दिनविशेष : २ डिसेंबर [जागतिक संगणक साक्षरता दिवस]

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
382
  • जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन

२ डिसेंबर: जन्म

१८५५: कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे न्यायाधीश सर नारायण गणेश चंदावरकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १९२३ – बंगळुरू, कर्नाटक)

१८८५: यकृत आणि यकृताच्या स्रावांचा अभ्यास करणारे शास्रज्ञ जॉर्ज रिचर्ड यांचा जन्म.

१८९८: पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट इन्दर लाल रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै १९१८)

१९०५: सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक अनंत काणेकर यांचा जन्म.

१९३७: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म.

१९४२: मुक्तांगणच्या संस्थापिका डॉ. अनिता अवचट यांचा जन्म.

१९४४: कोसोवो देशाचे पहिले अध्यक्ष इब्राहिम रुगोवा यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी २००६)

१९४७: भारतीय क्रिकेटपटू धीरज पारसणा यांचा जन्म.

१९५९: अभिनेते बोमन ईराणी यांचा जन्म.

१९७२: भारतीय क्रिकेटपटू सुजित सोमसुंदर यांचा जन्म.

२ डिसेंबर : मृत्यू

१५९४: नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ गेरहार्ट मरकेटर यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १५१२)

१९०६: कालाजंत्रीकार आणि आद्य विज्ञान प्रसारक बाळाजी प्रभाकर मोडक यांचे निधन.

१९८०: पाकिस्तानचे ४थे पंतप्रधान चौधरी मुहम्मद अली यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९०५)

१९९६: आंध्र प्रदेशचे ११वे मुख्यमंत्री एम. चेन्‍ना रेड्डी यांचे निधन. (जन्म: १३ जानेवारी १९१९ – पेड्डामंगलम, मोईनाबाद, आंध्र प्रदेश)

२०१४: महाराष्ट्राचे ८ वे मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९२९)

२ डिसेंबर: महत्वाच्या घटना

१४०२: लाइपझिग विद्यापीठ सुरू झाले.

१९४२: एनरिको फर्मी याने प्रथमच शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया (Chain Reaction) नियंत्रित करण्यात यश मिळवले. यामुळे अणूऊर्जेचा शोध लागला.

१९४२: योगी अरविंदांच्या अरविंद आश्रमाची पॉडिचेरी येथे स्थापना झाली.

१९७१: अबू धाबी, अजमान, फुजैराह, शारजाह, दुबई आणि उम-अल-क्‍वैन यांनी मिळून युनायटेड अरब एमिरातसची (UAE) स्थापना केली.

१९७६: फिडेल कॅस्ट्रो क्यूबाचे अध्यक्ष झाले.

१९८८: बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कोणत्याही मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधान बनणार्‍या त्या पहिल्या महिला आहेत.

१९८९: भारताच्या ७व्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा शपतवीधी.

१९९९: काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन करणारे (FEMA) ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर

२००१: एन्‍रॉन कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.

 

 

 

निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम