चालू घडामोडी : 03 फेब्रुवारी 2020

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
110

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs :03 Februar 2020 | चालू घडामोडी : 03 फेब्रुवारी 2020

चालू घडामोडी – संपूर्ण देशात आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र राज्य प्रथमस्थानी

  • सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन म्हणजेच CBDTने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशात आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र राज्य प्रथमस्थानी आहे.
  • देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आणि दिल्ली ही दोन राज्ये देशाला आर्धा इनकम टॅक्स देतात.
  • सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन (सीबीडीटी)च्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2017-18 मध्येही इनकम टॅक्स कलेक्शनमध्ये पूर्वेकडील राज्यांनीच बाजी मारली आहे.

2017-18 या आर्थिक वर्षात प्रमुख 5 राज्यांनी दिलेले योगदान (टक्केवारीमध्ये)-

  • महाराष्ट्र – 38.3%
  • दिल्ली -13.7%
  • कर्नाटक – 10.1%
  • तमिलनाडु – 6.7%
  • गुजरात – 4.5%

सर्वाधिक आयकर जमा करणारी पूर्वेकडील प्रमुख 5 राज्ये

  • मिझोराम – 41%
  • नागालँड – 32.1%
  • सिक्किम – 26%
  • त्रिपुरा – 16.7%
  • मेघालय – 12.7%

# Current Affairs


चालू घडामोडी – नवीन कर प्रणाली 

  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्यांसाठी अर्थसंकल्पातून मोठी घोषणा केली आहे.
  • नवीन कर प्रणालीत वैयक्तिक करदात्यांना वार्षिक ५ लाखांपर्यंत कसलाही कर भरावा लागणार नाही.
  •  मात्र पाच लाखाच्या वर करपात्र उत्पन्न असणाऱ्यांना कर टक्केवारी कमी करण्यात आली आहे.
  • ज्यांचे उत्पन्न ५ लाख ते ७.५ लाखांपर्यंत आहे;
  • त्यांना आता १० टक्के कर भरावा लागणार आहे. सध्या हा कर २० टक्के आहे.
  • ज्यांचे उत्पन्न ७.५ लाख ते १० लाखांदरम्यान आहे;
  • त्यांना  भराव्या लागणाऱ्या करात ५ टक्क्यांनी कपात केली आहे. सध्या या उत्पन्न गटातील करदात्यांना २० टक्के कर भरावा लागतो. आता त्यांना १५ टक्के कर असेल.
  • तर १० लाख ते १२.५ लाख उत्पन्न असलेल्या करदात्यांना
  • आता २० टक्के कर असेल. सध्या या उत्पन्न गटातील करदात्यांना ३० टक्के कर भरावा लागत आहे.
  • करपात्र उत्पन्न रु. 5 -7.5 लाख – प्राप्तिकर 20% ऐवजी 10%
  •  करपात्र उत्पन्न रु. 7.5-10 लाख – प्राप्तिकर 20% ऐवजी
    15%
  •  करपात्र उत्पन्न रु. 10-12.5 लाख – प्राप्तिकर 30% ऐवजी 20%
  •  करपात्र उत्पन्न रु. 12.5-15 लाख – प्राप्तिकर 30% ऐवजी 25%

# Current Affairs


चालू घडामोडी – नेपाळने जगाच्या उंचस्थानी फॅशन शो आयोजित करण्याचा विश्वविक्रम केला

  • 26 जानेवारी 2020 रोजी नेपाळ या देशाने समुद्रसपाटीपासून सर्वोच्च उंचीवर फॅशन शोचा कार्यक्रम आयोजित केला आणि नवा विश्वविक्रम केला आहे.
  • हा कार्यक्रम एव्हरेस्ट बेस कॅम्पजवळ काला पत्थर येथे 5340 मीटर (17515 फूट) उंचीवर आयोजित करण्यात आला होता. या घटनेची नोंद गिनीज ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड या पुस्तकात झाली.
  • माउंट एव्हरेस्ट फॅशन रनवे” नावाचा हा कार्यक्रम नेपाळ पर्यटन विभागाच्या समर्थनाने RB डायमंड्स आणि KASA स्टाईल या कंपन्यांनी आयोजित केला होता. इटली, फिनलँड, श्रीलंका आणि सिंगापूरसह जगातल्या विविध भागातून आलेल्या मॉडेल लोकांनी या कार्यक्रमात भाग घेतला.

नेपाळ देश 

  • नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आहे. हा हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेला भूपरिवेष्टित देश आहे. उत्तरेला चीन देशाची सीमा असून, इतर सर्व बाजूंना भारत देश आहे. नेपाळ हा आयताक्रुती राष्ट्रध्वज नसलेला जगातला एकमेव देश आहे. काठमांडू हे नेपाळचे राजधानी शहर आहे आणि नेपाळी रुपया हे राष्ट्रीय चलन आहे.
  • उत्तरेला हिमालय पर्वतरांगा असून जगातल्या सर्वोच्च दहा पर्वतशिखरांमधील आठ नेपाळमध्ये आहेत. जगातले सर्वोच्च शिखर म्हणजेच ‘एव्हरेस्ट’ नेपाळमध्ये आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – उत्तरप्रदेश राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना’

  • दिनांक 25 ऑक्टोबर 2019 रोजी उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी नव्या ‘मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना’ची घोषणा केली.
  • राज्यातल्या मुलींना सक्षम बनविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
  • ज्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला त्या प्रत्येकाला 15 हजार रुपयांची मदत दिली जाणार.
  • रक्कम DBT पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम