दिनविशेष : 03 नोव्हेंबर

१८१७: कॅनडातील सर्वात जुनी चार्टर्ड बँक बँक ऑफ मॉन्ट्रियल सुरु झाली.

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
222

  03 नोव्हेंबर : जन्म

१६८८: अम्बर संस्थानचे राजा सवाई जयसिंग (दुसरे) यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर १७४३)

१९००: अॅडिडास चे संस्थापक एडॉल्फ डॅस्लर यांचा जन्म. (मृत्यू: ६ सप्टेंबर १९७८)

१९०१: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते, रंगमंच आणि सिनेकलावंत व राज्यसभा सदस्य पृथ्वीराज कपूर यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे १९७२)

१९१७: भारतीय स्वतंत्रसैनिक अन्नपूर्णा महाराणा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर २०१२)

१९२१: अमेरिकन अभिनेते चार्ल्स ब्रॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट २००३)

१९२५: प्रबंधलेखक, संपादक डॉ. हे. वि. इनामदार यांचा जन्म.

१९३३: नोबेल पुरस्कार प्रमाणित मा. अमर्त्य सेन यांचा जन्म.

१९३७: चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्‍या लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे १९९८)

 

  03 नोव्हेंबर: मृत्यू

१८१९: शाहीर अनंत फांदी यांचे निधन.

१८९०: स्विस नॅशनल कौन्सिलचे पहिले अध्यक्ष ओरिचिक ओशेनेबेविन यांचे निधन. (जन्म: २४ नोव्हेंबर १८११)

१९७५: बांगलादेशाचे पहिले पंतप्रधान ताजुद्दीन अहमद यांचे निधन. (जन्म: २३ जुलै १९२५)

१९९०: लोकप्रिय चरित्र अभिनेते मामोहन कृष्ण यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १९२२)

१९९२: हिंदी चित्रपटसृष्टीतील नायक व खलनायक प्रेम नाथ यांचे निधन. (जन्म: २१ नोव्हेंबर १९२६)

१९९८: कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. सी. हिरेमठ यांचे निधन. (जन्म: १५ जानेवारी १९२०)

१९९८: बॅटमॅन पत्राचे निर्माते बॉब केन यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९१५)

२०००: चीनविषयक तज्ञ आणि पूर्व आशियाई घडामोडींचे अभ्यासक प्रा. गिरी देशिंगकर यांचे निधन.

२०१२: गुजरातचे राज्यपाल कैलाशपती मिश्रा यांचे निधन. (जन्म: ५ ऑक्टोबर १९२३)

03 नोव्हेंबर  : महत्वाच्या घटना

१८१७: कॅनडातील सर्वात जुनी चार्टर्ड बँक बँक ऑफ मॉन्ट्रियल सुरु झाली.

१८३८: टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे द बॉम्बे टाईम्स अण्ड जनरल ऑफ कॉमर्स म्हणून मुंबई मध्ये पहिले प्रकाशन.

१९०३: पनामा देश कोलंबियापासुन स्वतंत्र झाला.

१९११: शेवरोलेट ऑटोमोबाइल कंपनी सुरु झाली.

१९१३: अमेरिकेत आय कर सुरू झाला.

१९१८: पोलंड देश रशियापासुन स्वतंत्र झाला.

१९४४: भारतीय संगीत प्रचारक मंडळातर्फे पुण्यात अखिल भारतीय संगीत परिषदेस सुरुवात.

१९४९: वाढत्या किमती विरुद्ध निषेध व्यक्त करण्याकरता पुण्यात बाराशे स्त्रियांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा.

१९५७: रशियाच्या स्पुटनिक-२ या अंतराळयानातून गेलेली लायका नावाची कुत्री ही अंतराळभ्रमण करणारी पहिली सजीव ठरली. मात्र प्रक्षेपणानंतर काही तासांतच ती मृत्यूमुखी पडली.

 

निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम