस्काराने गौरविण्यात आले. यात नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला चौथ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- सवच्छता रँकिंग पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून देशभरातील 6 हजार 900 शैक्षणिक संस्था यात सहभागी झाल्या होत्या.
चालू घडामोडी – देशाला मिळणार पहिले केंद्रीय संस्कृत विद्यापीठ
- केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय संस्कृत विद्यापीठ विधेयकास मान्यता दिली आहे.
- माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकास मंजुरी देण्यात आली आहे.
- आमच्याकडे ३ संस्कृत अभिमत विद्यापीठे आहेत, ती संस्कृत अभिमत विद्यापीठांचे एक केंद्रीय विद्यापीठ असेल.
- संस्कृतचे हे पहिलेच केंद्रीय विद्यापीठ असेल आणि म्हणूनच ते एक चांगले आणि महत्वाचे आहे पुढाकार आहे”.
- महत्वाचे म्हणजे देशातील संस्कृत महाविद्यालयांमधील एकूण 709 व्याख्याते पदे रिक्त आहेत.
- मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी स्वत: लोकसभेत ही माहिती दिली होती.
- रमेश पोखरियालने सांगितले होते की देशात एकूण 760 संस्कृत महाविद्यालये सुरू आहेत, त्यापैकी 468 उत्तर प्रदेशात आहेत. संस्कृत महाविद्यालयांच्या संख्येच्या बाबतीत ओडिशा 59 महाविद्यालयांसह दुसर्या क्रमांकावर आहे.
# Current Affairs
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents